११ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाने उत्तर देण्यासाठी ११ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. ही चांगली गोष्ट आहे, सुप्रीम कोर्टाचा आम्हाला आदर आहे. महाराष्ट्राची जनता या बंडखोर आमदारांना माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. जे काही बंडखोर आमदार वागले आहेत ते योग्य नाही. कायद्याच्या मंदिरात गेल्यानंतर तारीख पे तारीख चलता रहेगा असंही त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
जो वेळ मिळाला आहे त्याचा फायदा महाविकास आघाडी घेणार का? असं विचारलं असता आम्ही प्रयत्न नक्की करू असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हे आमदार जेव्हा मुंबईत येतील तेव्हा त्यांच्यासोबत नीट बोलणं करता येईल हे पण संजय राऊत यांनी म्हटलंय. ११ जुलैपर्यंत बंडखोर आमदारांचं निलंबन करू नये हे सुप्रीम कोर्टाने म्हटलंय त्याबाबत विचारलं तेव्हा संजय राऊत म्हटले की ही चांगली बाब आहे. मात्र त्यानंतर निलंबन करावंच लागेल.
निलंबन त्यांनी तूर्तास टाळलं आहे मात्र ते होणारच त्यात बदल होणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मी जे काही बोललो त्याचा विपर्यास केला गेला. ज्यांचा आत्मा मेला आहे अशा लोकांची शरीरं या ठिकाणी येतील असं मी म्हटलं होतं त्याचा विपर्यास केला गेला. तसंच मला हे म्हणायचं आहे की हे स्वतःला शिवसेनेचे वाघ म्हणवतात मग त्यांना मुंबईत यायला भीती का वाटते? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
मुंबईत जिवंत प्रेतं येतील याच आशयाने मी बोललो आहे. तरीही विपर्यास केला गेला. ईडीच्या नोटीसबाबत विचारण्यात आलं तेव्हा संजय राऊत म्हणाले की हा तपासयंत्रणांचा गैरवापरच आहे. मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही तरीही नोटीस दिली जाते आहे असंही या नोटीसबाबत संजय राऊत म्हणाले आहेत. मला हे माहित आहे की याबाबत कोण सूचना देतंय मला माहिती आहे हा आरोपही त्यांनी केला. या लोकांना विरोधकच संपवायचे आहेत. जे काही चाललंय ते चुकीचं चाललंय मी त्या एजन्सीचा आदर करतो त्यांनी बोलावलंय तर मी जाईन.
ADVERTISEMENT