Marathi Bigg Boss : आपलेच मित्र आपल्यामागून एवढी इज्जत नाही काढत, स्नेहा जयवर बरसली

मुंबई तक

• 10:57 AM • 06 Dec 2021

मराठी बिग बॉसचं तिसरं पर्व आता उत्तरार्धाकडे झुकत चाललं आहे. प्रत्येक आठवड्यात या घरात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. गेल्या आठवड्यात कोणत्याही सदस्याचं घरातून एलिमिनेशन झालं नाही. परंतू एका नवीन ट्विस्टमुळे सर्वांच्या मनात धडकी भरली आहे. घराबाहेर गेलेल्या सदस्य स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्य या आठवड्यात घरात येणार आहेत. स्नेहा वाघ आणि जय दुधाणे […]

Mumbaitak
follow google news

मराठी बिग बॉसचं तिसरं पर्व आता उत्तरार्धाकडे झुकत चाललं आहे. प्रत्येक आठवड्यात या घरात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. गेल्या आठवड्यात कोणत्याही सदस्याचं घरातून एलिमिनेशन झालं नाही. परंतू एका नवीन ट्विस्टमुळे सर्वांच्या मनात धडकी भरली आहे. घराबाहेर गेलेल्या सदस्य स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्य या आठवड्यात घरात येणार आहेत.

हे वाचलं का?

स्नेहा वाघ आणि जय दुधाणे ही जोडी यंदाच्या पर्वात चांगलीच गाजली. दोघांमधल्या रोमँटीक केमिस्ट्रीला महेश मांजरेकरांसह प्रेक्षकांनी चांगली दाद दिली. परंतू यंदा घरात आल्यानंतर स्नेहाने जयवर आरोप केले आहेत.

स्नेहा घरात आल्यावर सगळ्या सदस्यांना भेटते. यादरम्यान आपण घरात असताना आपला विश्वासघात झाल्याचं स्नेहाने म्हटलं आहे. जेवणाच्या टेबलवर सगळ्यांसमोर जयवर आरोप करताना स्नेहाने, “घरात सुरुवातीपासून माझ्यासोबत कुणी गेम खेळत असेल तर तो जय दुधाणे होता. आपलेच मित्र आपल्या मागून आपली एवढी इज्जत नाही काढत. तू एक मैत्रीण गमावलीस”, असं मत मांडलं. या सोबतच स्नेहाने जयला एक सल्लाही दिला. स्नेहा म्हणाली, ‘मालिकने तुमको बहुत बडा बनाया, अपनी हरकतोंसे खुद को छोटा मत करो.

याशिवाय स्नेहा म्हणते की तिने जयला उत्कर्ष आणि मीरासोबत तिला घराबाहेर काढण्यासाठी बोलताना पाहिलंय. त्यानंतर जय मात्र स्नेहाच्या बोलण्याने दुखावलेला दिसतोय. स्नेहा घरातून गेल्यानंतर दुखावलेला जय आपल्याच बॅगवर जोरजोरात मारताना दिसत आहे.

    follow whatsapp