पाकिस्तानी सुप्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खानने (Mahira Khan) २०१७मध्ये रईस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले होते. या चित्रपटात माहिरा, शाहरुख खानसह मुख्य भूमिकेत झळकली होती. भारत-पाक (India-Pakistan) या दोन देशातील तणावामुळे पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान माहिराने भारत आणि पाकिस्तानमधील कलाकारांबाबत एक वक्तव्य केले ज्यामुळे याबाबत सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
माहिरा म्हणाली होती, कलाकारांना भारतासह पाकिस्तानमध्ये सॉफ्ट टार्गेट मानले जाते. रईस हा एक हिट चित्रपट ठरल्याने भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे तिला बॉलिवूडमध्ये काम करता आले नाही. पाकिस्तानी कलाकार आणि संगीतकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली.
‘भारत-पाकिस्तानसाठी कलाकार ठरतायत बळीचे बकरे!’- माहिरा कान
अभिनेत्री माहिरा खान कलाकारंवरील भारतातील बंदी या सर्व गोष्टींना दोन देशातील राजकारण हे मुख्य असल्याचे मानते. ‘दुर्दैवाने हे राजकारण आहे. जोपर्यंत दोन्ही बाजूंच्या लोकांना बळीचा बकरा हवा आहे तोपर्यंत आम्ही तिथेच राहणार. जर समजा परिस्थिती सुधारली, सत्तेत आम्हाला कोणीतरी सोपे लक्ष्य म्हणून वापरले नाही तर, ते उत्तमच असेल. यावर जर, कोणता उपाय निघाला तर, चांगले होईल.
माहिरा खानने एका मुलाखतीदरम्यान या सर्व गोष्टी शेअर केल्या आहेत. बॉलिवूडशी संबंधित तिचा अनुभवही तिने सांगितला. भारतात ज्या लोकांसोबत तिने काम केले त्यांच्या संपर्कात ती अजूनही आहे. ती तिच्या मैत्रिणींशी बोलते बॉलिवूडमधील कलाकारांना भेटते. ती स्वतःसाठी ज्यावेळी सोशल मीडियावर काहीही लिहिते त्याबद्दल ती नेहमीच सावध असते असे तिचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT