सदावर्तेंना नागपुरातून फोन करणारा ‘तो’ व्यक्ती सापडला, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई तक

• 03:45 PM • 13 Apr 2022

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. सदावर्ते यांना न्यायालयासमोर हजर करत असताना युक्तीवादात सरकारी वकीलांनी आंदोलनाआधी सदावर्ते यांना नागपूरवरुन एक फोन आल्याचं सांगितलं. सदावर्तेंना फोन करणारा हा व्यक्ती एसटी चा बडतर्फ कर्मचारी असल्याचं कळतंय. संदीप गोडबोले असं या […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे. सदावर्ते यांना न्यायालयासमोर हजर करत असताना युक्तीवादात सरकारी वकीलांनी आंदोलनाआधी सदावर्ते यांना नागपूरवरुन एक फोन आल्याचं सांगितलं. सदावर्तेंना फोन करणारा हा व्यक्ती एसटी चा बडतर्फ कर्मचारी असल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

संदीप गोडबोले असं या कामगाराचं नाव असून पोलिसांनी संशयाच्या आधारावर या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. नागपूर पोलिसांकडून संदीप गो़डबोलेचा ताबा आता मुंबई पोलिसांनी घेतला आहे. नागपूर पोलीस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याचं कळतंय. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा कट सदावर्ते यांच्या संगनमताने रचल्याचा मुंबई पोलिसांचा आरोप आहे. यासाठी काही पुरावेही त्यांच्या हाती लागले आहेत. पहिल्या सुनावणीदरम्यान सदावर्ते यांना नागपूरवरुन आलेल्या फोनमुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. परंतू या रहस्यावरचा पडदा अखेरीस उलगडला आहे.

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीदरम्यान गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला आहे. सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी सातारा पोलिसांचं एक पथक गिरगाव कोर्टात हजर होतं. त्यामुळे सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांचा ताबा 17 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांकडे असणार आहे.

वकील गुणरत्न सदाववर्ते यांच्या विरोधात फलटण येथे सातारा शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या दरम्यान एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाबाबत बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्या प्रकरणी एका तक्रारदाराने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली होती अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे.

    follow whatsapp