इंदूर मंदिर दुर्घटना : माजिद फारूकींना अश्रु अनावर; म्हणाले, ‘रोजा ठेवला होता…’

मुंबई तक

31 Mar 2023 (अपडेटेड: 31 Mar 2023, 11:59 AM)

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर मोठी दुर्घटना घडली. येथे, स्नेह नगरजवळील पटेल नगरमध्ये असलेल्या श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर परिसरातील विहरीवरील छत कोसळली, ज्यामध्ये अनेक लोक पडले. विहिरीत पडल्याने आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर 16 जणांवर उपचार सुरू आहेत. दोन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात […]

Mumbaitak
follow google news

इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर मोठी दुर्घटना घडली. येथे, स्नेह नगरजवळील पटेल नगरमध्ये असलेल्या श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिर परिसरातील विहरीवरील छत कोसळली, ज्यामध्ये अनेक लोक पडले. विहिरीत पडल्याने आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 18 जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर 16 जणांवर उपचार सुरू आहेत. दोन जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांचा शोध सुरू आहे. (Majid Farooqui came to the rescue; He was in tears while talking about the incident in the temple)

हे वाचलं का?

संभाजीनगरमधील राड्यावरुन बावनकुळेंनी खैरेंना दिला इशारा

इंदूरचे काझी अब्दुल मजीद फारुकी यांनी सांगितले की, सकाळी 11.30 वाजता ते बागेत होते, त्यावेळी त्यांना छत पडल्याचा आवाज आला. घटनेची चौकशी केली असता मंदिरात अपघात झाल्याचे सांगण्यात आले. आम्हाला माहिती मिळताच आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. त्यावेळी आमच्यासोबत अनेक नागरी संरक्षण कर्मचारी उपस्थित होते.पोलिस येण्यापूर्वीच आम्ही पोहोचलो असे त्यांनी सांगितले.

तिथे खूप गर्दी होती. आम्ही तातडीने बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी पोहोचल्यावर अतिशय शोकाकुल वातावरण असल्याचे दिसले. आम्ही तेथील जनतेला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने माझा एक वर्षाचा मूल आहे म्हणत रडायला लागला, मी त्याला रोखू शकलो नाही, असे ते सांगितले. हे सांगताना त्यांच्याही डोळ्यात आश्रू होते.

सिव्हिल डिफेन्सच्या टीमसह दोन डझनहून अधिक लोकांना वाचवले

माजिद फारुकी म्हणाले की, जेव्हा मी आत गेलो तेव्हा मला दिसले की माझ्या कॉलनीतील अनेक लोक होते ज्यांना टीमच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. माजिद फारुकी म्हणाले की आमचे नागरी संरक्षण दल सतत बचावकार्यात गुंतले होते. यावेळी टीमच्या लोकांसह दोन डझनहून अधिक लोकांना वाचवले. आमच्या संजयभाईंनी मला उपवास सोडण्याची आठवण करून दिली, मग त्यांनीच मला उपवास सोडायला लावला, माजिद फारुकी म्हणाले. एकीकडे देशात अनेक ठिकाणी राव नवमीदिवशी जातीय दंगली पाहायला मिळाल्या. मात्र दुसरीकडे माजिद फारुकी यांनी सर्वधर्म समभावचे उदाहरण समोर ठेवले. त्यांचं मोठ्याप्रमाणात कौतुक होत आहे.

संभाजीनगरच्या राड्यावरुन कराड, जलील यांच्यात आरोप प्रत्यारोप

या अपघातात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे

इंदूर विभागाचे आयुक्त पवन शर्मा यांनी सांगितले की, अपघातात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 18 जणांना वाचवण्यात यश आले असून त्यापैकी 16 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन जण बेपत्ता असून, त्यांच्या शोधासाठी शोधमोहीम सुरू आहे. 140 जणांचे पथक बचाव कार्यात सहभागी आहे. यामध्ये 15 NDRF, 50 SDRF आणि 75 लष्करी जवानांचा समावेश आहे.

40 वर्षांपूर्वी विहीर झाकण्यात आली होती

गुरुवारी रामनवमीनिमित्त इंदूर शहरातील मंदिरात हवनाचा कार्यक्रम सुरू होता. त्याच वेळी, प्राचीन पायरीवर बांधलेला स्लॅब कोसळला. जिल्हा दंडाधिकारी डॉ. इलैयाराजा टी यांनी सांगितले की, आतापर्यंत 35 मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. दुर्घटना घडलेल्या पटेल नगरमधील बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिर सुमारे चार दशकांपूर्वी विहिरीला झाकून बांधकाम करण्यात आले होते.

विहिरीवरील स्लॅब काढण्याची नोटीस देण्यात आली होती

इंदूर महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एप्रिल 2022 मध्ये इंदूर महानगरपालिकेच्या सूचनेला उत्तर म्हणून, बेलेश्वर महादेव झुलेलाल ट्रस्टने विहिरीवरील स्लॅब काढण्याचे काम हाती घेतले होते, परंतु तो काढला गेला नाही. याबाबत राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, विशेषत: विहिरीवर मंदिर बांधण्यास परवानगी कशी देण्यात आली याचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राम नवमीदिवशी दुर्दैवी घटना, 35 भाविकांचा विहरीत पडून मृत्यू; नेमकं काय झालं होतं?

 

    follow whatsapp