राज्यावर कोरोनाचं संकट आहे. एकीकडे रूग्णसंख्या वाढत असताना म्युकरमायकोसिस या आजाराने शिरकाव केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या बारामतीकरांवर आता कोरोनानंतर उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराचे देखील मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे बारामतीकरांची चिंता वाढली आहे.
ADVERTISEMENT
‘लव्ह यू जिंदगी..’ गाणं म्हणत कोरोनाशी लढा देणाऱ्या मुलीचा मृत्यू, व्हीडिओ झाला होता व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून लागलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र असं असून देखील रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला असल्याने डॉक्टरांची डोकेदुखी वाढली आहे.
राज्य सरकारकडून या बुरशीजन्य आजाराबाबत जनजागृती आणि तपासण्या सुरू केल्या असल्या तरी बारामतीत गेली काही दिवसांपासून म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) सदृश्य लक्षणं असलेली अनेक रुग्ण सापडले आहेत. एकट्या बारामतीत आतापर्यंत 20 ते 25 रुग्ण आढळून आले असून त्यातील दोन ते तीन जणांचा सरकारी दवाखान्यात मृत्यू झाला आहे.
कोरोनावरच्या ‘बारामती पॅटर्न’ औषधाची आंतराराष्ट्रीय पातळीवर दखल
सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे म्हणाले, “बारामतीमध्ये आतापर्यंत 20 ते 25 रूग्ण आढळून आले आहेत. तर या रूग्णालयात आतापर्यंत 6-7 रूग्ण पाहिले आहेत. यामध्ये डोळे लाल होणं, डोळे जळजळणं, डोकेदुखी, चेहऱ्याची एक बाजू सुजणं ही लक्षणं दिसतात. या आजारांसंबंधी कोणताही त्रास रूग्णाला दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांची मदत घ्यावी.”
ADVERTISEMENT