लाइव्ह
Maharashtra Breaking News Live : ‘जरांगेंएवढा ज्ञानी भारतात दुसरा कुणी नाही’, भुजबळांनी उडवली खिल्ली
मुंबई तक
31 Jan 2024 (अपडेटेड: 01 Feb 2024, 03:01 AM)
Marathi News Live Update : संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सूरूवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. यासह मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्यातील इतर घडामोडींसाठी मुंबई तकचे लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 08:10 PM • 31 Jan 2024ओबीसी नेत्यांविरोधात जोडो मारो आंदोलन-मराठा समाजाने दिला इशारामराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतरही काही ओबीसी नेते आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. त्याच्या निषेधार्थ बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते टी. पी. मुंडे यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. ओबीसी नेत्यांनी टीका करतांना आक्षेपार्ह भाषा वापरु नये, अन्यथा यापुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाज बांधवांनी दिला आहे.
- 07:56 PM • 31 Jan 2024भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांवर स्थानिकांचा रोष, कार्यक्रमातून पळभाजपचे खासदार सुजय विखे पाथर्डीमध्ये साखर वाटप कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी तेथील स्थानिकांकडून त्यांना "तुम्ही आमच्यासाठी काय केलं? कोणत्या योजना आणल्या?" असा सवाल उपस्थित करत प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी स्थानिकांचा रोष बघून खासदारांनी कार्यक्रमातून पळ काढला.
- 06:27 PM • 31 Jan 2024डोंबिवलीत ठाकरे गटाकडून मतदारांना भावनिक आवाहनमतदार राजा 'हे मतदान तुझं शेवटचं मतदान ठरु नये... तुझं एक मत 'हुकूमशाही' उलथविण्यासाठी' अशा आशयाचे बॅनर ठाकरे गटाकडून डोंबिवलीत लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाने नागरिकांना मतदारांना भावनिक आवाहन केल्याचे दिसून येतंय. डोंबिवलीत काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर टीका करत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन नागरिकांना केले होते. त्यानंतर ठाकरे गटाकडून लावण्यात आलेले हे बॅनर आता डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरतायत.
- 01:38 PM • 31 Jan 2024जरांगेंएवढा ज्ञानी भारतात दुसरा कुणी नाही, भुजबळांनी उडवली खिल्लीमागच्या दाराने दाखले देण्याचे काम सुरु आहे. यामुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. मनोज जरांगेनी मंडल कमिशनला आव्हान द्यायलाच पाहिजे कारण भारतात त्यांच्या इतका ज्ञानी कुणीच नाही आहे. 3 कोटी मराठे मुंबईत आणणार होते, ते बघितले सर्वांनी. 3 कोटी किती आहे ते वाशिलान कळालं. ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि कोटी म्हणजे समजत नाही अशी माणसे मंडला आयोगाला विरोध करतायत, असा टोला देखील भुजबळांनी जरांगेंना लगावला.
- 01:14 PM • 31 Jan 2024...तर संजय राऊत राजीनामा देणार का?बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो. माझ नाव कोणत्याच घोटाळ्यात नाही आहे. ना खिचडी घोटाळा, ना रेमिडीसीवीर घोटाळा, ना बॉडी बॅग घोटाळ्यात, तुम्ही आरटीआयमधून माहिती मागवा. माझे नाव आणि अमेयचे नाव आले तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत, पण तुम्ही संजय राऊत राजीनामा देणार का? तुमच्यात तितकं धाडस आहे का? असा सवाल राहुल कनाल यांनी राऊतांना विचारला आहे.
- 12:28 PM • 31 Jan 2024अयोध्येतील राम मंदिराची प्रतिक्षा पुर्ण झाली- द्रौपदी मुर्मूराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी आज नवीन संसदेत अभिभाषण केले. अयोध्येत राम मंदिर उभारण्याची अनेक वर्षाची प्रतिक्षा आता पुर्ण झाली आहे. भारत जगातील 5 वी अर्थव्यवस्था बनली आहे. देशातील स्टार्टअपची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सरकार गरीबी हटवण्यासाठी मोठं काम करते आहे. तसेच द्रौपदी मुर्मू यांनी जम्मू काश्मिरमधील अनुच्छेद 370 आणि तिहेरी तलाकवर देखील भाष्य केले.
- 11:02 AM • 31 Jan 2024पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला, गोंधळ घालणाऱ्यांनी 10 वर्षात...देशात नारीशक्तीच्या साक्षात्काराच पर्व सूरू आहे. आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे अभिभाषण होणार आणि उद्या निर्मला सीतारामण बजेट मांडणार आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. गोंधळ घालणे हा काही लोकांचा स्वभाव आहे, असा टोला मोदींना विरोधकांना लगावला आहे. तसेच गोंधळ घालणाऱ्यांनी आपलं मागच्या 10 वर्षातलं काम पाहाव आणि आत्मनिरीक्षण करावं, असा सल्ला देखील मोदींनी विरोधकांना दिला.
- 10:33 AM • 31 Jan 2024चोर कंपनीचे वस्त्रहरण करेन, संजय राऊतांचा कुणाला इशारा?ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खिचडी घोटाळ्यात अमेल घोले, वैभव थोरात, राहुल कनाल यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आज बाळासाहेब भवनात युवासेना सरचिटणीस राहूल कनाल व अमेय घोले पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सगळ्यांना उघडे करेन मी, चोर कंपनीचे आम्ही वस्त्रहरण करतो, असा हल्ला त्यांनी यावेळी केला आहे.
- 10:14 AM • 31 Jan 2024संवेदनशील लोकप्रतिनिधी गमावला - देवेंद्र फडणवीसविधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते 4 वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांती
- 09:52 AM • 31 Jan 2024रोहित पवारांनी अनिल बाबर यांना वाहिली श्रद्धांजलीखानापूर-आटपाडी मतदारसंघातील आमदार आणि विधानसभेतील माझे सहकारी अनिल बाबर (७४) यांचं अकस्मात निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! या कठीण प्रसंगी मी बाबर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.
- 09:45 AM • 31 Jan 2024Budget Session : मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्पसंसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सूरूवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यात काही लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT