मोठ्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहणार असून, भारतीय हवामान विभागाने मुंबई, पुणे, रायगडसह काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
राज्यातील काही भागात पावसाची संततधा सुरू असून, काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. आजही राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील मुंबई, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळू शकतो. त्याचबरोबर गढचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून, भारतीय हवामान विभागाने रेड अलर्टचा इशारा दिला आहे.
हवामान बदलामुळे जागतिकस्तरावर होत आहेत हे परिणाम; अहवालात झाले स्पष्ट
ठाणे, नंदुरबार, नाशिक, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गोदिंया या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मुंबईत पावसांचं धुमशान
सोमवारपासून मुंबईत पावसाचं धुमशान सुरू आहे. बुधवारी पहाटेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे मुंबईतील काही भागात पाणी साचले. पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढल्याने मुंबईत २९ ठिकाणी झाडं आणि फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. तीन ठिकाणी घर आणि घराचा काही भाग कोसळल्याच्या घटनांचीही नोंद झाली आहे.
कोल्हापूर : पूरपरिस्थिती उद्भवल्यानं शिवाजी विद्यापीठाची परीक्षा स्थगित
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या १० आणि ११ ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या कुलसचिवांनी दिली.
अमरावती जिल्ह्यात पुराचं रौद्ररूप; खेळण्यासारख्या वाहून गेल्या गाड्या
कोल्हापूर पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संतत कायम आहे. आजही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पंचगंगेच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं नदी पात्रातील पाण्याचा ओघ वाढला आहे.
पंचगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढली असून प्रशासन सतर्क झाले आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्यांनंतर प्रशासनाकडून नदी काठावरील गावं रिकामी केली जात आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे.
राधानगरी धरण 100 टक्के भरलं असून, सहाव्या क्रमाकांचा दरवाजा उघडण्यात आला आहे. राधानगरी धरणातून एकूण 3028 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. भोगावती नदी काठच्या गावांनाही दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT