PM Modi yavatmal visit Marathi News Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी या कार्यक्रमात काय बोलणार हे महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू आहेत. याबद्दलच्या सर्व अपडेट वाचा एकाच ठिकाणी...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 07:35 PM • 28 Feb 2024PM मोदींचा कॉग्रेसवर जोरदार हल्ला
महाराष्ट्रातले कृषिमंत्री असताना पॅकेज जाहीर व्हायचे, इंडिया आघा़डीची केंद्रात सरकार होते, तेव्हा काय स्थिती होती, दिल्लीतून विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या नावावर पैसा घोषित व्हायचा, तेव्हा तो लुटला जायचा आणि गरीब, शेतकरी, आदिवासींना काहीच मिळायचं नाही.पण आज मी एक बटण दाबले आणि पीएम किसान सन्मान निधीचे 21 हजार करोड रूपये देशाच्या करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले, हीच तर मोदींची गँरंटी आहे.
कॉग्रेसचे सरकार होते तेव्हा दिल्लीतून 1 रूपया निघायचा आणि 15 पैसै पोहोचायचे, जर काँग्रेसची सरकार असती तर आज जे तुम्हाला 21 हजार करोड रूपये मिळाले आहेत, त्यामधील 18 हजार करोड रूपये मध्येच लुटले गेले असते, असा गंभीर आरोप करत मोदींनी, भाजप सरकारच्या काळाचा गरिबाला पैसा मिळतोय, ही मोदीची गॅरंटी आहे, असा विश्वास व्यक्त केला.
- 07:11 PM • 28 Feb 2024पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
काँग्रेसच्या काळात आदिवासी समाजाला मागे ठेवण्यात आले होते. त्यांना सोयी सुविधा दिल्या नाहीत. पण मोदींनी मागासलेल्या जातींच्या नागरीकांची चिंता केली. पहिल्यांदाच त्याच्या विकासासाठी 23 हजार कोटी रूपयाची पीए जन मन योजना सुरु केली आहे. ही योजना महाराष्ट्राचे कातकरी, कोलाम आणि माडीया अनेक जातीच्या समाजाला चांगलं जीवन देईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
- 07:06 PM • 28 Feb 2024सरकार महिलांना ड्रोन देणार- पंतप्रधान मोदी
यवतमाळ जिल्ह्यातील अनेक महिलांना ई रिक्षा देण्यात आल्या आहेत. आता महिला ड्रोन देखील चालवतील. नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन चालवण्याची ट्रेनिंग देईल. त्यानंतर सरकार या महिलांना ड्रोन देणार आहे. या ड्रोनचा महिलांना शेतीच्या कामासाठी फायदा होणार आहे.
- 07:01 PM • 28 Feb 2024पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्ला
2014 पुर्वी देशातील गावात हाहाकार होता, मात्र इंडिया आघाडीला याची कोणतीच काळजी नव्हती. आझादीपासून ते 2014 पर्यंत 100 मधून फक्त 15 घरांमध्ये नळाने पाणी यायच. यामध्ये गरिब, दलित, आदीवासी होते त्यांना याचा लाभच मिळायचा नाही. हे आपल्या माता-भगिणीवर संकट होते. पण लाल किल्यावर मोदींनी हर घर जल पोहोचवण्याची गॅरंटी दिली आहे. त्यामुळे 100 मधून 75 टक्के लोकांच्या घरी पाणी आले आहे. मोदीची गॅरटी म्हणजे गॅरंटी पुर्ण होण्याची गॅरंटी आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
- 06:51 PM • 28 Feb 2024'अब की बार, 400 पार', यवतमाळमधून पंतप्रधान मोदींची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली आहे. आपल्या सर्वांना माझा नमस्कार... छत्रपतींच्या पावन भूमीला वंदन करतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही मी नमन करतो, असे मोदी म्हणाले आहेत. 10 वर्षापर्वी यवतमाळमध्ये आलो होतो देशाच्या जनतेने 300 पार पोहोचवलं होतं. 2019 मध्ये फेब्रुवारी महिन्यात आलो होतो, त्यावेळी देखील एनडीएला 350 च्या पार केले
आज 2024 मध्ये विकासाच्या उत्सवात सामील व्हायला आलो आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. - 06:41 PM • 28 Feb 2024'मोदींनी आपलं संपूर्ण जीवन...', यवतमाळमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री काय म्हणाले?
'मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं लोकर्पण होणार आहे. नमो महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत ५५ लाख महिलांना लाभ मिळेल. देशाच्या सुवर्णकाळाचे नरेंद्र मोदी शिल्पकार आहेत. मोदींच्या नेतृत्वात देशाची महासत्तेकडे वाटचाल झाली. 10 वर्षात मोदींनी एकही सुट्टी घेतली नाही. मोदी विजयाची हॅट्रिक करणार, ही जनतेची गॅरंटी आहे. मोदींनी आपलं संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी समर्पित केलं आहे.' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींबद्दल कार्यक्रमात म्हणाले.
- 03:14 PM • 28 Feb 2024"मी म्हणजे मराठा समाज हे जरांगेंनी डोक्यातून काढलं पाहिजे"
राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना सुनावलं. "मनोज जरांगे यांना मराठा समाज्याने फार मोठे आदरस्थान दिले होते. मला मनोज जरांगेना सांगायचं कि मी म्हणजे मराठा समाज आहे ते त्यांनी डोक्यातून काढून टाकलं पाहिजे", असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, "मराठा समाजाच्या भावनांशी खेळणं बंद केलं पाहिजे. देवेंद्र फडवणीस यांच्यावर जी बेताल वक्तव्य केली, ती कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही. दोन्ही सभागृहात आरक्षणाचे जीआर काढले. तुम्हाला मान्य नाही म्हणजे समाजाला मान्य नाही, असं नाही. तुम्ही म्हणजे समाज नाही, आंदोलना करता समाजाने पाठबळ दिले, त्यावर तुम्हाला स्वतःचं काही साध्य करायचं का? समाज एवढा भोळा नाही, या बाबतीत समाजात जागृती करायचे काम देखील मी हाती घेईल", असा इशारा राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
- 11:53 AM • 28 Feb 2024मविआच्या जागावाटप ठरलं? राऊतांनी दिली महत्त्वाची अपडेट
संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
१) "महाविकास आघाडीचं जागावाटप हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. काल सुद्धा आम्ही तीन प्रमुख पक्ष, वंचित बहुजन आघाडीसह आमची चर्चा झाली. आज पुन्हा आम्ही बैठकीला बसणार आहोत. आज अंतिम बैठक असेल कारण आता फार उशीर लावण्यात अर्थ नाही."
२) "आमच्या चारही पक्षांमध्ये जागावाटपा संदर्भात कोणताही संभ्रम नाही, उगाच वरबडून घ्यायचं, जागांचा आकडा वाढवायचा हे धोरण नाही. प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची आहे. कालच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते, त्यांचीही तीच भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडीने सुद्धा मान्यता दिलेली आहे."
३) "महाराष्ट्रातली प्रत्येक जागा जिंकून देशाच्या संविधानावर जो हल्ला होत आहे, तो हल्ला परतवून लावायचा आमची सर्वांची भूमिका आहे. हुकूमशाही विरुद्ध लढायचं. देशाच्या लोकशाहीची पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठा करायची आणि देशाच्या संविधानाला जो धोका निर्माण झालेला आहे, त्या संविधानाचे रक्षण करण्यासाठी त्यासाठी आम्ही एकत्रित काम करू हा आमचा निर्णय आहे."
- 11:10 AM • 28 Feb 2024'मी सुद्धा कान धरले असते की चूक झाली', जरांगे स्पष्टच बोलले
छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेत असलेल्या मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरूये की ती इंग्रजांनी सुद्धा कधी केली नसेल. गृहमंत्र्यांच्या भयानक जातीय द्वेष मराठ्यांविषयी सुरू आहे. बंदूकीचा फोटो इन्स्टाग्रामला टाकणं, ती खुन्नस मराठ्यांना दाखवणं", असे जरांगे फडणवीसांबद्दल बोलले.
"६ कोटी मराठ्यांसाठी मी भांडतोय. मी बोललोय नेत्याला. राग आलाय मराठ्याच्या नेत्याला. का आला? आमच्या नेत्याला का बोलला? तुझा नेता आहे की जात आहे? तुला नेत्याने जवळ का केलंय माहितीये का, कारण या गोरगरीब मराठ्यांनी तुला मतदान केलंय. सगळ्या आमदारांची जबाबदारी आहे की, तुमच्या नेत्याला विचारा की अधिसूचना तुम्ही काढलीये ना... ती द्या मग ते कसंकाय येड्यावानी करतात बघू. मग मी सुद्धा कान धरले असते की माझी चूक आहे. तुमच्या नेत्याने धोका दिला आहे म्हणून त्याला बोललो आहे", असे मनोज जरांगेंनी मराठा आमदारांना सुनावलं.
- 09:51 AM • 28 Feb 2024मोदींचं मिशन महाराष्ट्र... कधी केले दौरे?
- डिसेंबर २०२२ हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन, तर नागपूर मेट्रो टप्पा १ चे लोकार्पण आणि टप्पा २ ची पायाभरणी केली होती.
- १९ जानेवारी २०२३ - मुंबईत अनेक प्रकल्पांची पायाभरणी, 10 फेब्रुवारी २०२३ रोजी शिर्डी आणि सोलापूरला जोडणाऱ्या दोन वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण. मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार अंडरपासचे उद्घाटन.
- ऑगस्ट २०२३ - पुण्यातील कार्यक्रमात सहभाग, मेट्रो सेवेचे उद्घाटन.
- ऑक्टोबर २०२३ - मुंबईतील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या सत्रात सहभाग.
- २६ ऑक्टोबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरण कालव्याचे लोकार्पण. शिर्डीतील अलिशान एसी प्रतिक्षा कक्षाचे उद्घाटन.
- ४ डिसेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्गातील नौदल दिन कार्यक्रमात सहभाग.
- १२ जानेवारी २०२४ रोजी नाशिकच्या पंचवटी इथे काळाराम दर्शन आणि राष्ट्रीय युवक महोत्सवाला हजेरी.
- १२ जानेवारी २०२४ रोजी नवी मुंबईत अटल सेतूचं राष्ट्रार्पण आणि इतर पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन.
- १९ जानेवारी २०२४ रोजी सोलापूर दौऱ्यात दोन हजार कोटींच्या प्रकल्पाची पायाभरणी आणि पंतप्रधान आवास योजनेतंर्गत पूर्ण झालेल्या १५ हजार घरकुल प्रकल्पाचे उद्घाटन.
- 09:34 AM • 28 Feb 2024मोदींना यवतमाळचं आकर्षण... आतापर्यंत किती दिल्या भेटी?
- गुजरातचे मुख्यमंत्री असताना २००४ मध्ये यवतमाळला भेट.
- २० मार्च २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळमधील आर्णीजवळ शेतकऱ्यांसोबत चाय पे चर्चा आणि प्रचारसभा घेतली.
- १६ फेब्रुवारी २०१९ रोजी यवतमाळच्या पांढरकवडा इथे महिला बचत गट मेळाव्याला उपस्थित राहून संबोधित केले होते.
- आता २८ फेब्रुवारी २०२४ रोजी महिला बचत गट मेळावा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. - 09:29 AM • 28 Feb 2024मोदी यवतमाळ दौऱ्यावर... महत्त्वाच्या योजना कोणत्या?
- यवतमाळमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं उद्घाटन.
- मराठवाडा, विदर्भातील सिंचन प्रकल्पांचं लोकार्पण.
- ५०० कोटींहून अधिकच्या रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन.
- वर्धा-यवतमाळ-नांदेड, अहमदनगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पाचं उद्घाटन.
- कळंब-वर्धा, अमळनेर-आष्टी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार.
- वरोरा-वणी, साकोली-भंडारा मार्गासह नवीन रस्ते प्रकल्पांचं लोकार्पण.
- पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत २१ हजार कोटींहून अधिकच्या निधीचं हस्तांतरण
- नमो शेतकरी सन्मान निधीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचं वितरण.
- महिला बचत गटांना ८२५ कोटी निधीचं वितरण.
- एक कोटी आयुष्मान कार्डांचं वितरण.
- ओबीसींसाठी पंतप्रधान मोदी आवास घरकुल योजना. लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं हस्तांतरण.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT