लाइव्ह

Maha Vikas Aghadi : संजय राऊतांचा अमित शाहांना टोला, 'मिशनच्या नाही कमिशनच्या गोष्टी...'

मुंबई तक

09 Mar 2024 (अपडेटेड: 09 Mar 2024, 08:04 PM)

महाराष्ट्रातील महायुतीचे जागावाटप निश्चित करण्यात यश आले आहे. मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. त्यात जागावाटप निश्चित झाल्यानंतर आता भाजपची दुसरी यादी येणार आहे. अशाच राजकीय तसंच इतर अपडेट जाणून घेण्यासाठी मुंबई तकचा लाइव्ह ब्लॉग नक्की वाचा.

Sanjay Raut Amit shah

मिशन 45 अशी घोषणा अमित शहांनी केली.

follow google news

Maharashtra News LIVE Updates : 'दिल्लीच्या जुलमापुढे महाराष्ट्र झुकणार नाही. भाजपच्या वॉशिंग मशिनमध्ये सर्व साफ होतं. कारवायांसमोर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी गुडघे टेकले. तुम्ही दिल्लीतील भांडी घासत बसा,' असं म्हणत संजय राऊतांनी निशाणा साधला. 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 07:53 PM • 09 Mar 2024
    संजय राऊतांनी उडवली महायुतीची खिल्ली

    नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा आणला. त्याच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला. तो पुरेना म्हणून नांदेड वाल्याचा हात धरला, अशी खिल्ली संजय राऊतांनी महायुतीच्या नेत्यांनी उडवली आहे. 

    हातामध्ये बॅट न धरता हा जय शहा भारतीय क्रिकेटचा अध्यक्ष झाला. मला कोणीतरी विचारलं जय शहाचा आणि क्रिकेटचा संबंध काय ? मी म्हटलं सुनील गावस्करला क्रिकेट त्यांनी शिकवलं आहे. कपिल देवला बॉल कसा घासायचा आहे हे त्यांनी शिकवलं. वीरेंद्र सेहवागला सिक्सर मारता येत नव्हता तो या जय शहाने शिकवला, अशा शब्दात राऊतांनी अमित शाहांवर पलटवार केला आहे. 

  • 07:52 PM • 09 Mar 2024
    संजय राऊतांचा अमित शाहांना टोला

    मिशन 45 अशी घोषणा अमित शहांनी केली. मिशनच्या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्ही कमिशनच्या गोष्टी करा, असा टोला संजय राऊत यांनी अमित शाहांना लगावला आहे. 

    संजय राऊत पुढे म्हणाले, पवार साहेबांनी व्यासपीठावरून मला दाखवले, पहा इथे किती पांढऱ्या टोप्या आहेत. सूर्य मावळल्यानंतर या प्रकाशात टोप्या अजून उजळून निघाल्या. स्वच्छ चकचकीत या टोप्या बीजेपीच्या वॉशिंग मशीन मधून धुवून निघालेल्या नाहीत. या ओरिजनल, प्रामाणिक आणि मुख्यतः बदलणाऱ्या टोप्या नाहीयेत. 

  • 07:49 PM • 09 Mar 2024
    सुप्रिया सुळे कधीही संघर्ष पत्करेल

    धार आली आहे माझ्या भाषणाला, याचं कारण माझ्याकडे दोन मार्ग होते. एका बाजूला सत्ता होती आणि अदृश्य शक्ती होती आणि दुसऱ्या बाजूला विचार, संघर्ष आणि वडील..! सत्ता कि संघर्ष ? सुप्रिया सुळे कधीही संघर्ष पत्करेल, कारण मी एक स्वाभिमानी मुलगी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. 
     

  • 07:22 PM • 09 Mar 2024
    तुमचा पक्ष कमिशनवाला, संजय राऊतांचा शाहांवर पलटवार

    "परवा अमित शाह महाराष्ट्रात आले आणि म्हणाले की, मिशन ४५. मिशनच्या गोष्टी तुम्ही करू नका. तुम्ही कमिशनवाले आहात. तुमचा पक्ष कमिशनवाला आहे. आमचं मिशन आहे", अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 06:59 PM • 09 Mar 2024
    ''माझी लढाई दिल्लीच्या अदृष्य शक्तीविरोधात''

    माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही. माझी लढाई ही दिल्लीच्या तख्ताच्या अदृष्य शक्तीच्या विरोधात आहे. ज्याने महाराष्ट्राविरोधात रान उठवले आहे. महाराष्ट्राचा द्वेश आणि विरोध करण्यासाठी केंद्र सरकार आपल्या मागे लागले आहे. 

  • 05:19 PM • 09 Mar 2024
    'लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या पुढे मी तुमची काळजी घेईल'- पंकजा मुंडे

    बीड जिल्ह्यातल्या शिरूर येथे सिद्धेश्वर देवस्थान संस्थांच्या हरिनाम सप्ताहा सांगता सोहळ्याला पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी भाषणामध्ये बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'मी सध्या माजी असून तुम्हाला काय देऊ असा प्रश्न मला पडतो. मंचावर बसलेले सुरेश धस, बाळासाहेब आजबे, प्रीतम मुंडे हे सत्ताधारी आहेत. त्यामुळे आजी लोकांनी माजी लोकांची काळजी घ्यावी असं म्हणत लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही माझी काळजी घ्या. पुढे मी तुमची काळजी घेईल', असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत..

    'मला कोणी माजी केलं हे आता सांगता पण येत नाही कारण सगळेच एकत्र आले आहेत. पण जेव्हा माझ्यावर रेड पडली तेव्हा माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी 11 कोटी रुपये जमा केले हे माझं लोकांच्या हृदयाशी जोडलेलं नातं आहे. सरकार सध्या तीन इंजनने जोडलेला असून काही वेळ हे इंजन एकमेकांना भिडले होते. मात्र आता ते बरोबर पटरीवर चालत आहेत.' असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

  • 05:00 PM • 09 Mar 2024
    पोहण्यासाठी नदीत  उतरलेल्या  तिघांचा बुडून मृत्यू

    महाशिवरात्रीनिमित्त सुटी असल्याने पाटाळ्याच्या  यात्रेसाठी गेलेले तिघे तरुण  वर्धा नदीत  पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही वर्धा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केले पण यश आले नाही. प्रशासनाच्या वतीने रात्री उशिरा पर्यंत शोध मोहिम सुरू होती. संकेत पुंडलिक नगराळे, अनिरुद्ध चापले, हर्ष चापले अशी बुडालेल्या तरुणांची नाव आहे.  

    महाशिवरात्रीनिमित्ताने ते चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळी येथे यात्रेसाठी गेले होते. वणी येथे परत येताना ते वर्धा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने एक मित्र बुडत होता. त्याला वाचवण्यासाठी इतर मित्र मदत करायला गेले. यात तिघे ही बुडाले. घटनेची माहिती वणी व माजरी पोलिसांना देण्यात आली. स्थानिकांच्या मदतीने काही काळ या तिघांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अंधार झाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले. सकाळी एनडीआरएफची पथकाद्वारे शोध घेणे सुरू आहे.

  • 04:28 PM • 09 Mar 2024
    उद्धव ठाकरेंचे पुन्हा 'बंद खोलीतील' रडगाणे सुरु- चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

    उद्धव ठाकरेंवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार

    आई तुळजाभवानीची कशाला खोटी शपथ घेता?, बावनकुळेंचा थेट सवाल

    शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणत उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले

    उद्धव ठाकरेंनी खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नये

    भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्टिटवरुन काय प्रत्युत्तर दिलंय पाहुयात

    उद्धव ठाकरे , तुम्ही खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका

    उद्धवजी, 

    शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणतच वेळ येताच दगाबाजी करून अविचारी आघाडीच्या मांडीवर बसत मुख्यमंत्रीपद स्वतःच पटकावले. हा सामान्य शिवसैनिकांशी विश्वासघात नाही का? 

    ज्यांनी तुम्हाला भावासारखे प्रेम दिले. त्यांचे तुम्ही फोन घेतले नाहीत. अबोला धरला. दगाबाजी केली. तुम्ही बारामती व दिल्लीसमोर कुर्निंसात करत होते.

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची कशाला खोटी शपथ घेता. तुम्हीच दगाबाजी केली! होय, तुम्हीच!! निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभा आदरणीय मोदीजी, आदरणीय अमित भाई घेत होते, तेंव्हाच हा खुलासा का केला नाही? 
    कारण, काँग्रेस आणि शरद पवार यांच्याशी तुमच्या गोपनीय चर्चा सुरु होत्या. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून होतो.
    आणि आता कुलस्वामिनीसमोर शपथ घेता?

    आता तुमचे पद गेले, पक्ष गेला, निशाणी गेली, विश्वासू माणसेही गेली. हिंदुत्व नासवले,  स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानावर मूग गिळून बसले, सनातन धर्मावर मिंधे झाले. प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनेत राजकारण आणले..हाती धुपाटणे आले म्हणून पुन्हा 'बंद खोलीतील' रडगाणे सुरु झाले.

    तुम्ही आमचा विश्वासघात केला, आता किमान देवी देवतांचा विश्वासघात करू नका.
     

  • 04:12 PM • 09 Mar 2024
    कोयना धरणावर जल पर्यटन प्रकल्प

    कोयना धरणातील शिवसागर जलाशयात मुनावळे येथे जलपर्यटनाच्या प्रकल्पाचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. गोड्या पाण्यातील हा देशातला पहिलाच जल पर्यटन प्रकल्प आहे. त्याच्या उदघाटनावेळी मुख्यमंत्री यांनी या प्रकल्पामुळं स्थानिकांना कसा फायदा होईल हे सांगितलं. हा प्रकल्प करताना पर्यावरणाचा सुद्धा विचार करण्यात आला आहे.

     

  • 04:11 PM • 09 Mar 2024
    शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होवू नये का?- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    जन्मताच सोन्याचा चमचा तोंडी घेतलेल्यांनाच मुख्यमंत्री होण्याचा अधिकार आहे का? शेतकऱ्यांच्या मुलाने मुख्यमंत्री होवू नये का? असा सवाल सातारा पाटण येथे एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

     

  • 04:10 PM • 09 Mar 2024
    सातारा, बीड लोकसभेच्या जागेबाबत आमची चर्चा झाली - जयंत पाटील

    सातारा, बीड लोकसभेच्या जागेबाबत आमची चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.

  • 03:25 PM • 09 Mar 2024
    काँग्रेसमधील सुपारीबाजांची नावं तीन-चार दिवसांत जाहीर करणार- आंबेडकर 

    महाविकास आघाडी आणि मविआतील धुसफूस अद्याप सुरुच आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसमधील सुपारीबाजांची नाव तीन-चार दिवसांत जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

  • 01:33 PM • 09 Mar 2024
    राज ठाकरेंनी भाजपला करून दिली 'त्या' घोषणेची आठवण!

    राज ठाकरे भाषण 

    - राज ठाकरेंनी कार्यकर्त्याना सोशल मीडिया वापरावरून सुनावले, 
    -सोशल मीडियावरून पक्षाच्या नावाने काही टाकले तर लोक पहात नाही, 
    - केतन जोशी मनसे सोशल मीडिया प्रमुख, यांची जिल्ह्याजिल्ह्यात व्याख्याने ठेवणार
    - महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात वर्धापन दिन साजरा करणार हे ठरवले आहे.
    - 18 वर्ष झाले पक्षाला, राजकीय इतिहास सांगणार
    -मंनसैनिकाना राजकारणात वावरायचे असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स, 
    - 2014 चे नरेंद्र मोदींचे यश हे त्यांचे आहे, त्यातला काही भाग असेलही, पण ते यश कित्येक वर्षे झटणाऱ्या, खस्ता खाल्लेल्या पक्ष कार्यकर्त्यांचे आहे, 
    -गेल्या 18 वर्षे माझे भाग्य समजतो की अनेक चढउतार बघितले, चढ कमी बघितले पण उतारच जास्त आलेत, तरी तुम्ही माझ्याबरोबर आहात
    - माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहे, 
    - महाराष्ट्रात दुसऱ्याची पोर खेळवायची पद्धत सुरु आहे,
    - राष्ट्रवादी हा पक्ष नाही, निवडून आलेल्या लोकांची मोळी, पवार हेच करत आले, 
    - महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पक्ष स्थापन झले ते जनसंघ, शिवसेना आणि मनसे
    - आपल्याकडे विचार करणे ही मेहनत आहे असे कुणी मानत नाही, धावपळ करणे हीच मेहनत, नशिब महाराजांच्या वेळेत सोशल मीडिया नव्हता,
    - 9 एप्रिल गुढीपाडवा सभेला भरपूर गोष्टी बोलणार
    -मनसेने अनेक कामे केली अनेकांनी तुरुंगवास भोगला माझ्यासकट, विरोधक पत्रकार ही आहेत, 
    - अरबी समुद्रात शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले ?
    - मनसे मुळे मोबाईलवर मराठी ऐकू लागले, टोल नाके बंद झाले,मराठी पाट्या झाल्या
    -प्रार्थनास्थळावरचे भोंगे काढायला सांगितले, हे भित्रे सरकार, मागील उद्धव ठाकरे सरकार ने ह्या आंदोलनात 17 हजार सैनिकांवर गुन्हे दाखल केले, हे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात, हे राज्य हातात द्या सर्व भोंगे बंद करतो, 
    - समुद्रावरती अनधिकृत दर्गा रात्रीतून पाडायला लावला, मुस्लिम समाजाने प्रतिक्रिया नाही दिली, दर्गा जिथे होत होता तेथे 100 फुटावर पोलिस स्टेशन होते
    - 18 वर्षात जेवढे आंदोलन केली, यशस्वी आंदोलन केली, तेवढी कोणत्याही पक्षाने आंदोलन केली नाहीत, 
    - लोकांमध्ये फिरतो तेव्हा लोक म्हणतात की बाबा तुझ्यावर विश्वस आहे, 
    - राजकारणात कोण कुठे आहे, विचारावे लागते, --सगळे आतून एकाच आहे, वेड्यात काढत आहे, 

    -महाराष्ट्र एकसंध राहू नये म्हणून जातीचे विष पेरले, 

    - जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा सांगितले होते हे technically होऊ शकत नाही, होणार नाही असे नाही, 
    - आज प्रश्न आहे नोकऱ्यांचा, बाहेरचे लोक आम्ही पोसायची, 
    - महाराष्ट्राला सहज शक्य आहे, प्रत्येक जन्माला आलेल्या मुलाला नोकरी देऊ शकता, 
    - तुम्ही एकत्र येऊ नये म्हणून जातीचे विष, मराठा आले की ओबीसी येतात, 
    - महापुरुषांचे वाटप झालंय , ह्यांनीच केलंय, ।
    - काँग्रेसच्या काळात निघाले होते की statue of liberty पेक्षा मोठा पुतळा बनवायचा, तर मी म्हटले होते की शक्य नाही, लिबर्टी पुतळा आयलँड वर आहे, इथे समुद्रात भर घालायची तर 20-25 हजार कोटी लागतील, 
    - खरे कर्तृत्व गड किल्ले आहे, पुढच्या पिढ्याना काय पुतळे दाखवायचे, की किल्ले दाखवायचे, 
    - आताचे चाललेले राजकारण हे अळवावरचे पाणी, 
    - मला मनसेत कुणीही हा वरचा, खालचा असे भेद चालणार नाही,
    -येणाऱ्या निवडणुकांच्या बाबत लवकर सांगेल

  • 01:19 PM • 09 Mar 2024
    छत्रपतींच्या 'त्या' पुतळ्याचे काय झाले? - राज ठाकरे 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येऊन मुंबईच्या अरबी समुद्रात फुलं वाहिली पण पुढे शिवाजी महाराजांच्या त्या  पुतळ्याचे काय झाले? असा सवाल  राज ठाकरे  यांनी नाशिकमध्ये विचारला

  • 01:09 PM • 09 Mar 2024
    'सध्या महाष्ट्रात दुसऱ्याची मुलं कडेवर घेतली जात आहेत'; राज ठाकरेंचा भाजपला टोला!

    सोशल मीडियाचा फायदा पक्षासाठी होऊ शकतो. यामुळे त्याचा प्रभावीपणे वापर केला पाहिजे. असं राज ठाकरेंनी सांगितलं. मनसैनिकांसाठी खास व्याख्यानं आयोजिक करणार आहे. 'आज मनसेचा 18 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने हा कार्यक्रम नाशिकमध्ये होत आहे. प्रत्येक वर्षी पक्षाचा वर्धापनदिन वेगळ्या शहरात साजरा करणार. पक्षाला आज 18 वर्ष पूर्ण झाली, मी आज राजकीय इतिहास सांगणार. राजकारणात टिकायचं असेल तर संयम महत्त्वाचा असतो. गेल्या 18 वर्षांमध्ये मी चढ कमी पाहिले उतार अधिक पाहिले. राजकारणात टिकायचं असेल तर संयम महत्त्वाचा असतो. आपल्याला यश मिळणारच मी मिळवून देणारच. 2014 मध्ये मोदींना मिळालेलं यश हे पक्षात झटत असलेल्या कार्यकर्त्यांचं आहे. वायपेयी, अडवाणी गोपीनाथ मुंडेंच्.ा कार्यामुळे भाजपला यश आलं आहे.' असं राज ठाकरे भाणात म्हणाले.


     

  • 12:07 PM • 09 Mar 2024
    मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज

    भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, डोंगराळ भागात आज मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीची दाट शक्यता आहे. येत्या 24 तासांत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. तर राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये ढगाळ वातावरण राहील. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

follow whatsapp