कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रातून लवकरच संपणार असल्याचं दिसत आहे. राज्यातील कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्याने दररोज बाधित रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. आज दिवसभरात राज्यात ९,६६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर दिलासादायक बाब म्हणजे राज्यात सलग दुसऱ्या दिवशी ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आला नाही.
ADVERTISEMENT
आरोग्य विभागाकडून राज्यातील कोरोना आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिवसभरात राज्यात २५ हजार १७५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आतापर्यंत राज्यात ७५,३८,६११ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजेच रिकव्हरी रेट ९६.६० टक्के इतका आहे.
राज्यात आज ६६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर १.८३ टक्के इतका असून, राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ४३ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
७,२४,७२२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. त्याचबरोबर २,३९४ व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या सध्या १ लाख १८ हजार ७६ इतकी आहे.
सलग दुसऱ्या दिवशी शून्य ओमिक्रॉन रुग्ण
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबरोबरच कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भावही कमी झाल्याचं दिसत आहे. राज्यात दुसऱ्या दिवशी एकाही नवी रुग्णाची नोंद झाली नाही. त्यामुळे सध्या राज्यातील एकुण ओमिक्रॉन बाधितांची संख्या 3,334 इतकीच आहे.
जिल्हा तसंच महापालिका निहाय ओमिक्रॉन रुग्णांची संख्या
मुंबई महापालिका – 1080
ठाणे जिल्हा – 00
ठाणे महापालिका – 80
नवी मुंबई महापालिका – 37
कल्याण डोंबिवली महापालिका – 11
उल्हासनगर महापालिका – 04
भिंवडी निजामपूर महापालिका – 05
मीरा भाईंदर महापालिका – 52
पालघर जिल्हा – 00
वसई विरार महापालिका – 07
रायगड जिल्हा – 14
पनवेल महापालिका – 18
नाशिक जिल्हा – 06
नाशिक महापालिका – 00
मालेगाव महापालिका – 00
अहमदनगर जिल्हा – 06
अहमदनगर महापालिका – 00
धुळे जिल्हा – 00
धुळे महापालिका – 00
जळगाव जिल्हा – 02
जळगाव महापालिका – 00
नंदूरबार जिल्हा – 02
पुणे जिल्हा – 66
पुणे महापालिका – 1,244
पिंपरी चिंचवड महापालिका – 127
सोलापूर जिल्हा – 10
सोलापूर महापालिका – 00
सातारा जिल्हा – 23
कोल्हापूर जिल्हा – 02
कोल्हापूर महापालिका – 17
सांगली जिल्हा – 59
सांगली मिरज कुपवाड महापालिका – 00
सिंधुदुर्ग जिल्हा – 00
रत्नागिरी जिल्हा – 00
औरंगाबाद जिल्हा – 51
औरंगाबाद महापालिका – 00
जालना जिल्हा – 03
हिंगोली जिल्हा – 00
परभणी जिल्हा – 03
परभणी महापालिका – 00
लातूर जिल्हा – 04
लातूर महापालिका – 00
उस्मानाबाद जिल्हा – 18
बीड जिल्हा – 01
नांदेड जिल्हा – 03
नांदेड महापालिका – 00
अकोला जिल्हा – 12
अकोला महापालिका – 00
अमरावती जिल्हा – 40
अमरावती महापालिका – 00
यवतमाळ जिल्हा – 04
बुलढाणा जिल्हा – 06
वाशिम जिल्हा – 00
नागपूर जिल्हा – 286
नागपूर महापालिका – 00
वर्धा जिल्हा – 15
भंडारा जिल्हा – 03
गोंदिया जिल्हा – 03
चंद्रपूर जिल्हा – 00
चंद्रपूर महापालिका – 00
गडचिरोली जिल्हा – 02
बाहेरील राज्यांतील – 01
राज्यातील एकूण रुग्ण – 3,334
ADVERTISEMENT