Crime : तिसऱ्या पत्नीचा काढला काटा… अमानुष कृत्याने महाराष्ट्र हादरला

मुंबई तक

02 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:46 AM)

जालना : भोकरदन तालुक्यातील कुंभारी शिवारात ट्रॅक्टर अंगावर घालून पत्नीची हत्या केल्याची अन् अपघाताचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कविता गजानन आढाव (वय-२९) असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पती गजानन रघुनाथ आढाव याला अटक करुन त्याच्यावर भोकरदन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती […]

Mumbaitak
follow google news

जालना : भोकरदन तालुक्यातील कुंभारी शिवारात ट्रॅक्टर अंगावर घालून पत्नीची हत्या केल्याची अन् अपघाताचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कविता गजानन आढाव (वय-२९) असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पती गजानन रघुनाथ आढाव याला अटक करुन त्याच्यावर भोकरदन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत कविताचा वर्षभरापूर्वीच गजाननसोबत विवाह झाला होता. गजाननचा हा तिसरा विवाह असल्याचं परिसरात बोललं जात आहे. मात्र काही कारणामुळे दोघांमध्ये सतत्याने खटके उडत होते. मागील महिन्यात गजानन विरुद्ध औरंगाबादमधील हर्सुल पोलीस ठाण्यात भांडणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मयत कविता ही माहेरी गेली होती.

पण कविताच्या माहेरकडील आणि सासरकडील मंडळींनी मध्यस्थी करून भांडणं सोडवली होती. दोघांमध्ये पुन्हा दिलजमाई झाल्याने मागील आठवड्यातच गजानन कविताला सासरी घेऊन गेला होता. परंतु पुन्हा कोणत्यातरी कारणावरून दोघांमध्ये वाद झाला, तोच राग डोक्यात ठेवून सगळं गाव नववर्षाच्या जल्लोषाचा तयारी करत असताना शनिवारी ३१ डिसेंबरच्या रात्री गजाननने कविताच्या खुनाचा बेत आखला.

गजाननने कविताला आधी जिवे मारलं आणि नंतर हा खून नसून अपघात वाटावा असा बनाव रचला. तिला ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकलं. या घटनेची वाच्यता होताच पोलिसांनी तत्काळ धाव घेत पंचनामा केला आणि संशयित आरोपी गजाननविरुद्ध कलम 302,498, ए 323, 504, 506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सासु, नणंदा आणि भाचा यांनी कविताकडे घरासाठी ५ लाख रुपयांची मागणी केल्याची आणि वारंवार तिचा छळ केल्याची तक्रार कविताचा भाऊ सुनिल माधवराव साखळे याने केली आहे.

दोघेही होते सरकारी नोकरदार :

या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे मयत कविता आणि संशयित आरोपी गजानन हे दोघेही चांगले शिक्षीत आणि सरकारी नोकरदार होते. कविता ही सिल्लोड येथील तहसिल कार्यालयात कोतवाल या पदावर कार्यरत होती, तर गजानन हा संभाजीनगर येथे विज वितरण कार्यालयात लिपीक या पदावर कार्यरत आहे. दोघेही सरकारी नोकरदार असल्याने या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

    follow whatsapp