अंतराळ क्षेत्राविषयी जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्यासाठी तरूण-तरूणींचा कल वाढतो आहे. याच उत्सुकतेतून काही जण मग अंतराळ मोहिमेत सहभागी होण्याचा निश्चय करतात. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब ही आहे की कल्याणच्या संजल गावंडे या मराठमोळ्या तरूणीने अमेरिकेमध्ये अंतराळात झेपावणारे न्यू शेफर्ड हे खासगी यान बनवणाऱ्या टीममध्ये स्थान मिळवलं आहे. संजल गावंडे ही तरूणी कल्याण पूर्व भागातली रहिवासी आहे. तिच्या या कामगिरीबद्दल तिचं खूप कौतुक होतं आहे.
ADVERTISEMENT
संजल गावंडेने इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर विविध परीक्षा देऊन संजलने आता या उंचीवर झेप घेतली आहे. कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडी भागात राहणाऱ्या संजलची आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलमधील निवृत्त कर्मचारी आहे. तर तिचे वडील अशोक गावंडे हे केडीएमसीमधील निवृत्त कर्मचारी आहेत. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या संजलने दहावीपर्यंतचे शिक्षण मॉडेल हायस्कूलमध्ये, बारावीपर्यंतचं शिक्षण बिर्ला महावद्यालयात तर त्यापुढचे म्हणजे पदवीपर्यंतचे शिक्षण वाशी येथील फादर अग्नेल महाविद्यालयातून पूर्ण केलं. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून तिने मॅकेनिकल इंजिनिअरींग पूर्ण केलं. त्याचप्रमाणे तिने जीआरई, टोफेलसारख्या इंजिनिअरींग विषयातील कठीण परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाच्या जोरावर तिने अमेरिकेतल्या मिशिगन टेक युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळवत पुढचं शिक्षण सुरू केलं. या युनिव्हर्सिटीत फर्स्ट क्लास मिळवत मॅकेनिकलमध्ये पदवी मिळवली. या पदवीनंतर संजलने विस्कॉनसिनमधील फॉन्ड्युलेकच्या मर्क्युरी मरीन या सुप्रिसद्ध कंपनीत काम सुरू केलं.
आपली काम करण्याची चिकाटी आणि सॉफ्टवेअर हार्डवेअरमधलं प्रावीण्य मिळवलेल्या संजलने ब्लू ओरिजिन द्वारे न्यू शेपर्ड मिशनसाठी निवडण्यात आली. 20 जुलै 2021 ला लाँच होणाऱ्या न्यू शेपर्ड टीममध्ये संजलची निवड झाली आहे. ज्यामुळे संजलचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
संजलने कॅलफोर्नियाला जाण्याचंही स्वप्न पाहिलं होतं. तिथल्या ऑरेंज सिटी, कॅलिफोर्नियामध्ये एका प्रतिष्ठित कंपनी टोयटो रेसिंग डेव्हलपमेंटकडून कॉल आला. संजलला मिळालेल्या यशामुळे तिच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने नोकरी करता-करता शनिवार-रविवारच्या सुट्टीमध्ये विमान चालवण्याचे प्रशिक्षण सुरू केले. १८ जून २०१६ रोजी तिला वैमानिक म्हणून परवाना मिळाला आणि तिच्या स्वप्नांच्या पंखांना खऱ्या अर्थाने बळ प्राप्त झाले. कॅलिफोर्नियाच्या ऑरेंज सिटीमध्ये टोयाटो रेसिंग डेव्हलपमेंट या नामांकित कंपनीत मेकॅनिकल डिझाइन इंजिनीअर म्हणून तिच्या कामाला सुरुवात झाली.
रेसिंग गाड्यांचे इंजिन डिझाइन करण्याचे काम ती करत होती. यादरम्यान तिने नासामध्ये अर्ज केला होता. नासासाठी मुलाखत दिल्यानंतर नागरिकत्वाच्या मुद्द्यावर तिची निवड होऊ शकली नाही. मात्र त्यामुळे निराश न होता संजलने नासासाठी काम करणाऱ्या ब्ल्यू ओरिजिनमध्ये अर्ज केला आणि विशेष म्हणजे त्याठिकाणी तिची निवडही झाली. आता ‘न्यू शेफर्ड’ या अंतराळयानाचे आरेखन करणाऱ्या दहा जणांच्या पथकामध्ये संजलचा समावेश झाला आहे. संजलच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे यात काहीही शंका नाही.
‘न्यू शेफर्ड’ नेमके काय आहे?
‘न्यू शेफर्ड’ हे खासगी यान आहे. अंतराळ क्षेत्रात ‘न्यू शेफर्ड’ अंतराळ सफरचे लाँचिंग म्हणजे एक मैलाचा दगड मानला जात आहे. या यानातून प्रवास करण्यासाठीची किंमत तब्बल 28 मिलियन डॉलर इतकी आहे. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या 10 जणांच्या टीममध्ये संजल गावंडेचा समावेश आहे. या कामगिरीतून तिने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याची कौतुकाची थाप तिच्या पाठीवर पडली आहे.
ADVERTISEMENT