Maratha Reservation सुप्रीम कोर्टाकडून रद्द, पंढरपूरमध्ये मराठा समाजाचं मुंडन आंदोलन

मुंबई तक

• 07:17 AM • 05 May 2021

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. या निर्णयानंतर राज्य सरकारचा निषेध नोंदवत पंढरपूरमध्ये मराठा बांधवांनी आंदोलन केलं. शर्ट काढून मुंडन करत मराठा बांधवांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. आज आम्ही आमचे कपडे काढले आहेत, येत्या काळात मराठा खासदार, आमदारांचे कपडे काढू असा इशारा मराठा राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. यावेळी मराठा तरूणांनी […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. या निर्णयानंतर राज्य सरकारचा निषेध नोंदवत पंढरपूरमध्ये मराठा बांधवांनी आंदोलन केलं. शर्ट काढून मुंडन करत मराठा बांधवांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. आज आम्ही आमचे कपडे काढले आहेत, येत्या काळात मराठा खासदार, आमदारांचे कपडे काढू असा इशारा मराठा राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. यावेळी मराठा तरूणांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली.

हे वाचलं का?

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात न टिकणं हे ठाकरे सरकारचं अपयश-चंद्रकांत पाटील

यापुढे आम्ही कोणीही कोरोना प्रतिबंधाचे कोणतेही नियम पाळणार नाही. आता जीव गेला तरीही रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी भावना धनाजी साखळकर यांनी व्यक्त केली. एवढंच नाही तर मराठा समाजाच्या आमदार आणि खासदारांना पंढरपुरात फिरू देणार नसल्याची भूमिकाही आम्ही घेतली आहे. काही वेळातच राज्यातील सर्व मराठा बांधव समन्वयकांची ऑनलाईन मिटिंग असल्याची माहितीही डोंगरे यांनी दिली आहे. मराठा समाजाचं आरक्षण आज सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. ज्यानंतर राज्य सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

फडणवीस सरकारने दिलेलं मराठा आरक्षण ठाकरे सरकारला टिकवता आलं नाही-शेलार

सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे?

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी न्या. गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राज्य मागसवर्गीय आयोगाच्या शिफारसी तसंच सुनावणीद दरम्यान आलेले युक्तीवाद हे पुरेसे समर्पक नाही. सध्या आरक्षणावर असलेली ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासारखी स्थिती मुळीच नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. राज्यातील मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने कायदा संमत केला होता. मात्र हा कायदा घटनाबाह्य असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

मराठा आरक्षण रद्द, जाणून घ्या खासदार संभाजीराजे यांची नेमकी प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलं आहे?

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारचा मी निषेध करतो. मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल हे सर्वतोपरी ठाकरे सरकारचं अपयश आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकवण्यासाठी राज्य सरकारने योग्य ते प्रयत्न केले नाहीत. वर्षभर सरकारने वेळकाढूपणा केला. त्यात कोरोनाची साथ आल्यामुळे आंदोलनाची धारही कमी झाली. त्यामुळे फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण या सरकारला टिकवण्यात सपशेल अपयश आलं. यावर आता काही तोडगा काढायचा असेल तर राज्य सरकारने अधिवेशन बोलवण्याची गरज आहे असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

आशिष शेलार यांनी काय म्हटलं आहे?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा निकाल आता समोर आला आहे. संपूर्ण निकाल वाचल्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर देणं सोयीचं ठरेल असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. जी माहिती सोशल मीडिया, विविध वेबसाईट्स, ट्विटर हँडल यावरून ही माहिती समोर आली आहे. मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास या गटात घेऊन जे आरक्षण फडणवीस सरकारने मिळवून दिलं ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यात आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारला सपशेल अपय़श आलं आहे असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp