राज्यात लॉकडाऊन तरीही कोरोनाचे रुग्ण कमी होईना, पाहा दिवसभरात किती नवे रुग्ण सापडले

मुंबई तक

• 04:52 PM • 25 Apr 2021

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात कोरोनाचा (Corona Paitents) पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रुग्ण सापडेल आहेत. मागील काही दिवसांपासून दररोज 65 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. राज्यात सध्या लॉकडाऊन लागू असून देखील गेल्या 24 तासात तब्बल 66,191 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवेवरील ताण हा सतत वाढत आहे. याशिवाय आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे कोरोना […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) आज दिवसभरात कोरोनाचा (Corona Paitents) पुन्हा एकदा मोठ्या संख्येने रुग्ण सापडेल आहेत. मागील काही दिवसांपासून दररोज 65 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. राज्यात सध्या लॉकडाऊन लागू असून देखील गेल्या 24 तासात तब्बल 66,191 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवेवरील ताण हा सतत वाढत आहे. याशिवाय आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृतांचा आकडा (Deaths) बराच वाढला आहे. कारण आज राज्यात एकूण 832 कोरोना रुग्ण दगावले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे वाचलं का?

राज्यात मागील आठवड्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यावेळी फक्त अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. इतर आस्थापने देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहेत. मात्र, असं असून देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने आणि मृतांचा आकडा देखील वाढल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे.

राज्यात आज 61,450 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 35,30,060 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 82.19 टक्के एवढं झालं आहे. राज्यात गेल्या 24 तासात 832 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.51 टक्के एवढा आहे.

corona vaccine: मुंबईकरांसाठी गुड न्यूज, BMC ला मिळाल्या ‘एवढ्या’ लाख लसी

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,57,49,543 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 42,95,027 (16.68 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42,36,825 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 29,966 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 6,98,354 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या

  • मुंबई (Mumbai) – 75 हजार 498

  • ठाणे (Thane) – 79 हजार 888

  • पुणे (Pune) – 1 लाख 07 हजार 503

  • नागपूर (Nagpur) – 80 हजार 624

  • नाशिक (Nashik)- 42 हजार 898

  • अहमदनगर (Ahmednagar) – 22 हजार 317

  • जळगाव (Jalgaon) – 13 हजार 499

  • औरंगाबाद (Aurnagabad)- 16 हजार 324

  • लातूर (Latur) – 20 हजार 468

  • नांदेड (Nanded)- 11 हजार 542

‘या’ देशाचे आभार मानावे तेवढे थोडेच, भारताच्या कठीण काळात अत्यंत मोलाची मदत

प्रमुख शहरांमधील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या विचारात घेतल्यास पुण्यात आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात 1 लाखांहून जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. तर याशिवाय नागपुरात देखील रुग्णांचा आकडा अत्यंत झपाट्याने वाढत आहे. नागपूरमध्ये सध्या 80 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

मुंबईत दिवसभरात 5 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह

मुंबईत दिवसभरात 5 हजार 542 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 64 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 8 हजार 478 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 5 लाख 37 हजार 711 रूग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 86 टक्के आहे. डबलिंग रेट 58 दिवसांवर गेला आहे.

    follow whatsapp