गोव्यात मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल भाजपविरोधात बंड करण्याच्या तयारीत?

मुंबई तक

• 04:16 PM • 14 Jan 2022

गोव्यात मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल भाजपविरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कारण सध्या उत्पल पर्रिकर हे सध्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. तसंच गोवेकरांनीही उत्पल पर्रिकर यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. उत्पल पर्रिकर यांना भाजपने तिकिट दिलेलं नाही. भाजपने तिकीट द्यायला हवं अशीही मागणी गोवेकर करत आहेत. अशात आता घरोघरी जाऊन उत्पल पर्रिकर प्रचार […]

Mumbaitak
follow google news

गोव्यात मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल भाजपविरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कारण सध्या उत्पल पर्रिकर हे सध्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. तसंच गोवेकरांनीही उत्पल पर्रिकर यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. उत्पल पर्रिकर यांना भाजपने तिकिट दिलेलं नाही. भाजपने तिकीट द्यायला हवं अशीही मागणी गोवेकर करत आहेत. अशात आता घरोघरी जाऊन उत्पल पर्रिकर प्रचार करत असल्याने ते बंड करणार का? पणजीमधून अपक्ष उभे राहणार का? हे प्रश्न गोव्याच्या राजकीय वर्तुळात विचारले जात आहेत.

हे वाचलं का?

गोवा भाजपचे आमदार सेक्स स्कँडलमध्ये अडकल्याने पक्ष सोडत आहेत, दिनेश गुंडूराव यांचा आरोप

गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या रंगात आली आहे. 14 फेब्रुवारीला गोवा विधानसभेची निवडणूक होणार आहे. विधानसभा सदस्यांच्या दृष्टीने सर्वात छोटं राज्य असलेल्या गोव्यात भाजप, काँग्रेस, मगोप या प्रमुख पारंपरिक पक्षासह आप, तृणमूल काँग्रेस हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेनेही तशी तयारी केली आहे. त्यामुळे निवडणुकीतली चुरस वाढली आहे. भाजपमधले अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे भाजप जिंकणार नाही अशी चर्चाही सुरू झाली आहे. गेल्यावेळी काँग्रेसचा विजय झाला होता पण भाजपने मागच्या दाराने प्रवेश केला यावेळी तसं होणार नाही असं काँग्रेसनेही म्हटलं आहे.

अशा सगळ्या वातावरणात चर्चा सुरू आहे ती उत्पल पर्रिकरांची. उत्पल पर्रिकर नेमकं काय करणार हे पाहणं गोव्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. भाजपची गोव्यात गेल्या दहा वर्षांपासून सत्ता आहे. मात्र मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर भाजप पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरा जातो आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल हेदेखील तिकीट न मिळाल्याने भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे.

UP Election 2022 : योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत गोरखपूर सोडून अयोध्या मतदारसंघाची निवड का केली?

इंडिया टुडेने उत्पल पर्रिकरांबाबत गोवेकरांना विचारलं असता, गोवेकरांनी आमचा पूर्ण पाठिंबा उत्पल पर्रिकरांना आहे असं म्हटलं आहे. एवढंच नाही तर भाजपने त्यांना तिकीट मिळालं पाहिजे असंही म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

‘मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात भाजपला स्थापित करण्यासाठी मोठं योगदान दिलं. मात्र फक्त मनोहर पर्रिकर यांचा किंवा अन्य कुणाचा मुलगा म्हणून भाजपमध्ये तिकिट मिळू शकणार नाही. ज्या व्यक्तीचं कर्तृत्त्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे यासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा तो मी घेऊ शकत नाही. तो निर्णय आमचं पार्लमेंट्री बोर्ड आहे ते निर्णय घेईल.’

    follow whatsapp