महाराष्ट्रात दिवसभरात 44 हजारांपेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज, 555 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

• 04:38 PM • 21 May 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 44 हजार 493 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 50 लाख 70 हजार 801 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.71 टक्के इतके झाले आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये हे प्रमाण 81 टक्क्यांपर्यंत घसरले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. दिवसभरात 555 मृत्यूंची नोंद झाली […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 44 हजार 493 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 50 लाख 70 हजार 801 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.71 टक्के इतके झाले आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये हे प्रमाण 81 टक्क्यांपर्यंत घसरले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. दिवसभरात 555 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर हा 1.57 आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात 27 लाख 94 हजार 457 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 20 हजार 946 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात आज घडीला 3 लाख 67 हजार 457 सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 86 हजार 618 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज राज्यात 29 हजार 644 पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद जाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 55 लाख 27 हजार 92 इतकी झाली आहे.

अभिनेत्री भूमी पेडणेकर करतेय कोरोना रूग्णांची मदत; ‘त्या’ घटनेनंतर घेतला निर्णय

आज नोंद झालेल्या 555 मृत्यूंपैकी 369 मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहेत. तर 186 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतील 708 मृत्यू पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूसंख्येत करण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील एकूण मृत्यू संख्या 708 ने वाढली आहे.

महाराष्ट्रात 1 जूननंतरही Lockdown कायम राहणार का? अजित पवारांनी दिलं उत्तर

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

मुंबई – 28579

ठाणे- 26248

पुणे- 58840

सातारा- 17513

सांगली-17712

कोल्हापूर-14406

सोलापूर-18881

नाशिक-16618

अहमदनगर- 18479

नागपूर – 19745

महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यांमधली सक्रिय रूग्णांची संख्या ही अद्यापही जास्त आहे. तर इतर जिल्ह्यांची संख्या १० हजारांच्या आत आली आहे. अशात आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊन वाढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले की अजून दहा दिवस आहेत. योग्य वेळी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्रातील रूग्णसंख्या निश्चितपणे कमी झाली आहे. मात्र कोरोना उलटू शकतो हे दुसऱ्या लाटेने आपल्याला दाखवलं आहे. त्यामुळे सावधगिरीने निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp