लाइव्ह
Manoj Jarange Live : आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणार नाही -जरांगे
मुंबई तक
26 Jan 2024 (अपडेटेड: 27 Jan 2024, 03:49 AM)
Marathi News Live Updates : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मुंबईत धडकणार आहे. मनोज जरांगे हे मुंबईत उपोषण करणार असून, त्यांची पदयात्रा दुपापर्यंत मुंबई पोहण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर राज्यात राजकीय घडामोडीही वेगाने घडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पडद्यामागे होत असलेल्या या घडामोडींचा अर्थ, अपडेट्स एकाच ठिकाणी वाचा… (Maharashtra Marathi news Live updates)
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 10:10 PM • 26 Jan 2024पंकजा मुंडे यांच्या भाषणावेळी खासदार उदयनराजे यांना अश्रू अनावरखासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांनी घेतलेल्या नक्षत्र महोत्सवाचे उद्घाटन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाषण करतेवेळी पंकजा मुंडे यांनी काही जुने प्रसंग सांगताच खासदार उदयनराजे भोसले गहिवरले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. मी पुण्यात असताना गोपीनाथ मुंडे यांनी उदयनराजे भोसले यांनी फोन करून शब्द दिला होता पंकजा मुंडे यांचा छत्रपती एक पाठीराखा आहे त्यामुळे घाबरायचे कारण नाही असं सांगितले होते. या त्यांच्या आठवणीवर उदयनराजे यांना अश्रू अनावर झाले.
- 09:04 PM • 26 Jan 2024सगेसोयऱ्यांच्या नोंदी करण्यासंदर्भातील अध्यादेश आजच काढणार-सूत्रांची माहितीकुणबी दाखले असणाऱ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगे पाटील यांनी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी बोलवलेल्या बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय झाल्याची सूत्रांनी ही माहिती दिली आहे. जरांगे यांना मुंबईबाहेरच रोखण्यासाठी सरकारचा प्रयत्न असून अध्यादेशाचा मसूदा तयार केला असून त्याची प्रत थोड्याच वेळात जरांगे यांना सुपूद्र केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
- 07:17 PM • 26 Jan 2024Marathi news Live Update : सरसकट आरक्षणाला आमचा कायमस्वरुपी विरोध-गोपीचंद पडळकरलोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार असून आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. तर सरसकट ओबीसीतून होत असलेल्या मागणीला आमचा कायमस्वरूपी विरोध असणार असल्याचे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं या गोष्टीला आमचा पाठिंबा असून मराठा समाजातही मोठ्या प्रमाणात गरीब लोक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
- 06:52 PM • 26 Jan 2024Marathi news Live Update : विठूरायाला 82 तोळे वजनाचे सोन्याचे घोंगडे अर्पणजालनामधील एका महिला भक्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पुन्हा एकदा विठूरायाला तब्बल 55 लाख रुपयांचे हिरेजडित सोन्याचे घोंगडे अर्पण केले आहे. अतिशय बारीक कलाकुसर केलेले आणि त्याला माणिक आणि पांढरे हिरे बसवलेले हे सोन्याचे घोंगडे 82 तोळे असल्याचे सांगितले जात आहे. एका अज्ञात भक्तानी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे ही सोन्याची घोंगडी अर्पण केली.
- 05:31 PM • 26 Jan 2024जरांगे पाटील यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे1) "सामान्य विभागाच्या सचिवांनी असे सांगितले की, ५४ लाख नव्हे तर ५७ लाख नोंदी मिळाल्या. मराठे मुंबईकडे निघाल्याच्या दणका... त्यामुळे ह्या वाढलेल्या दिसताहेत. ३७ लाख लोकांना जात प्रमाणपत्र सरकारने दिली आहेत", असे जरांगे पाटील म्हणाले.
- 04:01 PM • 26 Jan 2024Marathi news Live Update : वाटल्यास आजची रात्र इथंच थांबतो पण...'वाटल्यास आजची रात्र इथेच थांबतो. 26 जानेवारीचा मान ठेवून मुंबईला जात नाही, वाशीतच थांबतो. मात्र अध्यादेश मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नाही. आझाद मैदानावर जाण्याचा निर्णय उद्या 12 वाजता घेणार. अध्यादेश मिळाला की, विजयी गुलाल घेऊन मुंबईत जाणार. सग्यासोयऱ्यांबाबतचा अध्यादेश आजच द्यावा.' असे जरांगे पाटील सभेत म्हणाले.
- 03:54 PM • 26 Jan 2024Marathi news Live Update : प्रमाणपत्र मिळालं त्याने शपथपत्र द्यायचं....- मनोज जरांगे पाटील'ज्यांना प्रमाणपत्र मिळालं त्याने शपथ पत्र द्यायचं की हा माझा सोयरा आहे. त्याआधारे त्याला प्रमाणपत्र द्यायचं. खोटा पाहुणा असला तर त्याला प्रमाणपत्र देऊ नका. 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून घ्या. त्यात आमचे पैसे चालले. बाँड पेपर मोफत द्या. सरकारने हो म्हटलंय. टप्याटप्यात शिंदे सरकारची मुदत वाढणार,'असे जरांगे पाटील म्हणाले.
- 03:44 PM • 26 Jan 2024Marathi news Live Update : नोंदी मिळालेल्यांच्या सगेसोयऱ्यांकडून शपथपत्र घ्या- जरांगे पाटील'आपल्याला अध्यादेश महत्त्वाचा आहे. शिंदे समिती रद्द करायची नाही. शिंदे समितीची 2 महिने मुदत वाढवण्यात आली. 37 लाख लोकांना सरकारनं प्रमाणपत्र दिलंय. पण हे 37 लाख म्हणजे कुणाला? आम्हाला नावासह डेटा द्या. अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्या. यासंदर्भात गुन्हे मागे घेण्याचं पत्र दिलेलं नाही. नोंदी मिळालेल्यांच्या सगेसोयऱ्यांकडून शपथपत्र घ्या. प्रतिज्ञापत्र तुम्ही मोफत करा.' असं जरांगे पाटील सभेत म्हणाले आहेत.
- 03:32 PM • 26 Jan 2024Marathi news Live Update : मराठा किती ताकदीने आलेत ते देश बघतोय – मनोज जरांगे पाटील'आपल्या मागण्यांसाठी आपण मुंबईत आलो आहोत. आमची भूमिका काय? 54 लाख नोंदी सापडल्या. तर प्रमाणपत्राचे वाटप करा. काहींनी प्रमाणपत्र घेतले नाही. मागण्याबाबत सरकारसोबत चर्चा झाली,' असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. तर, 'मराठा किती ताकदीने आलेत ते देश बघतोय. ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रमाणपत्र मिळावे. एका नोंदीत पाच जणांना प्रमाणपत्र मिळाल्यास त्याचा कुटुंबाला फायदा होईल. नोंद मिळाल्याची माहिती नसेल तर अर्ज करणार कसा?' असंही जरांगे पाटील म्हणाले.
- 02:46 PM • 26 Jan 2024... तर सरकार जबाबदार असेल; जयंत पाटलांची भूमिका काय?"जरांगे पाटील यांना दिलेले आश्वासन सरकारने पूर्णपणे पूर्ण केले नाही, त्यामुळेच जरांगे पाटील आज लोकांसह मुंबईत येत आहेत आणि त्याची जबाबदारी सरकारची आहे. इकडे-तिकडे काही झाले, कायद्याचा प्रश्न निर्माण झाला, तर सरकार जबाबदार असेल, असे मला वाटतं", असे जयंत पाटील म्हणाले.
- 01:03 PM • 26 Jan 2024सरकारने दिलेल्या कागदात काय? 2 वाजता कळणार... जरांगे काय म्हणाले?मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भेट घेतली. या भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांनी सरकारकडून देण्यात आलेल्या प्रस्ताव वाचून दाखवण्यासाठी सगळ्यांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं.
- 12:36 PM • 26 Jan 2024Marathi news Live Update : मनोज जरांगे पाटील यांची वाशीमध्ये भव्य सभावाशीच्या शिवाजी चौकामध्ये मनोज जरांगे पाटील मराठा बांधवांसह दाखल झाले आहेत. यावेळी असंख्य मराठा बांधव शिवाजी चौकात जमले आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने आज 10 वाजता मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. एपीएमसी मार्केटच्या मुख्य कार्यालयात ही भेट झाली. त्यानंतर आता थोड्याच वेळात वाशीमध्ये त्यांची भव्य सभा होईल. त्यांची सरकारसोबत काय चर्चा झाली यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
- 11:45 AM • 26 Jan 2024जरांगेंची शिष्टमंडळासोबतची बैठक संपलीमनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी उपस्थितांना माहिती दिली. 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात जायचं आहे. आम्ही चर्चा केली पण तुमच्यासमोर ती चर्चा ठेवल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी शिवाजी चौकात चला', अशी माहिती मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर दिली. त्यामुळे वाशी येथील शिवाजी महाराज चौकात याबद्दल भूमिका मांडणार आहे.
- 11:24 AM • 26 Jan 2024Marathi news Live Update : नवीन जीआर घेऊन शिष्टमंडळाने पुन्हा मनोज जरांगेंची घेतली भेटसरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. एपीएमसी मार्केटच्या मुख्य कार्यालयात ही भेट झाली. मनोज जरंगे यांना भेटून त्यांना जीआर आणि राजपत्राचा मसुदा दाखवला आहे. सरकारच्या मसुद्यावर मनोज जरांगे वकिलांसोबत बैठक करणार आहे. वकिलांसोबत बैठक झाल्यानंतर मसुद्यात मनोज जरांगे बदल सुचवणार आहेत. मनोज जरांगे यांना मसुदा मान्य झाल्यास स्वतः मुख्यमंत्री मनोज जरांगे यांना जीआर देतील.आज मराठा आरक्षणावर अंतिम तोडगा काढण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू आहेत.
- 11:18 AM • 26 Jan 2024मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरूये -देवेंद्र फडणवीसमनोज जरांगे हे मुंबईत उपोषण करणार आहेत. यावर बोलताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "उच्च न्यायालयाने आम्हाला जे निर्देश दिले आहेत. कुणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ते शांततेने, नियमाने झाले पाहिजे असे उच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्याचे तंतोतंत पालन करू, त्यासोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरिता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत."
- 10:05 AM • 26 Jan 2024बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने... -देवेंद्र फडणवीसदेवेंद्र फडणवीस म्हणाले, "हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच 350 वर्ष आहे. लोकशाहीची जननी ही या गणतंत्रची थीम आहे. भारत खऱ्या अर्थाने केवळ जगातील सर्वात मोठी लोकशाही नसून, सर्वात जुनी लोकशाही देखील भारतच आहे हे देखील आपल्या सर्वांना समजून घ्यावे लागेल."
- 09:26 AM • 26 Jan 2024शिंदे सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीलामनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईतील वाशीमध्ये दाखल झाले आहे. वाशी येथून ते पुढच्या उपोषणासाठी आझाद मैदान आणि शिवाजी पार्क मैदानावर जाणार आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ पोहोचले आहे. या शिष्टमंडळासोबत चर्चेतून तोडगा निघणार की जरांगे आझाद मैदानाच्या दिशेने जाणार, हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल.
- 09:19 AM • 26 Jan 2024मनोज जरांगेंची पदयात्रा नवी मुंबईतमनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील अंतरवाली सराटीतून निघालेली पदयात्रा मुंबईच्या दारावर म्हणजे नवी मुंबईत पोहोचली आहे. २० जानेवारी रोजी जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून निघाले होते. २६ जानेवारीपासून ते मुंबईतील आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क मैदानात उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न उग्र झाल्याचेच दिसत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT