Marathi News LIVE Updates : शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) १७ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. या यादीत अमोल कीर्तिकर यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
या लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा केला जात होता. या मतदारसंघातून संजय निरुपम हे आग्रही होते. त्यांनी अमोल कीर्तिकर यांच्यावर घोटाळेबाज आणि लाचखोर असे आरोप केले होते.
मात्र, आता ठाकरेंनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता संजय निरुपम काय करणार, याची उत्सुकता आहे. निरुपम एकनात शिंदेंच्या सेनेत जाऊ शकतात, असेही म्हटले जात आहे.
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 07:11 PM • 27 Mar 2024अमरावती लोकसभा मतदार संघातून नवनीत राणांना उमेदवारी
अमरावती लोकसभा मतदार संघातून भापजने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राणांच्या या उमेदवारीला शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी विरोध केला होता. या विरोधानंतर आता बच्चू कडू काय भूमिका मांडतात. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- 04:06 PM • 27 Mar 2024''कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीचा प्रश्न उद्भवत नाही''
कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं कुठच ठरलं नव्हतं. आणि ते आम्हाला मान्य नाही. कोल्हापूरची जागा शाहु महाराजांना ज्या पक्षातून लढतील, त्या पक्षाला ती जागा देण्यात यावी, असे तीन पक्षाच्या नेत्यांमध्ये ठरले होते. शाहु महाराजांनी स्वत: हून काँग्रेस पक्ष निवडला. त्यामुळे कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीचा प्रश्न उद्भवत नाही.
हातकणंगलेमध्ये शिवसेनेचे खासदार होते. ती जागा शिवसेनेनी लढावी, महाविकास आघाडीत राजू शेट्टींना द्यावी. या जागेबाबत काँग्रेसचे दिल्लीतीले नेते शिवेसेना आणि राष्ट्रवादीशी बोलतील.
आम्हाला खात्री आहे काँग्रेस पक्षाकडून ही जागा काँग्रेसला दिली जाईल. त्याचबरोबर शेवटचा पर्याय म्हणून त्याच जागेवर मैत्रीपुर्ण लढतीसाठी ही आम्ही तयार आहोत, असे विश्वजित कदम यांनी सांगितले.
- 03:21 PM • 27 Mar 2024बारामतीत सुनेत्रा पवार यांनी घेतले संत तुकाराम महाराजांचे दर्शन
बारामती तालुक्यातील डोरलेवाडी गावात तुकाराम महाराज बीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी हजेरी लावली.
- 01:18 PM • 27 Mar 2024शिंदेंनी विद्यमान खासदाराचं तिकीट कापलं, जाहीर केला पहिला उमेदवार
रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने माजी आमदार राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी याची माहिती दिली.
एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले, रामटेकचे आमचे राजू पारवे हे देखील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या भूमीतून उभे आहेत. त्यांनी देखील सांगितलेलं आहे की काँग्रेसमध्ये काही राम राहिलेला नाही. विद्यमान आमदार असताना त्यांनी महायुतीची उमेदवारी घेतलेली आहे. त्यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या पाठिंशी आमचे खासदार कृपाल तुमाने हे भक्कमपणे उभे आहेत. तुमाने यांनाही मी मोठी जबाबदारी देणार आहे. तुमाने यांच्या दहा वर्षातील कामाची पोचपावती या निवडणुकीत मिळेल", असे शिंदे म्हणाले.
- 01:02 PM • 27 Mar 2024सांगली लोकसभा मतदार संघाचा तिढा दिल्लीच्या दारी
सांगली लोकसभा मतदार संघाचा तिढा दिल्लीच्या दारी पोहोचला आहे. विश्वजित कदम आणि सांगली काँग्रेसचं शिष्टमंडळ दिल्लीत दाखल झालं आहे. आज दुपारी पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. सांगलीची जागा शिवसेनेने जाहीर केल्याने काँग्रेस नेते नाराज असल्याची माहिती आहे. सांगलीचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील देखील सोबत आहेत.
- 11:27 AM • 27 Mar 2024आताची मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांकडून स्वतंत्र लढण्याची घोषणा
मनोज जरांगेंसोबत काल सविस्तर चर्चा झाली. ओबीसी, मुस्लिम, जैन समाजाचे उमेदवार दिले जाणार. गरीब कुटुंबातील उमेदवारांना संधी देण्यास प्राधान्य दिलं जाणार. जरांगेंनी सांगितलं 30 मार्चपर्यंत थांबा, त्यामुळे थांबणार. काहींनी घराणेशाही वाचवण्यासाठी वंचितचा वापर केला. युती करण्याबाबत मनोज जरांगेंसोबत सविस्तर चर्चा झाली. त्यांच्यासोबत एक वेगळा राजकीय आयाम देण्याचा प्रयत्न आहे. भंडारातून संजय केवट यांना उमेदवारी, गडचिरोलीतून हितेश मढावींना उमेदवारी, चंद्रपूरमधून राजेश बेले यांना उमेदवारी, बारामतीतून प्रकाश शेंडगं लढल्याल त्यांना पाठिंबा देणार असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे. तसंच मविआसोबत न जाण्याचा वंचितने निर्णय घेतला आहे.
- 10:38 AM • 27 Mar 2024Shiv Sena UBT List : ठाकरेंच्या यादीवर काँग्रेसमध्ये नाराजी
ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील नाराजी आता समोर येऊ लागली आहे. संजय निरुपम हे आधीपासूनच ठाकरेंवर टीका करत आहेत. त्यात आता काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनीही टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करून मित्रपक्ष म्हणून काँग्रेसची ते किती किंमत आणि सन्मान करतात हेच दाखवून दिले आहे. शिवसेनेविरोधात बोललो म्हणून माझ्यावर टीका झाली, पण एक दिवस लोकांना कळेल की, या आघाडीमुळे फक्त महाराष्ट्रातील काँग्रेस केडरला कसा फटका बसला आहे", असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT