बुलढाणा जिल्ह्यातील डोनगाव येथे आज एक विचीत्र आणि धक्कादायक घटना पहायला मिळाली. एका माथेफिरु व्यक्तीने आपल्याच दुकान आणि स्कुटीला आग लावून दिली. दुपारी २ ते ३ वाजल्याच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत दोन जणं जखमी झाले असून कोणत्याही प्रकारे जिवीतहानी झालेली नाहीये.
ADVERTISEMENT
गजानन विडोले असं या माथेफिरुचं नाव आहे. गजाननचं डोनगावमध्ये स्वतःचं गॅस वेल्डिंगचं दुकान आहे. गजानने आज आपलं दुकान बंद करुन स्कुटीला आग लावून दिली. यावेळी दुकानात ठेवलेलं ६० किलो कार्बेट आणि ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जोरदार स्फोट झाला. या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की काही वेळासाठी या भागात वाहतूक कोंडी झाली होती.
पुण्याहून गोव्याकडे निघालेली बस जळून खाक, 37 प्रवासी बालंबाल बचावले
या आगीमुळे आजुबाजूच्या किमान १६ दुकानांचं ७ लाखांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. या आगीत दोन जणं जखमी झाले असून जिवीतहानी झालेली नाही. गजाननने ही आग का लावली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. पोलिसांनीही यात अद्याप गुन्हा दाखल केला नाहीये.
ADVERTISEMENT