लाइव्ह

Maharashtra News Updates : खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आणखी एक पवार मैदानात!

मुंबई तक

15 Mar 2024 (अपडेटेड: 15 Mar 2024, 04:18 PM)

भाजपच्या लोकसभा उमेदवाराची 20 जणांची यादी जाहीर झाल्यानंतर वेटिंगवर असलेल्यांची मात्र धाकधूक निर्माण झाली आहे. तसंच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर आजपासून दोन रुपयांनी स्वस्त केले आहे. अशाच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मुंबई तकचा हा लाइव्ह ब्लॉग नक्की पाहा.

Mumbaitak
follow google news

Marathi News LIVE Updates :  लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला काहीसा दिलासा देत मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्क प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) माहिती दिली आहे की, त्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सुधारित केल्या आहेत. नवीन किंमती 15 मार्च 2024 सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतील. पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

लाइव्हब्लॉग बंद

  • 04:44 PM • 15 Mar 2024
    घरी बसून काही कळत नाही फिल्डवर जावे लागते- एकनाथ शिंदे

    घरी बसून काही समजत नाही, त्यासाठी फिल्डवर जावे लागते असा टोमणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. नायर दंत महाविद्यालयाच्या विस्तारीत इमारतीला शिंदे यांनी भेट दिल्यानंतर ते बोलत होते

  • 04:09 PM • 15 Mar 2024
    खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आणखी एक पवार मैदानात!

    बारामती लोकसभेसाठी खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत रंगताना दिसत असतानाच आज बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जय पवार मैदानात दिसले तर इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सुरू असलेले गाव संपर्क दौऱ्यांमध्ये  रोहित पवार यांच्या भगिनी सई पवार यांनी हजेरी लावत सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सक्रिय झाल्याचे दिसले. यावेळी सुनंदा पवार यांनी घड्याळ्याला घरघर लागलीय अशी टिका केली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार एक तर चिन्ह काढून घेतले जाईल, किंवा गोठवले जाईल. पळविणे सोपे असते, टिकवणे अवघड असते, असे म्हटलंय.

  • 03:47 PM • 15 Mar 2024
    केंद्रीय मंत्री भागवत कराड दादा जाधवराव यांच्या भेटीला 

    देशात सध्या लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे.त्यामध्ये सध्या बारामती लोकसभा मतदार संघावर भाजपने चांगलच लक्ष केंद्रित केलं य ..आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे बारामती लोकसभा मतदार संघाच्या  दौऱ्यावर आले आहेत.आज सकाळी त्यांनी जाधववाडी येथे जावून माजी मंत्री दादा जाधवराव यांची भेट घेतलीय..बारामती लोकसभा मतदार संघ  राष्ट्रवादी काँग्रेसकडे  गेला असला तरी देखील 400 जागांचा टप्पा घटण्यासाठी भाजपकडून मित्र पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार देखील केला  जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर कराड हे आज बारामती लोकसभा मतदार संघात लोकांच्या गाठी भेटी घेत आहेत. दादा जाधवराव हे 35 वर्ष पुरंदरचे आमदार होते. काहीकाळ ते राज्यमंत्री सुद्धा होते. त्यामुळे पुरंदर तालुक्यात जाधवराव यांना मानणारा मोठा वर्ग आहे. यापूर्वी सुप्रिया सुळे,सुनेत्रा पवार यांनीही दादा जाधवराव यांची भेट घेतलीय..

  • 02:55 PM • 15 Mar 2024
    संजय लाखे पाटलांनी सोडला काँग्रेसचा हात, बांधले शिवबंधन!

    काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटलांनी आज काँग्रेसचा हात सोडत हाती शिवबंधवन बांधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला आहे. मुंबई येथील मातोश्री निवासस्थानावर डॉ. संजय लाखे पाटलांनी आज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. लाखे पाटलांनी काँग्रेसचा हात सोडल्याने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. याशिवाय शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढण्यास यामुळे मदत होणार आहे. आता संजय लाखे पाटील उबाठा गटाकडून जालना लोकसभेसाठी उभे राहणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

  • 02:38 PM • 15 Mar 2024
    अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल, 81व्या वर्षी अँजिओप्लास्टी

    बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. बिग बी यांना आज (शुक्रवारी) सकाळी 6 वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

  • 12:41 PM • 15 Mar 2024
    लोकसभा निवडणुकीची उद्या दुपारी 3 वाजता होणार घोषणा

    आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होतील. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससारख्या पक्षांनी आतापर्यंत त्यांच्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने दुपारी 3 वाजता या संदर्भात पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीची घोषणा केली जाईल आणि त्यानंतर आचारसंहिता लागेल.

  • 10:59 AM • 15 Mar 2024
    आज पालघरमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा!

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज पालघरमध्ये आली आहे. भारत जोडो रॅली सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. वाडा येथे राहुल गांधी स्थानिक लोकांशी संवाद साधणार आहेत. पुढे भिवंडीच्या आनंद दिघे चौकात राहुल गांधीचे स्वागत करण्यात येणार आहे. ठाण्याच्या सोनाळे मैदानावर रात्री राहुल गांधी यांचा मुक्काम असणार आहे.

  • 10:58 AM • 15 Mar 2024
    नवी मुबंईत मनसेला धक्का

    मनसे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेना नारायण म्हात्रे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौघुले यांच्या नेतृत्वात प्रवेश. नवी मुबंईत मनसेला धक्का.

     

  • 10:50 AM • 15 Mar 2024
    'माझ्या मतदारसंघात दमदाटी केली तर गाठ माझ्याशी', सुप्रिया सुळेंचा दादांना इशारा!

    बारामती मतदारसंघात किंवा राज्यात आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली? तर गाठ माझ्याशी आहे..सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला ईशारा दिला. 'भाजप आणि राष्ट्रवादीमधील नेते एकमेकांना धमकी देत आहेत ? ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? हर्षवर्धन पाटलांना धमकी द्याल तर गाठ माझ्याशी आहे. सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे. त्यामुळे त्यांची सगळी मस्ती जनता लवकरच उतरवेल. आम्ही लोकशाहीने निवडणूक लढवत आहोत त्यामुळे आम्ही दडपशाहीला घाबरणार नाही.' यावेळी सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील मेळाव्यात बोलत होत्या..

  • 09:27 AM • 15 Mar 2024
    मनोज जरांगे यांच्यासह 13 जणांवर गुन्हा दाखल!

    मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी (13 मार्च) अंबाजोगाईत संवाद बैठक झाली. याप्रसंगी खोटी माहिती प्रसारित करून सरकार विरोधात प्रक्षोभक भाषण आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून मनोज जरांगे यांच्यासह आयोजकांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंबाजोगाईत साधना मंगल कार्यालयात बुधवारी रात्री ८ वाजता सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, जरांगे पाटील यांना येण्यासाठी उशीर झाला आणि ही बैठक रात्री १० वाजताच्या नंतर सुरु झाली. त्यामुळे रात्री १० च्या नंतर ध्वनिक्षेपक चालू ठेऊन बैठकीसाठी दिलेल्या परवान्याचे आणि सर्वोच्च न्यालयाच्या आदेशाचे उलंघन केल्याच्या आरोप पोलिसांनी केला आहे. 

follow whatsapp