महागाईने त्रस्त जनतेला वीज दरवाढीचा झटका! ८० ते २०० रूपये वाढणार बिल

मुंबई तक

• 03:29 PM • 08 Jul 2022

राज्यातील महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला आता वीज दरवाढीचा शॉक मिळाला आहे. वीज नियामक आयोगाने वीज कंपन्यांना वीज बिलातून इंधन समायोजन आकार वसूल करण्याबाबत मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना वीज दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत इंधन समायोजन आकार वीज बिलात लागू केली जाणार आहे. ही दरवाढ प्रति युनिट सरासरी १ […]

Mumbaitak
follow google news

राज्यातील महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला आता वीज दरवाढीचा शॉक मिळाला आहे. वीज नियामक आयोगाने वीज कंपन्यांना वीज बिलातून इंधन समायोजन आकार वसूल करण्याबाबत मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना वीज दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत इंधन समायोजन आकार वीज बिलात लागू केली जाणार आहे.

हे वाचलं का?

ही दरवाढ प्रति युनिट सरासरी १ रूपया असणार आहे. महाराष्ट्राची जनता कोरोनातून सावरत असताना, जनतेला वाढत्या महागाईला सामोरं जावं लागलं. आता वीज बिलात वाढ होणार आहे. गॅसचे दरही नुकतेच ५० रूपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडून गेलं आहे.

जानेवारी ते एप्रिल या कालावधीत वीज खरेदीवर झालेला खर्च भरून निघावा यासाठी कंपन्यांच्या वीज बिलात ग्राहकांसाठी इंधन समायोजन आकार लागू केला जाणार आहेत. इंधन समायोजन आकारात वाढ झाल्याने अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वीज ग्राहकांना प्रति युनिट सरासरी ९२ पैसे वाढ होणार आहे. टाटा पॉवर वीज ग्राहकांना प्रति युनिट १ रूपये ५ पैसे वाढ होणार आहे.

महावितरणच्या (Maharashtra Mahavitaran) इंधन समायोजन आकारात कशी वाढ?

० ते १०० युनिट – ६५ पैसे

१०१ ते ३०० युनिट- १ रूपया ४५ पैसे

३०१ ते ५०० युनिट- २ रूपये ५ पैसे

५०१ तसंच त्यावरील युनिट- २ रूपये ३५ पैसे

१५ ते १६ टक्के वाढ कशी होईल?

५०० रूपये बिल येत असेल तर ते ५८० रूपये होईल

१ हजार रूपये बिल येत असेल तर ते १२०० रूपये होईल

१५०० रूपये बिल येत असेल तर १७०० रूपये होईल

इंधन समायोजन आकार म्हणजे वीज खरेदी खर्चातील वाढ. ही वाढ ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे. जून महिन्यापासूनच्या बिलात ही वाढ लागू होईल. महावितरणच्या वीज ग्राहकांना इंधन समायोजन आकारामुळे प्रति युनिट सरासरी १ रूपया मोजावा लागणार आहे, ही माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप हेगडे यांनी दिली आहे.

मार्च आणि एप्रिल महिन्यात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला होता. विजेची मागणी २६ हजार मेगावॅटवर गेली होती. त्यामुळे या कालावधीत वीज खरेदी करण्यात आली होती. वीज खरेदी वाढल्याने इंधन समायोजन कर वाढला आहे. इंधन समायोजन कर हा प्रत्येक कंपनी वेगळ्या पद्धतीने आकारते. तसंच तो प्रति युनिट वाढतो.

    follow whatsapp