मुंबईतील Avighan Park इमारतीमध्ये भीषण आग, एका व्यक्तीचा मृत्यू

मुंबई तक

• 07:11 AM • 22 Oct 2021

मुंबईच्या करी रोड परीसरातील माधव पालव मार्गावरील अविघ्न पार्क या इमारतीला आग लागली आहे. सकाळी ११ वाजून ५१ मिनीटांनी आग लागल्याचा प्रकार समोर आला. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली असून घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ६० मजल्यांच्या या टॉवरला लागलेल्या आगीमुळे परिसरात […]

Mumbaitak
follow google news

मुंबईच्या करी रोड परीसरातील माधव पालव मार्गावरील अविघ्न पार्क या इमारतीला आग लागली आहे. सकाळी ११ वाजून ५१ मिनीटांनी आग लागल्याचा प्रकार समोर आला. इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली असून घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

हे वाचलं का?

६० मजल्यांच्या या टॉवरला लागलेल्या आगीमुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे. १९ व्या मजल्यावरुन धुराचे काळे लोट बाहेर पडत आहेत. आगीचं कारणं अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरीही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

या इमारतीला आग लागल्यानंतर एक व्यक्ती हा बाल्कनीबाहेर येऊन स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्न करत होता. परंतू तोल जाऊन तो १९ व्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे त्याचा जीव गेला आहे. मयत व्यक्तीचं नाव अरुण तिवारी असं आहे. १९ व्या मजल्यावरुन खाली पडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अग्नीशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

    follow whatsapp