लाइव्ह
Lok Sahba 2024 Seat : ‘मनाने अजित पवारांसोबत’, शिरसाटांच्या दाव्यावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
मुंबई तक
01 Jan 2024 (अपडेटेड: 02 Jan 2024, 02:41 AM)
Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रात सध्या चर्चा सुरू आहे ती लोकसभा निवडणुकीची. त्यामुळे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघ, जिल्हे, तालुके आणि गावे ढवळून निघाली आहेत. कोणत्या मतदारसंघात कशी लढत असेल आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याभोवीच राजकीय घडामोडी घडत आहेत… या संदर्भातील सर्व अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 04:14 PM • 01 Jan 2024अजित पवारांसोबत जाणार होते, संजय शिरसाटांच्या विधानावर जयंत पाटलांनी केला खुलासासंजय शिरसाट यांनी दावा केला होता की, जयंत पाटील अजित पवारांसोबत येणार होते. यावर जयंत पाटील म्हणाले, "माझं आणि संजय शिरसाट यांचे कधी बोलणे झालेले नाही. त्यामुळे माझ्या मनात काय आहे हे त्यांना कसे कळणार? ते तुम्ही प्रसारमाध्यमांनी त्यांनाच विचारले पाहिजे. एखादी व्यक्ती काहीतरी बोलते, मग तुम्ही त्यावर दुसऱ्या नेत्याला जाऊन प्रतिक्रिया विचारता, हे कसे चालेल. ते वक्तव्य करण्यामागे संजय शिरसाट यांचा नेमका उद्देश काय ते मला माहिती नाही", असे जयंत पाटील म्हणाले. शिरसाट नेमकं काय बोलले होते? वाचा
- 01:27 PM • 01 Jan 2024महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय? सुप्रिया सुळेंनी दिली माहितीवंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेण्याबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातील नाही, तर देशाचे आणि अतिशय मोठे नेते आहेत. अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात नाही, पण समाजकारणात फार मोठं काम आंबेडकर कुटुंब आणि प्रकाश आंबेडकरांचं राहीलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांची गरज भारताला आहे. नवीन पिढीला दिशा देण्याचे काम... एक नेतृत्व ज्याची गरज सगळ्यांना आहे. ते प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आहेत. मला विश्वास आहे की, प्रकाश आंबेडकरांना मोठी भूमिका इंडिया आघाडीत राहील. आमची इच्छा आहे की, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे."
- 11:00 AM • 01 Jan 2024जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार होते, संजय राऊतांनी काय मांडली भूमिका?जयंत पाटील अजित पवारांसोबत सरकारमध्ये सामील होणार होते. त्यांच्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता, असा दावा संजय शिरसाट यांनी रविवारी (३१ डिसेंबर) केला होता. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
- 10:51 AM • 01 Jan 2024काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत काय झालं?दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती समोर आली आहे. या बैठकीत उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "जागा वाटपासंदर्भात दिल्लीमध्ये बैठक झाली. आमच्याकडून पक्षश्रेष्ठींनी माहिती घेतली. चर्चा करून निर्णय येईल आणि त्यानंतर चर्चा सुरू होईल. सगळ्यांना जास्त जागा पाहिजे. अगोदर दोन पक्षाचे सरकार होते. तेव्हा २६-२२ अशा जागा होत्या. ज्याची जिंकण्याची परिस्थिती आहे, त्याला ती जागा, असा विचार करून लढले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावे, अशी माझी इच्छा आहे."
- 10:44 AM • 01 Jan 2024प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत घेण्यासाठी चर्चा सुरू -संजय राऊतप्रकाश आंबेडकर यांनी मांडलेल्या भूमिकेवर संजय राऊत म्हणाले, "प्रकाश आंबेडकर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. प्रकाश आंबडेकर आणि उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचाही चांगला संवाद आहे. महाविकास आघाडीत त्यांना स्थान राहावं, यासाठी आमच्या चर्चा सुरू आहेत. इंडिया आघाडी हा पुढचा विषय आहे. आम्ही महाराष्ट्राचा विचार करत आहोत. महाराष्ट्रात ४८ पैकी किमान ४० जागा आम्ही जिंकाव्यात, ही प्रकाश आंबेडकर, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात उत्तम समन्वय आहे आणि चांगली चर्चा सुरू आहे."
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT