मुंबई: महाराष्ट्राची (Maharashtra) चिंता अद्यापही कायम आहे. कारण मागील 24 तासात कोरोनाचे (Corona Paitents) 3413 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात कोरोना संसर्ग कायम असल्याचं दिसतं आहे. महाराष्ट्रात सध्या कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन नसल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, असं असताना देखील कोरोना रुग्ण आणि मृतांचा आकडा फारसा नियंत्रणात नसल्याचं दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
गेल्या 24 तासात तब्बल 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत राज्यात 1,38,518 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
गेल्या 24 तासात राज्यात 3413 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील काही महिन्यात रुग्णांची आकडेवारी ही थोडीशी कमी होताना दिसतेय. पण असं असलं तरी हा रुग्णांचा आकडा म्हणावा तेवढा कमी झालेला नाही. राज्यात सध्या 42 हजार 955 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात 19 सप्टेंबर रोजी 8326 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 63,36,887 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.16 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 49 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.12 टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,70,28,476 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,21,915 (11.44 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,81,561 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1752 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 42,955 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
-
मुंबई (Mumbai) – 5 हजार 169
-
ठाणे (Thane) – 5 हजार 919
-
पुणे (Pune) – 11 हजार 720
-
नागपूर (Nagpur) – 104
-
नाशिक (Nashik)- 1 हजार 025
-
कोल्हापूर (Kolhapur) – 818
-
अहमदनगर (Ahmednagar) – 5 हजार 036
-
सातारा (Satara) – 3 हजार 329
-
सांगली (Sangli)- 2 हजार 324
-
औरंगाबाद (Aurnagabad)- 408
प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 11 हजारांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय ठाणे जिल्ह्यात 5 हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये देखील सध्या 5 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
‘कोरोना म्हणजे थोतांड’, मास्कविरोधात आंदोलन करणाऱ्या तरुणाचा Covid-19 मुळेच मृत्यू
मुंबईत दिवसभरात सापडले 420 रूग्ण पॉझिटिव्ह
मुंबईत दिवसभरात 420 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 523 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 7 लाख 14 हजार 947 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97 टक्के आहे. डबलिंग रेट 1222 दिवसांवर गेला आहे.
ADVERTISEMENT