Maharashtra Unlock : रेस्तराँ आणि दुकानांच्या वेळा ठरल्या! ठाकरे सरकारने काढला आदेश

मुंबई तक

• 10:49 AM • 19 Oct 2021

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. तिसऱ्या लाटेची भीती काही प्रमाणात आहे मात्र लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील थिएटर्स आणि नाट्यगृहं उघडणार आहेत. अशात सोमवारी झालेल्या बैठकीत हॉटेल आणि रेस्तराँ यांच्या वेळा वाढवण्याचाही निर्णय झाला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून हॉटेल आणि रेस्तराँ यांच्या […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. तिसऱ्या लाटेची भीती काही प्रमाणात आहे मात्र लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील थिएटर्स आणि नाट्यगृहं उघडणार आहेत. अशात सोमवारी झालेल्या बैठकीत हॉटेल आणि रेस्तराँ यांच्या वेळा वाढवण्याचाही निर्णय झाला आहे.

हे वाचलं का?

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडून हॉटेल आणि रेस्तराँ यांच्या वेळा वाढवण्यात आल्याची नियमावली जाहीर कऱण्यात आली आहे. राज्यातील उपहारगृहं, हॉटेल्स आता रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच सर्व प्रकारची दुकानं रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापारी वर्गाच्या दृष्टीने आणि हॉटेल व्यावसायिकांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोव्हिड टास्क फोर्सच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कोव्हिडच नाही तर डेंग्यू, चिकनगुनिया यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडेदेखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू करीत आहोत असंही ते म्हणाले. उपाहारगृहे आणि दुकाने यांचीदेखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याआधी मुंबईतील हॉटेल्स रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा 18 ऑक्टोबर रोजी देण्यात आली होती. याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली होती.

CM Uddhav Thackeray: मंदिरं सुरु होताच पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांसह घेतलं देवीचं दर्शन

15 ऑगस्टपासून राज्यात रात्री १० पर्यंत हॉटेल्स सुरू करण्याचा झाला होता निर्णय

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सर्व हॉटेल्स, दुकानं आणि रेस्तराँ ही आता रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय 15 ऑगस्टला घेण्यात आला. त्यानंतर आता आज राज्यातील हॉटेल्स, रेस्तराँ रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याचा आणि दुकानं ११ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय झाला आहे.

असे आहेत नियम

उपाहारगृहे (रेस्तराँ) यांना त्यांच्या क्षमतेच्या 50 टक्क्यांपर्यंत मान्यता.

खुल्या प्रांगणात किंवा लॉनमध्ये या ठिकाणी होणारे जे विवाहसोहळे आहेत, त्याला जास्तीत जास्त 200 संख्येची परवानगी

हॉलमध्ये जी आसन क्षमता असते, त्यामध्ये 50 टक्के परवानगी देण्यात आलेली आहे किंवा 100 या पेक्षा जास्त नाही

कोव्हिड प्रोटोकॉल पाळणं हे मात्र बंधनकारक.

हॉटेलच्या मालकांनी, कर्मचाऱ्यांनी आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांनी कोव्हिड प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे

हॉटेलमध्ये वेटर्सनीही मास्क घालणं बंधनकारक.

वेटिंग असेल तर वेटिंगवर असलेल्या लोकांनीही मास्क घालणं आणि कोव्हिडच्या सगळ्या निर्बंधांचं पालन करणं आवश्यक.

कोव्हिड प्रोटोकॉलची जबाबदारी मालकांची असणार आहे

    follow whatsapp