लाइव्ह
Marathi News Live : ‘सूरज चव्हाण ज्या दिवशी सत्तेच्या बाजूने जातील…’, ठाकरे गटाची भाजपावर टीका
मुंबई तक
18 Jan 2024 (अपडेटेड: 19 Jan 2024, 03:05 AM)
Marashtra Breaking news Live Updates : लोकसभा निवडणूक तोंडावर आलीये. मार्चमध्ये आचारसंहिता लागेल आणि त्यानंतर प्रचार सुरू होईल. याच अनुषंगाने पडद्यामागे, बंद दाराआड बऱ्याच हालचाली सुरू आहे. विरोधकांची ताकद कमी करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी सुरु आहे. नेमकं दिल्लीपासून तुमच्या जिल्ह्यापर्यंत काय शिजतंय राजकारण, याचे सर्व अपडेट्स इथे वाचा…
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 07:33 PM • 18 Jan 2024ठाकरे गटाची भाजपावर टीकाmumbaitak
- 06:26 PM • 18 Jan 2024सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला, मराठा आरक्षणावर चर्चा सूरू7 हजार गावांमध्ये नोंदी तपासल्या नाही आहेत असे मनोज जरांगे म्हणाले आहेत. तसेच काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, किती प्रमाणपत्र दिली याची माहिती द्या, अशी मागणी जरांगे पाटलांनी केली. तसेच 20 तारखेपर्यत मुंबईत जाणार आणि आंदोलन करणार यावर ठाम असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
- 04:28 PM • 18 Jan 2024अजितदादांचा नाना पटोलेंवर पटलवार, तू किती पक्ष फिरून आला...अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर आता पंतप्रधानांनी निवृत्त व्हा, असे त्यांनी बोलून दावखावे असे विधान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले होते. नाना पटोलेंच्या या विधानावर आता अजित पवार यांनी पलटवार केला आहे. वय विचारू ना. आधी 80 तर होऊ दे. नाना सांगा मला शिकवू नको. तु किती पक्ष फिरून आला ते पहा, अशा शब्दात अजितदादांनी पटोलेंना खडसावल.
- 01:17 PM • 18 Jan 2024सूरज चव्हाण अटक, असं आहे संपूर्ण प्रकरण- सूरज चव्हाण आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आहे.
- 12:23 PM • 18 Jan 2024प्रकाश आंबेडकरांबद्दल आम्ही अनुकूल -अशोक चव्हाणकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काही मुद्द्यावर भाष्य केले. काही काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे दावे भाजपच्या नेत्यांकडून केले जात आहे. हे दावे अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावले.
- 11:27 AM • 18 Jan 2024सूरज चव्हाण, राजन साळवी, रवींद्र वायकरांवर दबाव टाकला जातोय -संजय राऊतआदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. दुसरीकडे आमदार राजन साळवी यांच्या घरीही एसीबीकडून झाडाझडती सुरू आहे. या दोन्ही घटनांवर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
- 09:34 AM • 18 Jan 2024राजू शेट्टी यांना भाजपकडून ऑफरस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना भाजपकडून महायुतीमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे. राजू शेट्टी भाजपवर नाराज आहेत. झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा नव्याने सोबत येण्याचा आग्रह भाजपने शेट्टींना केला आहे. याबद्दल राजू शेट्टी यांनी याला दुजोरा दिला आहे. पण, त्यांनी सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यांनी जर ही ऑफर स्वीकारली तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलेली दिसतील.
- 09:34 AM • 18 Jan 2024भाजपकडून मला आणि प्रणिती शिंदेंना ऑफर -सुशीलकुमार शिंदेलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून विरोधी पक्षातील जनाधार असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशात माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदेंनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT