अभिनेत्री जुही चावलाने देशातल्या 5G तंत्रज्ञानाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. हे तंत्रज्ञान भारतात सुरू करण्यापूर्वी पर्यावरणाचा आणि प्राणी, पक्ष्यांचा विचार केला जावा असं जुही चावलाने म्हटलं आहे. अशात या प्रकरणी हायकोर्टाने व्हर्चुअल सुनावणी घेतली. यादरम्यान एक माणूस अचानक उठून लाल ओठोपे गोरी किसका नाम है हे गाणं गाऊ लागला. ज्यामुळे व्हर्चुअल सुनावणी थांबवण्यत आली.
ADVERTISEMENT
या माणसाला ताकीद देण्यात आली की आपण एका गंभीर विषयावर बोलत आहोत. या माणसाला Zoom सुनावणीतून हटवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा कोर्टाची सुनावणी सुरू झाली. सुनावणी सुरू झाल्यानंतर हा माणूस पुन्हा झाला आणि आवाज यायला लागला, जुही मॅडम कहाँ है? त्यानंतर हा माणूस घुंघट की आडसे दिलबर का हे गाणं म्हणू लागला. त्यानंतर या माणसाला पुन्हा सुनावणीतून काढण्यात आलं. हा माणूस पुन्हा जॉईन झाला आणि त्यानंतर मेरी बन्नो की आएगी बारात हे गाणं म्हणू लागला.
हा माणूस सारखा सारखा जॉईन होऊन गाणी म्हणत असल्याने सुनावणीत व्यत्यय येत होता. अशात कोर्टाने त्याच्याविरोधात नोटीस जारी केली आणि त्याला रिमूव्ह करण्यात आलं. यानंतर जुही चावला यांचे वकील दीपक खोसला मजेत म्हणाले की हा कोण माणूस आहे माहित नाही पण त्याच्यावर बहुदा 4 G रेडिएशनचा परिणाम झाला असावा.
काय म्हटलं आहे जुही चावलाने?
देशात 5 जी तंत्रज्ञान लागू करण्याच्या आधी याच्याशी संबंधित सर्व संशोधनांवर बारकाईने विचार केला पाहिजे त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी भारतात लागू करावी. ही टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता, जिवाणू, झाडं झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित संशोधनांचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याचा निर्णय घ्यावा असं जुही चावलाने म्हटलं आहे.
जुही चावलाने दाखल केलेल्या याचसंदर्भातल्या याचिकेवर कोर्टाने Zoom द्वारे व्हर्चुअल सुनावणी घेतली. या सुनावणीत जुही चावलाच्या सिनेमातील गाणी म्हणणाऱ्या इसमाला Remove करण्यात आले.
ADVERTISEMENT