लाइव्ह

Narendra Modi Live : PM मोदींचा विरोधकांना टोला, ‘दशकभर विरोधी बाकावर बसणार’

मुंबई तक

05 Feb 2024 (अपडेटेड: 06 Feb 2024, 02:18 AM)

Marathi News Live Update : राज्य मंत्रिमंडळांची आज बैठक होणार आहे. दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे.या सोबत ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते रत्नागिरीत असणार आहे. बारसू, राजापूर, रत्नागिरी, देवरूख, चिपळूण ठिकाणचा दौरा ठाकरे करणार आहेत. यासह इतर राजकीय घडामोडींसाठी मुंबई तकचा लाईव्ह ब्लॉग नक्की वाचा.

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 09:01 PM • 05 Feb 2024
    असिफ दाढी माझे मित्र नाहीत, त्यांची कर्तबगारी काय- जयंत पाटलांचा खोचक सवाल
    उपमुख्यमंत्री अजित पवारांची गुंड असिफ दाढी यांने भेट घेतली होती. त्यावरुन आता अजित पवारांवर टीका केली जात आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही खोचक उत्तर दिलं आहे. त्यावर ते म्हणाले की, आसिफ दाढी माझे मित्र नाहीत व त्यांची कर्तबगारी काय आहे, हे ही मला माहिती नसल्याची टीका करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या गटबाजीवर बोलत गटबाजी नसून आमच्यामध्ये योग्य संवाद आहे. लोकसभेची कामं सुरु असल्यामुळे ते मेळाव्याला येऊ शकले नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केले.
  • 07:49 PM • 05 Feb 2024
    मुख्यमंत्र्यांनी आरक्षणासाठी खुर्ची सोडली पाहिजे- सुषमा अंधारे
    ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा विदर्भातून मराठवाड्यात दाखल झालेली असतानाच आज मराठवाड्यात तिसरा दिवस होता. तेव्हा हिंगोलीच्या गांधी चौकात सभा पार पडत असतानाच सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. यावेळी त्या म्हणाल्या की, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री यांनी खुर्ची सोडली पाहिजेत आणि रस्तावर येऊन आंदोलन केले पाहिजेत तेव्हा आम्ही म्हणू एकनाथ शिंदे खरच मराठ्यांच्या बाजूचे आहेत अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
  • 05:39 PM • 05 Feb 2024
    PM मोदींचा विरोधकांना टोला, दशकभर विरोधी बाकावर बसणार
    राष्ट्रवादीच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. एका गोष्टीवरून माझा आणि देशाचा विश्वास पक्का झाला आहे. विरोधकांनी दशकभर विरोधी बाकावर बसण्याचा संकल्प केला आहे.
  • 03:37 PM • 05 Feb 2024
    लोकसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
    निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचारात लहान मुले आणि अल्पवयीन मुलांना सहभागी न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
  • 03:17 PM • 05 Feb 2024
    अजित पवार बाजारबुणगे
    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. त्यात शरद पवार गटाचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पक्ष चोरीवरून अजित पवार यांना बाजारबुणगे म्हटले आहे. या टीकेमुळे आता अजित पवार गट आणि शरद पवार गट आमने-सामने येणार असल्याचे दिसत आहे.
  • 12:06 PM • 05 Feb 2024
    गुडांना साथ... मित्रांचा विकास, मोदींवर ठाकरे बरसले
    पंतप्रधानांना मी अजूनही शत्रु मानत नाहीत. ते मला मानतायत. कारण त्याने आपली शिवसेना फोडली, शिवसेना चोरली.ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकटकाळात मदत केली होती, त्या बाळासाहेबांची देखील त्यांनी चोरी केली. चोराला मदत केली आणि त्याला मुख्यमंत्री पदी बसवलं.
  • 10:50 AM • 05 Feb 2024
    नुसता लिहतो, घरी झोपतो, मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा
    मराठ्यांनी 75 वर्षात जो कायदा बनला नाही तो बनवला. हे आंदोलनाचे यश नाही आहे का? सोशल मीडियावर लिहतो काय मिळालं, हे यश नाही का? कायद्यात काय बदल करावा लागतो, कायद्यात काय दुरूस्ती करायची? काय अधिसूचना काढायची ? कायद्यात रूपांतर कसे करायचे? हे पण तुला कळत नाही, लिहतो नुसता. घरी झोपतो. कोणत्या तरी राजकारण्याचे ऐकतो सूपारी घेतो, विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात,असा हल्लाबोल मनोज जरांगेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केला.
  • 09:24 AM • 05 Feb 2024
    अजित पवार एसटी बस, ट्रेनने फिरतात... आव्हाड असं का म्हणाले?
    अजित पवार म्हणतात की एवढा वेळ मी माझ्या धंद्यासाठी दिला तर विमानाने आणि हेलिकॉप्टरमधून फिरेन. सध्या ते एसटी बसने आणि आणि ट्रेनने फिरतात काय? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना केला आहे.
  • 09:15 AM • 05 Feb 2024
    युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक
    mumbaitak
  • 09:06 AM • 05 Feb 2024
    राजकारणातील ठाण्याचा राखी सावंत
    mumbaitak
  • 08:59 AM • 05 Feb 2024
    ठाकरेंचा आज रत्नागिरी दौरा, उदय सामंतांवर काय बोलणार?
    उद्धव ठाकरे आज 5 फेब्रुवारीला बारसू, राजापूर, रत्नागिरी, देवरूख, चिपळूण ठिकाणचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते शिंदे गटातील आमदारांवर टीका करत आहेत. आता शिंदे गटातील आमदार उदय सामंतांवर ते काय बोलणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
follow whatsapp