लाइव्ह
Marathi News Live : आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांना अटक- खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई
मुंबई तक
17 Jan 2024 (अपडेटेड: 18 Jan 2024, 03:18 AM)
Marathi News Live Update : अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात रामलल्लाच्या मुर्तीचे आज नव्या मंदिर परिसरात आगमन होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या स्त्री संवाद यात्रेला आजपासून विदर्भात सुरुवात होत आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर पहिल्याच दिवशी 70 हजार कोटींचे सामंजस्य करार झाला आहे. यासह महाराष्ट्राच्या राजकारणातील इतर बातम्यासांठी मुंबई तक लाईव्ह ब्लॉग नक्की वाचा.
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 09:53 PM • 17 Jan 2024आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सूरज चव्हाण यांना अटक- खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाईकोविड खिचडी घोटाळ्यात आदित्य ठाकरे यांचे जवळचे सहकारी सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सूरज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा करण्यात येत होती. खिचडी वाटपच्या कंत्राटावरून सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आल्याचे सागंण्यात येत आहे. त्या कंत्राट देताना मोठे फेरफार झाल्याचे सांगत त्यामध्ये बदल करण्यात आले होते असा आरोपही करण्यात आला आहे.
- 09:27 PM • 17 Jan 2024दावोस दौऱ्यामुळे राज्यात 2 लाखापेक्षा अधिक रोजगार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेराज्यात असलेल्या दोन इंजिनच्या सरकारमुळे उद्योजकांची महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढत आहे. आगामी काळातही मोठी गुंतवणूक होणार असून त्याचा फायदा राज्याला मोठ्या प्रमाणात होणार आहे. साडेतीन लाख कोटीची गुंतवणूक जी होते असल्याने जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्याला चांगले यश मिळाले असल्याचे दावोसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
- 08:53 PM • 17 Jan 2024मंदिर वहीं बनाएंगे जगह नही बताएंगे-जितेंद्र आव्हाडनिवडणूक आयोगाच्या अटी आणि नियम आहेत म्हणून हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले आपल्या पक्षाच्या चिन्हावर रामाचे चित्र वापरत नाहीत. नाही तर त्यांनी कमळ काढून तेच चित्र वापरले असते असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. यावेळी त्यांंनी भाजपवर निशाणा साधताना मंदिर वहीं बनाएंगे जगह नही बताएंगे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
- 07:38 PM • 17 Jan 2024पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी मान्यता-देवेंद्र फडणवीसपश्चिम महाराष्ट्रात येणाऱ्या पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर विभागातल्या दुष्काळी भागात पाणी वळवण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनेही मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला मान्यता दिल्यामुळे पुराचे पाणी आता कुठल्याही शहरात घुसणार नाही आणि कुठल्याही शहरात मोठ्या प्रमाणात पूर येणार नाही हे सर्व पाणी दुष्काळी भागात वळवणार असल्याने यामुळे पुरापासून महाराष्ट्राचे संरक्षण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
- 03:19 PM • 17 Jan 2024मराठ्यांनी पंतप्रधानांकडून अपेक्षा सोडावी, राज्यात येऊन..., मनोज जरांगेंची टीकाmumbaitak
- 02:22 PM • 17 Jan 2024महाराष्ट्राचा कारभार देवेंद्र फडणवीसांनी हातात घ्यावाmumbaitak
- 01:03 PM • 17 Jan 2024बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचं रास्ता रोकोबीडच्या माजलगावातील परभणी चौकात सर्वपक्षीयांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोकोत माजलगांव-तेलगाव रस्त्यासह पिक विमा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, माजलगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, चालका विरुद्ध आणलेला नवीन कायदा रद्द करा या मागण्या करण्यात आल्या. यावेळी शेकाप, माकप, भाकप, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आघाडी, मौलाना आझाद मंच, सह सर्वपक्षीयांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला यावेळी तब्बल चार किलोमीटर वाहनाच्या रांगा गेल्या होत्या.
- 12:46 PM • 17 Jan 2024महाराष्ट्रद्वेषी, गुजरातवादी सरकारने फिल्मफेअर गुजरातला पळवलाmumbaitak
- 12:36 PM • 17 Jan 2024धमकी देणं हा शिवसेनेचा स्वभाव - अंबादास दानवेअंबादास दानवे यांनी आज बुलढाणा जिल्ह्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे धमक्या देत असल्याचा प्रश्न पत्रकारांनी केला होता. यावर उत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले की, धमकी देणं हा शिवसेनेचा स्वभाव आहे, जर तुम्ही असं केलंत. धमकी देऊ नका तर अंबादास दानवे म्हणाले.तुम्ही काय विनंती करणार, आम्ही धमकी दिली नाही, धमकी दिली असती तर रस्त्यावर उतरू शकलो नसतो, असे दानवे म्हणाले आहेत.
- 12:29 PM • 17 Jan 2024सुषमा अंधारेंनी सत्ताधाऱ्यांना डिवचलंजर केली नसती सुरत गुवाहाटी, तर कशाला झाली असती दाटीवाटी..असे कॅप्शन लिहून सुषमा अंधारे यांनी सत्ताधांऱ्यांना डिवचलं आह
- 11:18 AM • 17 Jan 2024आताची शिवसेना ही पाकीट मारीते सुद्धा कमळाच्या चिन्हावर लढणार आहेत असा मी ऐकत आहे .मुळात ती शिवसेना नाही आहे हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे, ही शिवसेना कशी असू शकते. शिवसेना इकडे आहे आम्ही 23 जागा लढत आहे. या आधी सुद्धा लढत आहे आणि त्याच्यानंतर ही लढू ही खरी शिवसेना आहे.आताची शिवसेना ही पाकीट मारी आहे.दुसऱ्याचे पाकीट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचा तशी शिवसेना फार काळ टिकणार नाही, असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लगावला.
- 10:50 AM • 17 Jan 2024तुम्ही दिलेला निकाल जनतेसमोर येऊन सांगाmumbaitak
- 09:04 AM • 17 Jan 2024ठाकरेंनंतर मनसे जाणार जनता न्यायालयमहाराष्ट्र सैनिकांवर आंदोलनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. कोर्टात तुम्हाला वर्षानुवर्ष केसेस लढाव्या लागतात. न्याय मिळेल की नाही याची अपेक्षा नसते. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनी त्यांच्या त्यांच्या शाखेत एक एक जनता न्यायालय बसवावं आणि या न्यायालयात आपल्यावरी केसेस चालवून आपली निर्दोष सुटका करून घ्यावी. गरज भासल्यास वकीलांनाही बोलवावे,असे मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सांगितले आहे.
- 08:50 AM • 17 Jan 2024फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या रणरागिणी करणार शक्तिप्रदर्शनशिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री संवाद यात्रा काढणार आहेत. या यात्रेची सुरुवात विदर्भात झाली असून ती बुधवारी नागपूर जिल्ह्यात दाखल होत आहे. जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघात ही यात्रा फिरणार असून महिलांशी संवाद साधणार आहे. रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथील शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने हे शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे ही जागा उद्धव ठाकरे गटांसाठी महत्वाची आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT