10 डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळ सचिवालयाच्या कामकाजाला होणार सुरुवात
ADVERTISEMENT
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून नागपूरला सुरूवात होणार आहे. तब्बल दोन वर्षानंतर हिवाळी अधिवेशनाचे आयोजन नागपूरात होत असल्यामुळे लगबग सुरू झाली आहे.
१० डिसेंबरपासून विधिमंडळ सचिवालयाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे.
दोन वर्षानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार असल्याने सर्वच उत्सुक आहेत. १९ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोरोनामुळे सलग दोन अधिवेशन नागपूरला होऊ शकले नव्हते. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनासाठी दोन आठवड्याचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. शिंदे- फडणवीस यांची सत्ता आल्यानंतर पहिलेच अधिवेशन नागपूरात होतं आहे.
अधिवेशनाचा खर्च वाढला:-
यावर्षी अधिवेशनावर ९८ कोटी अपेक्षित खर्च होईल माहिती आहे. गेल्या अधिवेशनापेक्षा ३० कोटी रुपयांनी खर्च वाढला आहे. २०१९ मध्ये झालेल्या अधिवेशनाच्या तयारीवर एकूण ६८ कोटी रुपये खर्च झाले होते.
ADVERTISEMENT