महाराष्ट्रात दिवसभरात 37 हजार 236 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिवसभरात 549 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात दिवसभरात 61 हजार 607 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज घडीला 5 लाख 90 हजार 818 रूग्ण सक्रिय आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण 51 लाख 38 हजार 973 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 44 लाख 69 हजार 425 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत राज्यात एकूण 76 हजार 398 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
मुंबईत दिवसभरात 1794 नवे कोरोना रूग्ण, पुण्यात 1165 पॉझिटिव्ह रूग्ण
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 96 लाख 31 हजार 127 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 51 लाख 38 हजार 973 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात आज घडीला 36 लाख 70 हजार 320 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 26 हजार 664 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला 5 लाख 90 हजार 818 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
कोरोना रूग्णांसाठी अभिनेता प्रभासने दान केला आगामी सिनेमाचा संपूर्ण सेट
दिवसभरात नोंद झालेल्या 549 मृत्यूंपैकी 302 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. 113 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 134 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. हे मृत्यू बुलढाणा 23, लातूर 22, ठाणे 21, नागपूर 16, नांदेड 14, जळगाव 12, उस्मानाबाद 6, चंद्रपूर 3, जालना 3, नंदुरबार 3, यवतमाळ 3, बीड 2, सांगली 1, भंडारा 1, परभणी 1, रायगड 1 आणि सोलापूर 1 असे आहेत.
ADVERTISEMENT