लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : मनोज जरांगेंच आंदोलन मुंबईत धडकणार, मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुंबई तक

23 Dec 2023 (अपडेटेड: 24 Dec 2023, 02:36 AM)

Marathi News Live Update : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम रविवारी संपणार आहे. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये आज शेवटची सभा होणार आहे. या सभेत जरांगे पाटील आंदोलनाची कोणती पुढील दिशा ठरवणार आहे हे समजेल.

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 08:55 PM • 23 Dec 2023
    Maharashtra Breaking News Live : मनोज जरांगेंच आंदोलन मुंबईत धडकणार, मुख्यमंत्री काय म्हणाले?
    मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. क्युरेटिव्ह पिटीशन 24 जानेवारीला सुप्रीम कोर्ट ऐकणार आहे. सुप्रीम कोर्टात वकिलांची फौज त्रुटी दूर करण्याचं काम करेल. मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी मागच्या सरकारनं पुरावे मांडले नव्हते. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न सरकार करेल. तोपर्यंत इतरांनी शांतता आणि संयम बाळगला पाहिजे. सुप्रीम कोर्टात बाबी मांडू आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ असं एकनाथ शिंदे म्हणाले.
  • 07:55 PM • 23 Dec 2023
    Maharashtra Breaking News Live : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल, या नेत्यांना मिळाली मोठी जबाबदारी
    लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या संघटनेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदावर असलेल्या प्रियंका गांधी यांच्या जागी अविनाश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन पायलट यांची छत्तीसगडचे प्रभारी महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रमेश चेन्निथला यांची महाराष्ट्राचे AICC प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. मिलिंद देवरा आणि विजय सिंघला यांना संयुक्त खजिनजदारपदी नियुक्त करण्यात आले आहे.
  • 07:00 PM • 23 Dec 2023
    Maharashtra Breaking News Live : छगन भुजबळांचा जरांगेंवर पलटवार, मी अशा कोल्हेकुईला भीक...
    mumbaitak
  • 05:33 PM • 23 Dec 2023
    Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार
    mumbaitak
  • 05:29 PM • 23 Dec 2023
    Manoj Jarange Live : आरक्षण आम्ही हिसकावून आणणारच- जरांगे
    mumbaitak
  • 05:14 PM • 23 Dec 2023
    Manoj Jarange Live : जरांगे पाटलांचा मोठी घोषणा, मराठा समाज 20 जानेवारीला मुंबईत धडकणार
    mumbaitak
  • 05:08 PM • 23 Dec 2023
    Manoj Jarange Live : राज्याचं पालकत्व तुम्ही स्वीकारलंय, मग..., जरांगेची मुख्यमंत्र्यांवर टीका
    mumbaitak
  • 04:58 PM • 23 Dec 2023
    Manoj Jarange Live : मी मॅनेज होत नाही हाच...,जरांगे काय म्हणाले?
    समाजाशी गद्दारी करायला आंदोलन केलेलं नाही.. ही एकट्या बीडमधील ताकद आहे. यांचा प्रॉब्लेम हा तोच आहे की, मी त्यांना मॅनेज होत नाही.. माझं आणि पैशाचं जमत नाहीत. मी काय चुकीचं करतोय?
  • 04:55 PM • 23 Dec 2023
    Manoj Jarange Live : मराठ्यांवर अन्याय केला तर...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
    mumbaitak
  • 04:52 PM • 23 Dec 2023
    Manoj Jarange Live : कसं मंत्री केलं, महाराष्ट्राला कलंक..., जरांगेची भूजबळांवर टीका
    mumbaitak
  • 04:49 PM • 23 Dec 2023
    Manoj Jarange Live : मग कशाला मराठ्यांच्या वाट्याला जातो, जरांगेचा भुजबळांना इशारा
    mumbaitak
  • 04:47 PM • 23 Dec 2023
    Manoj Jarange Live : जरांगेचा भुजबळांवर गंभीर आरोप , बीडमधील जाळपोळीवर काय म्हणाले?
    mumbaitak
  • 04:38 PM • 23 Dec 2023
    Manoj Jarange Live: मराठा माय-बापावर खोटा डाग लावलाय-जरांगे पाटील
    कोणी म्हणतं आमची घर जाळली, कोणी म्हणतं हॉटेल जाळली. आमच्यावर खोटा डाग लावलाय. यांनी यांचीच हॉटेल जाळली आणि निष्पाप मराठा बांधवांना गुतवले, असा आरोप जरांगेनी केला.
  • 04:31 PM • 23 Dec 2023
    Manoj Jarange Patil : येवल्याच्या यडपटाला...,जरांगे पाटलांची भूजबळांवर टीका
    मराठ्याचा हा महाप्रलय पाहून येवल्याच्या येडपटाला संडासला लागल्याशिवाय राहत नाही.. अशा खालच्या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर टीका केली आहे.
  • 03:17 PM • 23 Dec 2023
    Marathi News Live Update : मराठा आरक्षणाबाबत भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे आवाहन!
    '24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय होणे शक्य नाही. कारण, अहवाल आता प्राप्त झाला आहे. आरक्षण दिल्यानंतर ते रद्द होऊ नये यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्वांनी संयम राखावे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि आरक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे.' असे आवाहन भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
  • 01:53 PM • 23 Dec 2023
    Marathi News Live Update : सुषमा अंधारे बिन पुराव्याचे आरोप करतात- देवयानी फरांदे
    'बोलण्याची ही पद्धत म्हणजे लोकशाहीला पायदळी तुडवण्याची पद्धत आहे. सुषमा अंधारे बिन पुराव्याचे आरोप करतात. चुका करून सुद्धा अशा वागतात की देशाचा कायदा त्यांना लागू नाही. हक्कभंगाचा प्रस्ताव मी आणला आहे.' असं देवयानी फरांदे म्हणाल्या.
  • 01:51 PM • 23 Dec 2023
    Marathi News Live Update : जरांगेंनाही माहीत आहे की आरक्षण शिंदेच देणार- संजय शिरसाट
    'जरांगेंनाही माहीत आहे की आरक्षण शिंदेच देणार आहेत. अधिवेशनात स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. तसंच ओबीसींबद्दलही मांडलीये, सर्व समाजाला याची कल्पना आहे. सभा प्रचंड होईल पण त्यांच्या सभेला कधीही परवानगी नाकारली नाही.' असं संजय शिरसाट म्हणाले.
  • 12:30 PM • 23 Dec 2023
    Marathi News Live Update : पुण्यात शरद पवारांची होणार जाहीर सभा
    शरद पवार यांची 30 डिसेंबरला पुण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ही जाहीर सभा होईल. लवकरच पवारांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरु होणार असून ते पुण्यातून पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार आहेत.
  • 12:03 PM • 23 Dec 2023
    Marathi News Live Update : मी माफी मागणार नाही- सुषमा अंधारे भूमिकेवर ठाम
    'मी माफी अजिबात मागणार नाही. तुरूंगवास पत्करावा लागला तरी चालेल. मी या भूमिकेवर ठाम आहे कारण, जर हक्कभंग आणायचाच असता तुम्हाला तर मग संविधानीक पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. सभापती पद हे संविधानीक पद आहे. परंतु हे संविधानीक पद ज्या संविधानाने निर्माण केलेय त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची, राष्ट्राची आधारशिला ठेवणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी किंवा ज्योतिबा फुले या सगळ्यांचे अवमान जेव्हा होत होते, जेव्हा भिडे नावाचा माणूस अमहापुरूषांचा वमान करत होता त्यावेळेला दरेकर आणि मुनगंटीवार यांनी सभागृता भूमिका का मांडली नाही. म्हणजे महापुरूषांचा अपमान हा काहीच नाहीये. निलम गोऱ्हे महापुरूषांच्या पण वरच्या आहेत का?' असं म्हणत सुषमा अंधारेंनी आपली भूमिका मांडली.
  • 11:37 AM • 23 Dec 2023
    Marathi News Live Update : संजय राऊतांनी भाजपाला दिलेल्या चॅलेंजमध्ये नेमकं काय?
    बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन दाखवा. EVM वापरा मात्र, VVPT चा 100 टक्के वापर करा. संजय राऊत यांनी भाजपला चॅलेंज केलं आहे.
follow whatsapp