ऐन दहावी-बारावीच्या परीक्षा काळातच अंधार; परभणी जिल्ह्यातील तब्बल २२१ गावांची वीज तोडली

मुंबई तक

• 03:40 AM • 17 Mar 2022

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कृषी पंप वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवाईला स्थगिती दिली असली, तरी दुसरीकडे थेट गावांचाच वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. महावितरणने परभणी जिल्हयातील ६६० गावांपैकी २२१ गावांचा वीज पुरवठा केला खंडीत केला आहे. जिल्हयातील ६६० गावांकडे २८५ कोटी रुपयांची वीज थकबाकी असून, त्यातील २२१ गावातील वीज पुरवठा महावितरणने तोडला आहे. त्यामुळे […]

Mumbaitak
follow google news

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कृषी पंप वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवाईला स्थगिती दिली असली, तरी दुसरीकडे थेट गावांचाच वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. महावितरणने परभणी जिल्हयातील ६६० गावांपैकी २२१ गावांचा वीज पुरवठा केला खंडीत केला आहे.

हे वाचलं का?

जिल्हयातील ६६० गावांकडे २८५ कोटी रुपयांची वीज थकबाकी असून, त्यातील २२१ गावातील वीज पुरवठा महावितरणने तोडला आहे. त्यामुळे २२१ गावे अंधारात बुडाली आहेत. ऐन दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच ही कारवाई करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी आता दिव्याचा आधारा घ्यावा लागत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

या थकबाकीमुळे जिल्हयातील राहिलेली उर्वरीत ६६० पैकी ४३९ गावांवर कधीही विज पुरवठा खंडीत करण्याची टांगती तलवार आहे. या प्रकरणावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यांसमोर बोलायला नकार दिला आहे. तर गावची परिस्थिती कोरोनामुळे बिकट झाल्यामुळे वीजबील भरणे शक्य नाही असं सरपंचांनी म्हटलं आहे. सरपंचांकडूनही कॅमेऱ्यासमोर बोलण्यास टाळाटाळ केली गेली.

महावितरणने वीज बील वसुली मोहीम युद्ध पातळीवर सुरु केली आहे. या २२१ गावांचा वीज पुरवठा खंडीत केले असून, त्यांच्याकडे ५८ कोटी ४४ लाख रुपये वीज बिल थकबाकी आहे.

तालुका गावांची संख्या थकीत वीज बील रक्कम

जिंतूर ६६ गावे २२ कोटी २२ लाख रुपये

पुर्णा ३४ गावे १५ कोटी १९ लाख

गंगाखेड २५ गावे १ कोटी ३२ लाख ,

परभणी २० गावे १५ कोटी २९ लाख

पाथरी २१ गावे ६ कोटी १२ लाख

सेलू १४ गावे ३ कोटी ५८ लाख रुपये

पालम ९ गावे २ कोटी ६८ लाख रुपये

मानवत ७ गावे ६५ लाख रुपये

सोनपेठमध्ये ५ गावे ४१ लाख रुपये

    follow whatsapp