लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : ‘मला सरकारमधून, पक्षातून बाहेर काढावं’, भुजबळांचं मोठं विधान

मुंबई तक

29 Jan 2024 (अपडेटेड: 30 Jan 2024, 03:44 AM)

Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सगेसोयरे बाबतची अधिसूचना रद्द करावाी, अशी मागणी ओबीसी नेते छगन भूजबळ यांनी केली आहे.यासह राज्यातील इतर महत्वाच्या बातम्यांसाठी मुंबई तकचा लाईव्ह ब्लाँग नक्की वाचा.

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 09:14 PM • 29 Jan 2024
    रवींद्र वायकरांची 19 वर्षाचा अहवाल ईडीला देणार-चौकशीनंतर स्पष्टीकरण
    उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी रवींद्र वायकर यांची ईडीने नऊ तास चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये त्यांच्याकडे 19 वर्षाचा अहवाल मागितला असून त्यासाठी त्यांनी वेळ मागितल्याचेही त्यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यावर त्यांनी सांगितले की, ईडीकडून ज्या ज्यावेळी मला सांगण्यात येईल त्या त्या वेळी मी त्यांना सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
  • 02:18 PM • 29 Jan 2024
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 7 कंपन्याशी करार
    महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत 7 कंपन्याशी करार झाले आहेत. यामध्ये 2 लाख 76 हजार 300 कोटींच्या गुंतवणूकीचे करार आम्ही केले आहेत, असे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
  • 01:47 PM • 29 Jan 2024
    मला सरकारमधून, पक्षातून बाहेर काढावं
    सरकारमधून पक्षातून काढावं तरी चालेल असे मोठं विधान छगन भुजबळ यांनी केले आहे. पक्षाने काढावं, आमदारकी रद्द करावी, सरकारमधून काढावं, पण मी माझ काम सोडणार नाही, असे विधान छगन भुजबळ यांनी केले आहे. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
  • 10:23 AM • 29 Jan 2024
    जरांगेंचा भुजबळांवर पलटवार, दुसऱ्यांच्या अन्नात माती...
    छगन भुजबळांनी ओबीसी समाजातील तज्ज्ञांना हरकती पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. छगन भुजबळांचा हा धंदा आहे. मराठ्यांचा चांगलं झालेलं त्यांना पाहावत नाही. ओबीसींचाही फायदा झाला पाहिजे अशी आमची नियत आहे. परंतू लोकांच्या अन्नात माती कालवण्याची आमची नियत नाही. त्यामुळे मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं कारण नाही. कोणालाही कुठेही अडचण आली तर मी आंदोलन करायला तयार आहे.
  • 08:55 AM • 29 Jan 2024
    ओबीसी बांधवांचा घास काढून घेतला जातोय - छगन भुजबळ
    मराठा समाजाच्या वेगळ्या आरक्षणाला आमच्या कोणाचाही विरोध नव्हता पण आमच्या भटक्या विमुक्त ओबीसी बांधवांचा जो घास काढून घेतला जातोय त्याबद्दल आम्हाला सर्वांना दु:ख आहे, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. कारण 27 टक्के आरक्षण आम्हाला जाहीर झालं ते आम्हाला पूर्ण मिळालं नाही. साडे नऊ टक्के आरक्षण महाराष्ट्र सरकारमध्ये आहे. आधी फक्त मराठवाड्यात आरक्षण मागितलं. यानंतर ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट करण्यात आला, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला.
  • 08:51 AM • 29 Jan 2024
    राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी
    राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. अजित पवार गटातील आमदारांचे निलंबन करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
follow whatsapp