मालाडमध्ये इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. अशात या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
काय आहेत या नऊ जणांची नावं?
मोहम्मद शफीक
इशरत बानो
मोहम्मद तौसिफ
मोहम्मद तईश
अलिसा बानो
अलिना बानो
आरिफा बानो
अलफिसा बानो
रईसा बानो
अशा नऊ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 9 जण एकाच कुटुंबातले आहेत.
मुंबईतल्या मालाड भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात लोक जखमी झाले आहेत. मालाड पश्चिमेकडे असलेल्या मालवणी भागात ही इमारत होती. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जखमींवर उपचार सुरू असून घटनास्थळी अग्निशमन दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. ज्या ठिकाणी इमारत कोसळली तिथे मुंबई महापालिकेचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत.
मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं. अशात मालाडमध्ये रात्री उशिराच्या सुमारास ही इमारत कोसळली. मालवणी भागात असलेली ही इमारत शेजी असलेल्या घरांवर कोसळली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त होते आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हेदेखील त्या ठिकाणी पोहचले. मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली अशी माहिती त्यांनी दिली.
या घटनेतून आत्तापर्यंत सात ते आठ जणांना वाचवण्यात आलं आहे. या सगळ्यांवर शताब्दी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच काही लोकांना खासगी रूग्णालयांमध्येही दाखल करण्यात आलं आहे. बचावकार्य अद्यापही सुरू आहे. या ठिकाणी परिसर हा दाटीवाटीचा असल्याने घटनास्थळी पोहचण्यासाठीचा रस्ता अरूंद आहे. रूग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब, जेसीबी हे सगळे य घटनास्थळापर्यंत पोहचू शकत नाहीत. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केलं आहे. इमारत दुर्घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या घरांनाही धोका असल्याने त्या रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT