लाइव्ह

MLA Disqualification: ‘एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणार हे माहीत नव्हतं’

मुंबई तक

19 Dec 2023 (अपडेटेड: 20 Dec 2023, 03:27 AM)

Mla Disqualification Case : नागपूरमध्ये एकीकडे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दुसरीकडे तिथेच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दोन्ही गटातील नेत्यांची उलटतपासणीनंतर प्रत्यक्ष युक्तिवाद सुरु असून, ठाकरे गटाला बाजू भक्कमपणे मांडण्याची अखेरची संधी आहे. कारण ठाकरे गटाचा युक्तिवाद संपल्यावर शिंदे गट युक्तिवाद करणार असून, त्यानंतर थेट या प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे. त्यामुळे ठाकरे कोणते मुद्दे मांडणार, हे निकालाच्या अनुषंगाने निर्णायक ठरणार आहे.

सुनावणीत काय घडलं, पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा

हिवाळी अधिवेशन आणि आमदार अपात्रता प्रकरणाशिवाय धारावी पुनर्विकास प्रकल्पासह इतर काही मुद्दे चर्चेत आहेत. अधिवेशन अंतिम टप्प्यात असून, सरकार मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका मांडणार… त्याबरोबर इंडिया आघाडीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात काय निर्णय होणार? सगळ्यांकडे लक्ष आहे… या सगळ्यांबद्दलचे अपडेट वाचा एकाच ठिकाणी…

 

mla disqualification case maharashtra : Devdatta kamat arguing by uddhav thackeray faction

mla disqualification case maharashtra : Devdatta kamat arguing by uddhav thackeray faction

follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:22 PM • 19 Dec 2023
    उद्धव ठाकरे, अनिल परब आणि सुनील प्रभू या तिघांच्या मनाप्रमाणे कारभार सुरू होता- जेठमलानी
    उद्धव ठाकरे, अनिल परब आणि सुनील प्रभू या तिघा व्यक्तींच्या मनात आलेली गोष्ट होती.. त्या त्यांनी कळवल्या होत्या. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी कोणताही निर्णय घेत नव्हती. मनात येईल तसे हे वागत होते. या तिघांच्या मर्जीप्रमाणे सगळ्या गोष्टी सुरू होत्या. - जेठमलानी
  • 10:18 PM • 19 Dec 2023
    MLA Disqualification: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणार आहे असं काही माहीत नव्हतं - जेठमलानी
    खरं आहे पण हे मतदारांच्या निर्णयावरही अवलंबून आहे. उद्धव ठाकरेंचा दावा होता की, त्यांना मुख्यमंत्री पदाबाबत आश्वासन देण्यात आले होते. एकनाथ शिंदेंना मात्र मुख्यमंत्रीपद मिळणार आहे असं काही माहीत नव्हतं. पण मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी निवडणूकपूर्व युती तोडली - जेठमलानी
  • 10:15 PM • 19 Dec 2023
    MLA Disqualification: राजकीय विचारसरणीत फरक पडला का?- नार्वेकर
    राजकीय विचारसरणीत फरक पडण्याबाबत मी म्हणतोय - नार्वेकर
  • 10:14 PM • 19 Dec 2023
    MLA Disqualification: एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन जाण्यास तयार होते - जेठमलानी
    एकनाथ शिंदेंना युती तोडायची होती, ते उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन जाण्यात तयार होते. एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सोडली तर ते अपात्र ठरत नाहीत - जेठमलानी
  • 10:09 PM • 19 Dec 2023
    MLA Disqualification: आम्हाला कधीच प्रभूंकडून समाधानकारक उत्तरं मिळाली नाही: जेठमलानी
    प्रभू यांना हे पत्र इंग्रजीत का लिहिले आहे असं विचारले होते, सुनील प्रभू यांनी उत्तर दिलेलं की, भविष्यातील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याचा वापर होणार आहे. उलटतपासणीत ते म्हणालेले की, मी ईमेलद्वारे व्हीप पाठवला होता. नंतर त्यांनी हा व्हीप व्हॉट्सअॅपद्वारे पाठवला असं सांगितलं होतं. नंतर प्रभूंनी विजय जोशींनी हा व्हीप पाठवला असं सांगितलं.. आम्हाला कधीच प्रभूंकडून उलट तपासणीत समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत.
  • 10:03 PM • 19 Dec 2023
    MLA Disqualification: उद्धव ठाकरेंनी अधिकारांचा वापर करत पक्षाची बैठक का नव्हती बोलावली: नार्वेकर
    उद्धव ठाकरेंनी त्यांच्या अधिकारांचा वापर करत पक्षाची बैठक का बोलावली नाही? पक्षाची बैठक न बोलवता विधानसभेची बैठक का बोलावली?: नार्वेकर
  • 10:01 PM • 19 Dec 2023
    MLA Disqualification: 22 जून 2022 रोजी अजय चौधरींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली: जेठमलानी
    'वर्षा'वर विधीमंडळ बैठकीत 14 आमदारांनी सही केली, 22 जून 2022 रोजी अजय चौधरींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला- जेठमलानी
  • 09:36 PM • 19 Dec 2023
    Marathi Live News : राणा दांपत्याला न्यायालयाचा दणका, हनुमान चालीसा प्रकरणातून दोषमुक्त नाहीच
    खासदार नवनीत राणा यांनी 2022 मध्ये मातोश्री बाहेर पोलिसांचा विरोध झुगारून हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याप्रकरणी नवनीत राणा व रवी राणा यांनी सादर केलेली याचिका मुंबई सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. नवनीत आणि रवी राणा यांनी या प्रकरणातू दोषमुक्ती करावे यासाठी याचिका दाखल केली होती.
  • 07:10 PM • 19 Dec 2023
    Marathi Live News : मराठा प्रश्नाला सरकारकडून हरताळ फासण्याचं काम, विजय वडेट्टीवार यांची टीका
    मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून कोणतंही ठोस उत्तर देण्यात आले नाही. जी तारीख आणि जो वेळ देण्यात आला होता, त्याला हरताळ फासण्याचं काम या सरकारने केले असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अधिवेशनाच्या काळात फक्त त्यांनी चर्चा करण्यापलिकडे काहीच केले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
  • 06:20 PM • 19 Dec 2023
    मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन- CM शिंदे
    "राज्य मागासवर्ग आयोग महिनाभरात आपला अहवाल सादर करेल, त्यानंतर त्याचे अवलोकन केले जाईल, आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात येईल. मराठा समाजाला हे आरक्षण देताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची मी ग्वाही या ठिकाणी देतो."
  • 06:16 PM • 19 Dec 2023
    मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन वचन दिलं- CM शिंदे
    'मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मी जाहिरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तसं वचन दिलं आहे आणि आजही मी त्यावर ठाम आहे. मराठा समाजाशिवाय इतर कोणताही समाज अडचणीत राहिला असता तर मी अशीच शपथ घेतली असती, त्यामुळे मी कुठेही मागे हटणार नाही, अशी ग्वाही पुन्हा एकदा देतो.' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 06:13 PM • 19 Dec 2023
    तज्ज्ञ समिती नेमली जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित केली- CM शिंदे
    "७ सप्टेंबर २०२३ रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. मराठवाड्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित केली. तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली. निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकालीन करार, त्यावेळच्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज या पुराव्यांची तपासणी कशी करायची हे या समितीने ठरविले. न्या. शिंदे समितीस सादर करण्यात आलेले १२ विभागांचे पुरावे, ४८ दस्ताऐवज ग्राह्य धरण्यासाठी तशी सुधारणा सामाजिक न्याय विभागाच्या नियमांत करण्यात येत आहे." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 06:13 PM • 19 Dec 2023
    मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- CM शिंदे
    'ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यात येईल. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी जे-जे काही करायचं आहे, ते सगळं करण्याची आमची तयारी आहे.' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:38 PM • 19 Dec 2023
    मराठा आरक्षणाच्या विषयावर आमच्या एकूण 30 बैठका - CM शिंदे
    "मराठा आरक्षणाच्या विषयावर माझ्या अध्यक्षतेखाली १० बैठका झाल्या, उपसमितीच्या १२ बैठका झाल्या, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली १ आणि सल्लागार मंडळाच्या ७ अशा एकूण ३० बैठका आमच्या कार्यकाळात झाल्या. सर्वपक्षीय बैठका देखील घेतल्या आहेत." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:33 PM • 19 Dec 2023
    मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे- CM शिंदे
    "या सर्वोच्च सभागृहातून आपल्याला आणि राज्यातील जनतेला माझे एकच सांगणे आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आम्हा सर्वांची भावना आणि भूमिका आहे. इतर समाजाच्या आरक्षणाचा अधिकार न डावलता, मराठा समाजाचा जो अधिकार आहे, तो आपल्याला मिळाला पाहिजे, त्यावर मराठा समाजाचा नैसर्गिक हक्क आहे.अन्य कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:31 PM • 19 Dec 2023
    ज्यांचे पुरावे मिळाले आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्रं द्यायला विरोध नाही- CM शिंदे
    "ज्यांचे पुरावे मिळाले आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्रं द्यायला आपला कुणाचाही विरोध नाही. सभागृहातही सर्व सदस्यांनी तशीच भूमिका मांडलेली आहे. कुणबी दाखले देण्याबाबतचा जीआर जुनाच आहे. परंतु, ते दाखले दिले जात नव्हते. आम्ही ती प्रक्रिया गतिमान केली आहे." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:27 PM • 19 Dec 2023
    मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, त्यासाठी...- CM शिंदे
    "मला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आणि मराठा समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचीही जाण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, त्यासाठी नेटाने आणि कायदेशीर पद्धतीने काम करावं लागेल, जे आम्ही करतोय. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा हा प्रश्न पेटला तेव्हा मी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:24 PM • 19 Dec 2023
    मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सर्व पातळींवर लढा देण्यास सज्ज- CM शिंदे
    "मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे, राज्यातील सर्व समाजबांधव माझ्यासाठी एकसमानच आहेत. प्रत्येक समाज घटकाला राज्याच्या प्रगतीत त्याचा योग्य तो वाटा मिळालाच पाहिजे, अशी आमची धारणा आहे. आज मराठा समाजाला प्रगतीसाठी आरक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. ते आरक्षण देण्यास आमचं सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी सर्व पातळींवर सरकार लढा देण्यास सज्ज आहे." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:21 PM • 19 Dec 2023
    मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरु आहे त्याचा अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये- CM शिंदे
    "महाराष्ट्रामध्ये कुठेही तणाव वाढणार नाही याची काळजी राज्यकर्त्यांनी, विरोधी पक्षांनी आणि एकूणच समाजानेही आजवर घेतली आहे. आपण आज घेतोय आणि यापुढेही घेत राहू. त्यामुळेच, मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुरु आहे, त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच सावध राहण्याची, विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था, बंधुभाव कायम राहिला पाहिजे. कोणत्याही निमित्ताने समाजा-समाजात वितुष्ट येता कामा नये. चर्चेतून आणि योग्य भूमिका घेतली गेली तर सर्व प्रश्न सुटतात. आजही मी तेच आवाहन सगळ्यांना यानिमित्ताने करू इच्छितो." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
  • 05:18 PM • 19 Dec 2023
    महाराष्ट्राच्या विकासाला मराठा समाजाचा मोठा हातभार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
    "राज्यातल्या इतर सर्व समाजाशी मिळून मिसळून मराठा समाजानं आजवर महाराष्ट्राची सांस्कृतिक, सामाजिक बांधणी घट्ट केली आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा हातभार लावला. पण, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. कुठल्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणे हे राज्याला भूषणावह नाही. पुरोगामी महाराष्ट्राला हे तर आजिबातच शोभणारे नाही." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले.
follow whatsapp