लाइव्ह

Maharashtra Breaking News Live: “तू नुसता बाहेर निघ म्हणा…”, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना धमकीवजा इशारा

रोहिणी ठोंबरे

10 Dec 2023 (अपडेटेड: 11 Dec 2023, 02:57 AM)

Maharashtra news Live Chhagan Bhujbal Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. ठिकठिकाणी जरांगे यांच्या सभा होत आहेत. दुसरीकडे छगन भुजबळ यांनीही मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध करत एल्गार सभा सुरू केल्या आहेत. दोन्ही नेते एकमेकांवर एकेरी भाषेत टीका करत असून, दिवसेंदिवस दोघांमधील वाद विकोपाला जाताना दिसत आहे.

मराठा आरक्षणाबद्दल सुरू असलेला वाद… अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान आणि राजकीय घडामोडींचे अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी…

Maharashtra Breaking News Live

Maharashtra Breaking News Live

follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:03 PM • 10 Dec 2023
    Marathi News Live Update : चप्पल फेकण्याचे काम नामर्दच करू शकतो, ठाकरे गटाची राणे समर्थकांवर टीका
    भाजपचा नामर्द आमदार नितेश राणेच्या नामर्द कार्यकर्त्याने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर नमर्दानकी दाखवात चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला आहे. मर्दाच्या गाडीवर चप्पल फेकण्याचे काम नामर्दच करू शकतो अशी टीका ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली. तू जर मर्दाची औलाद असशील, तू जर एका बापाला पैदा झाला असशील तर तिथेच थांबायला पाहिजे होतं असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.
  • 09:29 PM • 10 Dec 2023
    Marathi News Live Update : मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हटल्याने राऊतांवर चप्पल फेकली, तरुणाने दिली कबुली
    सोलापूरात आज खासदार संजय राऊत यांच्या कारवर चप्पल फेक करण्यात आली. त्यानंतर सागर शिंदे नावाच्या तरुणाने आपणच चप्पल फेकल्याची कबुल केले आहे. संजय राऊत अनेकदा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात. मराठा मूक मोर्चाला मूक मोर्चा म्हटल्याच्या रागातून आपण हे कृत्य केल्याचीही कबुली त्याने दिली आहे. दगड सापडला असता तर संजय राऊत यांचे डोके फुटले असते असं धक्कादायक विधानही त्याने केले आहे. तो नारायण राणेंचा समर्थक असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • 08:48 PM • 10 Dec 2023
    Marathi News Live Update : सोलापुरात राऊतांच्या कारवर चप्पल फेक, नारायण राणेंच्या दिल्या घोषणा
    सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पल फेक करण्यात आल्याने जोरदार गोंधळ उडाला. संजय राऊत आपल्या कारमधून बसून जात असतानाच त्यांच्या कारवर चप्पलने भरलेली पिशवी फेकण्यात आली. सोलापुरातील बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्यानंतर संजय राऊत परतत असताना ही घटना घडली. चप्पल फेकीनंतर नारायण राणे जिंदाबाद अशा घोषणा देत कार्यकर्ते पसार झाल्याचे सांगण्यात आले.
  • 08:09 PM • 10 Dec 2023
    Marathi News Live Update : मुंबईसह महाराष्ट्रात मराठा आरक्षण अधिकार परिषद घेणार, एल्गार परिषदेची माहिती
    मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात मराठा आरक्षण अधिकार परिषद घेण्यात येणार आहे. ही माहिती एल्गार बीडच्या माजलगाव येथे आयोजित मराठा आरक्षण अधिकार परिषदेतून, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी दिली. आज बीडच्या माजलगाव येथे मराठा आरक्षण अधिकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आणि मागणीला आमचा पाठिंबा असून सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येत मराठा आरक्षण परिषद आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
  • 07:20 PM • 10 Dec 2023
    Marathi News Live Update : पाकिस्तानात-अमेरिकेत जाऊन विचारा शिवसेना कुणाची; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
    शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. शिवसेना ठाकरेंचीच असल्याचे सांगत पाकिस्तानात आणि अमेरिकेत जाऊन विचारा शिवसेना कुणाची. तेथील लोकही निवडणूक आयोगाला सांगतील शिवसेना ही ठाकरेंचीच अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला. शिवसेना ही बेकायदेशीर फोडली,आणि बेकायदेशीर सरकार महाराष्ट्र राज्यात आणली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
  • 06:39 PM • 10 Dec 2023
    Marathi News Live Update : महामानवांच्या विचारांनीच आपण पुढं जाणार, रोहित पवार
    ल्या 25 दिवसात आम्ही सर्वांनी मिळून 800 किलोमीटरचा प्रवास केला आहे. पुणे ते नागपूर पार केले आहे. या प्रवासात समाजातील सर्व घटकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्नही आम्ही केला आहे. आम्ही महामानवांचा विचार कधी सोडला नाही. त्यांनासुद्धा संघर्ष करावा लागला होता. आयतं कोणाला काहीच मिळत नसते. महामानावांच्या विचारांनी सर्वांनी जगायचं आहे त्यासाठी ही युवा संघर्ष यात्रा असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
  • 06:17 PM • 10 Dec 2023
    Marathi News Live Update : छगन भुजबळांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका, जरांगे पाटलांचा पलटवार
    मनोज जरांगे पाटील सध्या लातूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप करत मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करून स्वतःचा राजकीय फायदा घेण्यासाठी ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. त्यामुळे दोन्ही समाजांनी त्यांच्याकडे लक्ष देऊन आपापल्यामध्ये तेढ निर्माण करून घेऊ नये. ओबीसी व मराठा समाज पूर्वीपासूनच एकत्रित राहिलेला आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही राहायला पाहिजे. त्यामुळे छगन भुजबळचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.
  • 05:43 PM • 10 Dec 2023
    Marathi News Live Update : तू नुसता बाहेर निघ म्हणा..., मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना धमकीवजा इशारा
    लातूर जिल्ह्यातील औसा येथे झालेल्या सभेत मनोज जरांगे म्हणाले, "आपण रागीट लोक आहोत. राग आणू नका. त्यांनी कितीही अपमान केला तरी पचवा. शांत रहा. संयम आणि शांतता दोन्ही सोबत राहू द्या. एकदा आरक्षण मिळालं, मग आपण मोकळे. त्याला (छगन भुजबळ) कुठं जायचं नाही. आपल्याला कुठं जायचं नाही. तो आणि आपण एकाच गल्लीत आहोत. तू (छगन भुजबळ) नुसता बाहेर निघ म्हणा... आरक्षण मिळू द्या फक्त", असा गर्भित इशारा मनोज जरांगेंनी भुजबळांना दिला.
  • 04:30 PM • 10 Dec 2023
    Maharshtra Breaking News Live: अजित पवार गटाचा आमदार मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार
    आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरील जाळपोळ दगडफेकीनंतर आज सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आमदार सोळंके यांनी आपली जाहीरपणे भूमिका स्पष्ट केली. 'कायद्याने कायम टिकणारा आरक्षण मराठा समाजाला मिळावा याला पाठिंबा देतो येणाऱ्या काळामध्ये मला जे काही करावे लागेल ते मी करेन. आंदोलन करेन, वेळप्रसंगी राजीनामा देखील देईन. त्यासाठी मी मागेपुढे पाहणार नाही, योग्य वेळेला निर्णय घेऊन. मी या आंदोलनामध्ये सहभागी राहीन.' असं आमदार प्रकाश सोळंके यांनी माजलगाव शहरांमध्ये आज झालेल्या मराठा आरक्षण अधिकार परिषदेमध्ये म्हटलं.
  • 02:49 PM • 10 Dec 2023
    स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक; राजू शेट्टी यांचे ऊस दरासाठी ठिय्या आंदोलन
    सांगलीत ऊसदरावरून सुरू असलेल्या चर्चेत आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कार्यकर्ते वसंतदादा साखर कारखान्याच्या गेटच्या आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे सध्या कारखान्यावरती काटा बंद आंदोलनाला आपल्या कार्यकर्त्यांसह बसले आहेत.
  • 01:49 PM • 10 Dec 2023
    Maharshtra Breaking News Live: राजू शेट्टींचा सरकारला इशारा, काय केली मागणी?
    ऊस दरावरून आक्रमक झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. 'आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार. राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, लवकरात लवकर ऊसदराचा तिढा सोडवावा; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार', असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
  • 12:15 PM • 10 Dec 2023
    CM शिंदेंनी चालवला ट्रॅक्टर; आदित्य ठाकरेंची कमेंट व्हायरल
    शनिवारी (9 डिसेंबर) मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. यावेळी त्यांनी कचरा वाहून नेण्यासाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर चालवला. शिंदेंचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. यावर आता आदित्य ठाकरे यांनी उपरोधिक टोला लगावला. "समुद्रामध्ये कोणी ट्रॅक्टर चालवतं का? शिंदेंचे ट्रॅक्टर चालवतानाचे फोटो पोहून मला हसू आलं. मला विचारलं असतं, तर मी फोटोसाठी पोज सांगितली असती", असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.
  • 11:14 AM • 10 Dec 2023
    Gopichand Padalkar: चप्पल फेक प्रकरणावर आमदार गोपीचंद पडळकर काय म्हणाले?
    'मराठा आरक्षणाच्या लढाईत घुसलेले समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होतं की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणं नसून समाजात अशांतता पसरवणं आहे. यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे हे आम्हा सगळ्यांना माहित आहे. कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे. काल जर मी समजूतदारपणे संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते.” असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं.
  • 10:37 AM • 10 Dec 2023
    Marathi News Live Update: देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणं व्हावं नाही तर...- मनोज जरांगे पाटील
    'देवेंद्र फडणवीसांनी आताच शहाणं व्हावं नाही तर मी सगळं बाहेर काढणार. मीच घडवून आणतोय हे त्यांनी उघडपणे सांगावं. त्यांनी आधी मोठेपणा दाखवला होता. त्यांनी आता खोड्या करायला सुरुवात केली आहे.' असं मनोज जरांगेंनी बीडमधील सभेत म्हटलं आहे.
  • 09:33 AM • 10 Dec 2023
    Maratha Reservation: बीड जिल्ह्यात 22 वर्षाच्या तरुणाने घेतला गळफास, सुसाईड नोटमध्ये काय?
    मराठा आरक्षणाच्या मागणीने राज्यात जोर धरला आहे. दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येसारख्या घटनाही घडत आहे. अशीच घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील देवठाणा येथे 22 वर्षीय प्रवीण बाबुराव सोळंके या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करत आहे, असे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे.
follow whatsapp