लाइव्ह

Marathi News Live : ‘…तर थेट दावोसला नेणार’, शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी ठाकरेंचं विधान

मुंबई तक

15 Jan 2024 (अपडेटेड: 15 Jan 2024, 05:25 PM)

Marathi News Live Update : आमदार बच्चू कडू मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीत दोघांमध्ये काय चर्चा होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यासोबत रविवारी मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या प्रवेशावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहे. यासह राज्यातील इतर बातम्यांसाठी मुंबई तक लाईव्ह ब्लॉग फॉलो करा.

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 09:09 PM • 15 Jan 2024
    जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राजू शेट्टींचा पाठिंबा
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. 20 तारखेला जरांगे पाटील हे मराठ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी जरांगे पाटलांसोबत चर्चा केली. यावेळी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राजू शेट्टी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
  • 07:58 PM • 15 Jan 2024
    सर्वोच्च न्यायालयात मुख्यमंत्र्यासह 16 आमदार अपात्र होणारच-अनंत गीते
    विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिलाच नाही. तर त्यांनी आजचं मरण उद्यावर ढकललं असल्याची टीका अनंत गीते यांनी केली आहे. या महिन्यात कदाचित मुख्यमंत्री स्वतःच राजीनामा देतील अशी शक्यताही अनंत गीते यांनी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होणारच असंही त्यांनी विश्वासाने सांगितले.
  • 07:21 PM • 15 Jan 2024
    माझ्याप्रमाणे 77 टक्के लोक शेण खातात का? आव्हाडांचा फडणवीसांना सवाल
    राम मांसाहार करत होता असं वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीका करताना राम काय खातो हे बाजूला ठेवा मात्र तुम्ही शेण खाता हे कळलं असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर पलटवार करत माझ्या प्रमाणे मांसाहार करणारे 77 टक्के लोक शेण खातात का असा सवाल आता देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
  • 03:19 PM • 15 Jan 2024
    जरांगे पाटील सरकारला वेठीस धरत आहेत- गुणरत्न सदावर्ते
    मनोज जरांगे पाटील सरकारला वेठीस धरत असल्याचे सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकारला वेठीस धरत असल्याचा आरोप त्यांनी या याचिकेतून केला आहे.
  • 03:11 PM • 15 Jan 2024
    सरकारच्या पर्यटनासाठी दावोस दौरा- विजय वड्डेटीवार
    ५० लोकांचा ताफा सोबतीला आणि त्यांचा ३४ कोटींचा खर्च करून राज्याचे मुख्यमंत्री दावोसला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. इतकं करून ही गुंतवणूक महाराष्ट्रात येणार का? की केंद्रात बसलेल्या महाशक्तीच्या ताकदीने गुजरातमध्ये जाणार? महाराष्ट्रातील जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत तिथे राज्याचे हिताचे किती कामे होतील? दौऱ्याचा एकूण खर्च बघता हा दावोस दौरा सरकारच्या मर्जीतील अधिकारी, नेते आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळींच्या पर्यटनासाठी आहे का हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे, असे विजय वड्डेटीवार यांनी म्हटले आहे.
  • 01:44 PM • 15 Jan 2024
    संपूर्ण मुंबई महाविकास आघाडीच्या पाठीशी - भाई जगताप
    मिलिंद देवरा यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यानंतर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ट्वीट करून मिलिंद देवरा यांचे नाव न घेता त्यांना डिवचलं आहे. केवळ दक्षिण मुंबईच नाही तर संपूर्ण मुंबई महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे! ज्या पवित्र भूमीतून काँग्रेसचा जन्म झाला, ही तीच मुंबई आहे! ही बाळासाहेब ठाकरे सारख्या वाघाची मुंबई आहे! या मुंबईतच राजीव गांधी यांचा जन्म झाला!, असे ट्विट भाई जगताप यांनी केले आहे.
  • 01:01 PM • 15 Jan 2024
    ...तर थेट दावोसला नेणार, शिंदेंच्या दौऱ्यापूर्वी ठाकरेंचं विधान
    घटनाबाह्य सरकारच्या मागच्या 28 तासांच्या दावोस दौऱ्यात 40 कोटीचा खर्च झाला होता. आता सरकार 50 लोकांच प्रतिनिधी मंडळ चालले आहे. म्हणजे 50 खोके आणि 50 लोक घटनाबाह्य मु्ख्यमंत्र्यांसोबत चालली असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. तसेच 50 पैकी 10 लोकांची परवानगी घेतली आहे. बाकी 40 लोकांना घेऊन जाण्याची परवानगी घेतली आहे का? किती लोकांची परवानगी मिळाली आहे याची माहिती द्यावी, आमच्यासारखी त्यांनी यादी जाहीर करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
  • 11:08 AM • 15 Jan 2024
    सरकारच गणित यंदा चुकणार - मनोज जरांगे
    मुंबईतील शिवाजी पार्क आणि आझाद मैदान ही दोन्ही मैदान आम्हाला पाहिजे आहेत. 26 जानेवारी रोजी मराठ्यांचे आमरण उपोषण सुरू होणार आहे. आणि यंदा सरकारच गणित चुकणार,असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. या आंदोलनासाठी चेंबूर हुन सगळे पायी आझाद मैदानला जाणार आहेत. जे मुंबई ला येणार नाही त्यांनी अंतरवाली ला निघणार्यांना वाटेला लावायला यायचं, असे जरांगे पाटलांनी म्हटले आहे.
  • 09:52 AM • 15 Jan 2024
    जरांगेंचा आरक्षणासंदर्भात शिंदे सरकारला महत्त्वाचा सल्ला
    mumbaitak
  • 09:33 AM • 15 Jan 2024
    काळाचौकी परिसरात 8 सिलेंडरचा स्फोट
    दक्षिण मुंबईतील काळाचौकी भागातील एका शाळेत भीषण आगीची घटना घडली आहे. दादरच्या लालबाग इथल्या काळाचौकीच्या येथे गिरनार टॉवर आहे. या टॉवरच्या मागे असलेल्या शाळेत ही आगीची घटना घडली आहे. या आगीत 8 घरगूती सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात धुरांचे लोण पसरले आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
  • 09:12 AM • 15 Jan 2024
    मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
    mumbaitak
  • 09:06 AM • 15 Jan 2024
    20 तारखेच्या आत नोंदी निघालेल्यांना प्रमाणपत्र द्या- मनोज जरांगे
    mumbaitak
  • 08:57 AM • 15 Jan 2024
    मनोज जरांगेंच्या पायी मोर्चात मी सुद्धा सहभागी होणार: बच्चू कडू
    मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी ते मुंबई पायी मोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू हे जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटी येथे दाखल झाले आहेत. दरम्यान या मोर्चाआधी काही मार्ग निघतो यावर चर्चा करण्यासाठी अंतरवाली येथे आलो असल्याची प्रतिक्रिया आमदार कडू यांनी दिली. दरम्यान जरांगे यांच्या पायी मोर्चात मी सुद्धा सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले.
follow whatsapp