लाइव्ह

Maharshtra Breaking News Live : ‘राज्यात असाच गुंडाराज होत असेल, तर…’; प्रकाश आंबेडकरांची पोस्ट

मुंबई तक

03 Feb 2024 (अपडेटेड: 04 Feb 2024, 04:54 AM)

Marathi News Live Update : कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदारानं पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. हा गोळीबार शिवसेना पदाधिकाऱ्यावर झाला असून या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आमदार गणपत गायकवाड यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणानंतर ठाणे आणि कल्याण परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 06:07 PM • 03 Feb 2024
    Marathi News Live Update : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजप कार्यकर्त्यांकडून राडा
    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाटक प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला आहे. 'जय श्रीराम'चा नारा देत भाजपचे कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जाऊन तोडफोड केली. यासोबतच शाई फेक करत काचेची देखील तोडफोड करण्यात आली.
  • 06:04 PM • 03 Feb 2024
    मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले सर्वेक्षण 100 टक्के पूर्ण
    मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेतली होती. 23 जानेवारी पासून सुरू झालेली ही मोहीम संपली आहे. मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले सर्वेक्षण 100 टक्के पूर्ण झाले आहे. यात 75.76 टक्के सर्वेक्षण घरात जाऊन केले तर 14.99 टक्के घरे बंद होती. तर 9.23 टक्के लोकांनी सर्वेक्षण करण्यास नकार दिला आहे.
  • 06:02 PM • 03 Feb 2024
    Marathi News Live Update : अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांचे टोचले कान
    अजित पवारांनी सोलापूरातील मेळाव्यात पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. 'आपल्याला पक्षात एकजूट दाखवायची आहे.घरात देखील भांड्याला भांडे लागते पण त्याचा आवाज होऊ द्यायचा नाही. एकेमकांबद्दल आकस बुद्धीने पाहू नका. काहीही झाले तरी मनात वेगळा विचार आणू नका. शहर आणि ग्रामीण या दोन्ही कार्यालयातर्फे लोकांची कामे झाली पाहिजेत', असे ते म्हणाले.
  • 04:03 PM • 03 Feb 2024
    Marathi News Live Update : ओबीसींचे संजय गायकवाड यांच्या फोटोलो जोडे मोरो आंदोलन
    आमदार संजय गायकवाड यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबाबत अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ पुणे जिल्ह्याच्या तळेगाव- ढमढेरे येथे ओबीसी समाजाने संजय गायकवाड यांच्या फोटोला जोडे मारीत आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले.
  • 04:03 PM • 03 Feb 2024
    Marathi News Live Update : राज्यात असाच गुंडाराज होत असेल तर...- प्रकाश आंबेडकरांनी शेअर केली पोस्ट
    ''राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे घसरला आहे. तुमचे कितीही मतभेद असले, तरी लोकशाहीमध्ये तुम्ही राजे नाहीत. तुम्हाला लोकं राजे बनवतात. तेव्हा मर्यादेत राहून लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी स्वतःवर नियंत्रण ठेवावे. अशा मानसिकतेच्या लोकांना जनतेने घरी बसवले पाहिजे, तेव्हाच लोकशाही टिकेल. राज्यातील पूर्ण प्रशासन कोसळले आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याकडे बघितले पाहिजे. राज्यात असाच 'गुंडाराज' होत असेल, तर संबंधित मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे.'' अशी पोस्ट प्रकाश आंबेडकर यांनी शेअर केली आहे.
  • 02:29 PM • 03 Feb 2024
    Marathi News Live Update : महेश गायकवाड यांची भेट घेण्यासाठी एकनाथ शिंदे रूग्णालयात दाखल
    शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयात दाखल दाखल झाले आहेत. महेश गायकवाड आणि त्यांचे साथीदार राहुल पाटील हे दोघे जखमी झाले आहेत. गोळीबार झाल्यानंतर रात्रीच गायकवाड आणि पाटील या दोघांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. ज्यावेळी गायकवाड यांना रुग्णालयात आणले. त्यावेळी रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती.
  • 12:04 PM • 03 Feb 2024
    Marathi News Live Update : महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे मुडदे पडलेत- संजय राऊतांचा हल्लाबोल
    'महेश गायकवाड यांच्यावर झालेला गोळीबार धक्कादायक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे. एकनाथ शिंदेच्या राजवाटीत गुंड्यांची पैदास सुरु आहे. तसंच एकनाथ शिंदेंमुळे गोळीबार केला असं, गणपत गायकवाड यांचं वक्तव्य आहे. महाराष्ट्र इतक्या रसातळाला कधीच गेला नव्हता. महाराष्ट्रात कायदा, सुव्यवस्थेचे मुडदे पडलेत,' असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. 'कसलं कायद्याचं राज्य, गृहमंत्री कुठे आहेत?' असा सवाल विचारत त्यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडले.
  • 10:16 AM • 03 Feb 2024
    Marathi News Live Update : राज्यातील मराठा सर्वेक्षणाचे काम संपले!
    राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी असा दहा दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानुसार राज्यात दीड लाखाहून अधिक प्रगणकांनी सुमारे ३ कोटींहून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले. या माहितीच्या आधारे मराठा समाजच मागासलेपण तपासले जाणार आहे. सर्वाधिक डाटा मराठवाडा आणि पुणे जिल्ह्यातून जमा झाला आहे.
follow whatsapp