लाइव्ह

Maharashtra Live : 'आता वंचित सोबत...', शरद पवारांच्या भेटीनंतर थोरातांनी दिली मोठी अपडेट

मुंबई तक

29 Feb 2024 (अपडेटेड: 29 Feb 2024, 03:07 PM)

Lok Sabha Election 2024, Maha Vikas Aghadi Mahayuti Seats sharing : महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी सध्या महायुतीत चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीचे जागावाटपही अंतिम टप्प्यात आले आहे.

Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut with VBA president Prakash Ambedkar, Maharashtra Congress president Nana Patole, party leaders Ashok Chawan, Balasaheb Thorat and others at a MVA alliance meeting in Mumbai on February 2; (Photo: ANI)

Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut with VBA president Prakash Ambedkar, Maharashtra Congress president Nana Patole, party leaders Ashok Chawan, Balasaheb Thorat and others at a MVA alliance meeting in Mumbai on February 2; (Photo: ANI)

follow google news

lok sabha election 2024 seats sharing : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू आहे. यासंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या वाचा मुंबई तक लाईव्ह अपडेट्समध्ये...

विधासभा कामकाजाचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 03:55 PM • 29 Feb 2024
    रश्मी शुक्ला आरएसएस मुख्यालयात

    राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गुरुवारी (२९ फेब्रुवारी) नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाल परिसरातील मुख्यालयाला भेट दिली. यापूर्वी शुक्ला या रेशीमबाग स्थित डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात सुद्धा गेलेल्या होत्या.

  • 03:07 PM • 29 Feb 2024
    मविआचा निर्णय फायनल, आता वंचित सोबत चर्चा

    शरद पवारांची भेट घेतल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेच आम्ही सगळे बसलो होतो, कारण सगळा कार्यक्रम... आता लवकरच आचारसंहिता येऊ शकते. सगळ्या विषयांची चर्चा आम्ही यानिमित्ताने केली आहे. याशिवाय राहुल गांधी हे सुद्धा १० तारखेपासून महाराष्ट्रात येत आहेत. त्यांची न्याय यात्रा मुंबईत सुद्धा आहे. त्यामुळे मुंबईत सभा सुद्धा होणार आहे. याबद्दल आम्ही चर्चा केली." 

    वंचित बहुजन आघाडीसंदर्भात काही चर्चा झाली का? असा प्रश्न विचारल्यानंतर बाळासाहेब थोरात म्हणाले की, "साहजिक आहे सगळ्याच विषयांवर चर्चा झालेली आहे. आणि जे जे समविचारी आहेत आणि भाजपची कार्यपद्धतीने आणि त्यांचं तत्वज्ञान ज्यांना पटत नाही, त्यांना बरोबर घेण्याचा आमचा विचार आहे. त्यादृष्टीने आम्ही तयारी करतोय." 

    "जागावाटपाचा फॉर्म्युला काही नाही. ज्या ठिकाणी निवडून येण्याची क्षमता ती जागा त्याची. हा एकच फॉर्म्युला. यात मतभेद काही नाहीये. काही जागा अशा आहेत जिथे आम्हाला वाटतं आमचा उमेदवार निवडून येईल. शिवसेनेला वाटतं त्यांचा उमेदवार निवडून येईल. अशा काही गोष्टी असतात, ज्याची चर्चा होते."

    "छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची जागा काँग्रेसला हवी आहे. त्यांनी काँग्रेसकडून उभं राहावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. सगळं काही फायनल झालं आहे. आता आमचं वंचितसोबत बोलणं चाललं आहे", अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.  

  • 02:10 PM • 29 Feb 2024
    'माझेच मंत्रीपद कायम राहील की नाही माहित नाही' - सुधीर मुनगंटीवार

    'पंकजा मुंडे, प्रितम मुंडे यांना योग्यवेळी संधी मिळेल. मी त्यासाठी फार,फार तुमच्या भावना त्या ठिकाणी पोहचवू शकतो. माझेच मंत्रीपद कायम राहील की नाही माहीत नाही, मी कोणाची शिफारस करु शकत नाही.' असं स्पष्ट वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांसमोर केलं.

  • 02:06 PM • 29 Feb 2024
    'भाजप आमदारांचे प्रश्न फडणवीसांना खूश करण्यासाठी...'- रोहित पवार

    'सध्या विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली. भाजपाचे आमदार फडणवीसांना खूश करण्यसाठी प्रश्न करत आहेत,' असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. 

  • 02:03 PM • 29 Feb 2024
    महाविकास आघाडीचे नेते शरद पवारांच्या भेटीला

    लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खलबतं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या भेटीला घरी दाखल झाले आहेत.

  • 12:56 PM • 29 Feb 2024
    कोणालाही पाठिशी घालणार नाही -अजित पवार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्याची राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसेभत दिली.
     
    उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे."

    "ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे", अशी माहिती अजित पवारांनी दिली.

    "या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही", अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.

  • 11:05 AM • 29 Feb 2024
    "सत्ताधारी आमदार विरोधकांची दररोज आई बहीण काढताहेत, गृहमंत्री काय कारवाई करणार?" 

    अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "राज्यात दुःशासनच्या औलादी खुलेआम मोकाट फिरताहेत. शासनामधील काल परवा नवी मुंबईचा सरकारमधील एक पदाधिकारी... बापाने आईचं शोषण केलं. पोराने तिच्या मुलीचं शोषण केलं. निराधार महिलेच्या... हे खुलेआम चाललं आहे आणि तुम्ही साड्या काय वाटताहेत. साड्यांसाठी का निधी देताहेत. साड्या वाटून मतं मिळवण्याचा गोरखधंदा तुम्ही सुरू केला आहे का?" 

    "बेताल... जे बोलताहेत... पोलिसांचं मॉरल डाऊन करताहेत. पोलिसांच्या महिलांसंदर्भात टिप्पणी केली जाते, सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून. हे शोभते का? यावर कुणी बोलायला नको. या राज्याचे गृहमंत्री... ते सांगतात आम्हाला काही भीती नाही. सागर बंगला आमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे आम्ही कुणाचं काही केलं तरी काही होणार नाही. पोलिसांनी जर व्हिडीओ काढले, तर ते म्हणतात दाखवतील कुठे... बायकोला नेऊन दाखवतील, महिलांचा अवमान सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधी करत आहेत."

    "गृहमंत्री परवा म्हणाले की, आम्ही कोण कुणाची आई बहीण काढत असेल... विरोधी पक्षाच्या सदस्याची देखील कुणी आई बहीण काढत असेल, तर मी तुमच्या बाजूने मजबुतीने उभा राहीन. जर सत्ताधारी पक्षातील आमदार आणि सत्ताधारी रोज विरोधकांची आई बहीण काढत असतील, तर त्याच्यावर काय कारवाई करणार? गृहमंत्री काय कारवाई करणार? यावर ते बोलतील की नाही? म्हणून महिलांच्या संरक्षणासाठी सरकारने आता त्यांच्या हातात शस्त्र दिली तरच त्या सुरक्षित राहतील", असे वडेट्टीवार म्हणाले.

  • 10:41 AM • 29 Feb 2024
    ठाकरेंचा नाशिकमधील नेता अडचणीत 

    लोकसभा निवडणुकीसाठी जोरात तयारी सुरू असताना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) टेन्शन वाढवणारी बातमी नाशिकमधून आली आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणात बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • 09:24 AM • 29 Feb 2024
    भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक

    भाजपने पूर्ण लक्ष लोकसभा निवडणुकीवर केंद्रीत केलं आहे. भाजपकडून लवकरच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाणार असून, त्यापूर्वी आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत आहे. 

    या बैठकीमध्ये १०० ते १२० उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पहिली यादी पुढील दोन-तीन दिवसांत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. 

    पहिल्या यादीत नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्यासह काही प्रमुख नेत्यांचा समावेश असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या मंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगण्यात आले आहे, त्यांच्या नावांचा समावेश पहिल्या यादीत असू शकतो. 

follow whatsapp