कुणीही कायदा हातात घेऊ नये, संघर्ष वाढवू नये अन्यथा आम्ही कठोर कारवाई करू असं महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. सध्या राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणली जाते आहे असेच आणखी काही प्रयत्न झाले तर आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल असंही वळसे पाटील यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
माझ्यासाठी भोंगे नाही तर महागाई आणि सामान्यांना भेडसावणारे प्रश्न महत्त्वाचे-सुप्रिया सुळे
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
पोलीस महासंचालकांनी मंगळवारी विविध पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन राज्यातल्या स्थितीचा आढावा घेतला. आगामी काळात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी काम करावं लागेल. त्यासंदर्भातला प्लान त्यांनी माझ्यासमोर आज मांडला आहे.
मशिदीवरचे भोंगे हटवण्यासाठी मनसे आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नाकडे आम्हीही गांभीर्याने पाहतो आहोत. मशिदींवरच्या भोंग्यांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलवण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या बैठकीला बोलवण्यात आलं आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, भोंग्यांचा प्रश्न नवीन नाही. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही निर्णय दिले आहेत. त्या अनुषंगाने सन 2015 आणि 2017 मध्ये राज्य सरकारने काही आदेश काढले आहेत. याबाबत लाऊड स्पीकरबाबत काय भूमिका असावी हे नमूद करण्यात आले आहे. गृह खात्याकडे विविध ठिकाणी वाद घडवून आणण्याबाबतचे प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगाने मी पोलिसांना आदेश देण्यात आले असून त्यांचे परिस्थितीवर लक्ष असल्याचे वळसे-पाटील यांनी सांगितले.
औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेबाबत काय म्हणाले वळसे पाटील?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे पुढील महिन्यात जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या सभेला परवानगी नाकारावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह इतरांनी केली आहे. राज यांच्या सभेमुळे औरंगाबादमधील वातावरण अधिक तणावाचे होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांच्या सभेबाबत औरंगाबाद पोलीस स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतली असे त्यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT