लाइव्ह

Maharashtra Breaking News Live : तीन राज्यातील विधानसभेचा निकाल आमच्या अपेक्षासारखा नाही- शरद पवार

मुंबई तक

27 Dec 2023 (अपडेटेड: 29 Dec 2023, 09:39 AM)

Marathi News Live Update : आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शेतकरी आक्रोश मोर्चाचा प्रारंभ होणार आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारविरोधात पुणे जिल्हा महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी जनआक्रोश मोर्चा निघेल.

 

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:38 PM • 27 Dec 2023
    Maharashtra Breaking News Live : अमरावतीमध्ये ऑटो रिक्षा-ट्रकच्या भीषण अपघातात 4 ठार 3 गंभीर
    अमरावती चांदुर बाजार मार्गावरील नांदुरा बु येथील पेढी नदीवरील पुलावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सिमेंट मिक्सर ट्रक व ऑटो रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षामधून प्रवास करणारे वाकोडे कुटुंबीयांतील 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • 09:18 PM • 27 Dec 2023
    Maharashtra Breaking News Live : सोलापूरात भाजपचाच उमेदवार विजयी होणार- चंद्रशेखर बावनकुळे
    महायुतीमध्ये राज्यातील तीनही नेते आणि केंद्रीय पार्लमेन्ट्री बोर्डाच नेतृत्व उमेदवारीबद्दल निर्णय घेणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. सोलापूर ही उमेदवारी ही आहे ती त्यांच्याकडे राहावी असं प्रत्येक पक्षाला मिळावी असं वाटत असते. त्याचबरोबर निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारही अत्यंत महत्वाचा असून 45 जागा जिंकण्याकरिता सोलापूरमध्ये अत्यंत चांगला उमेदवार दिसेल असं मतही बावनकुळे यांनी व्यक्त केले. सोलापूरात भाजपचाच उमेदवार विजयी होणार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्वास व्यक्त केला.
  • 06:19 PM • 27 Dec 2023
    Maharashtra Breaking News Live : तीन राज्यातील विधानसभेचा निकाल आमच्या अपेक्षासारखा नाही- शरद पवार
    ज्या तीन राज्यात विधानसभेसाठी निवडणुका झाल्या त्या निवडणुकांचा निकाल हा आमच्या अपेक्षासारखा लागला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणूक लढवणं ही आमची जबाबदारी असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता विधानसभा आणि लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच इंडिया आघाडीने आता प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन लढवण्याचा विचार करावा याबाबतही आमची चर्चा झाल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
  • 05:32 PM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : करमाळ्याजवळ कार-कंटेनरच्या अपघातात कर्नाटकातील 4 ठार
    करमाळा मार्गावर पांडेजवळ आज पहाटे साडेपाच वाजता कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले तर 6 जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातातील कार कंटेनरला धडकून देऊन ती रस्ताखाली पलटली. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
  • 04:38 PM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : मी परत खासदार झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे- चंद्रकांत खैरे
    राज्यसभा लोकसभा खासदार यांच्या पेक्षा माझा काम आवडलं. मी परत खासदार झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे.आत्ताच्या खासादरवर लोक नाराज आहेत. आम्ही वचपा काढणार असल्याचं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला.
  • 03:31 PM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : अमरावतीत नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच मंचावर
    भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अमरावतीत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या वतीने देण्यात येणाऱ्या कृषी क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल ५ लाख रूपये रोख आणि पुरस्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते शरद पवारांना दिला जाणार आहे.
  • 03:25 PM • 27 Dec 2023
    लोकसभा निवडणूकीसाठी इच्छूक- चंद्रकांत खैरे यांचं मोठं विधान
    'मागच्या वेळी जी चूक झाली आता पुन्हा होणार नाही. जनतेसाठी आणि पक्षासाठी निवडणूक लढवणार, मी लोकसभा निवडणूकीसाठी इच्छूक आहे. जागा वाटपावर एकमत होण्याची गरज आहे.' असं म्हणत चंद्रकांत खैरेंनी मोठं विधान केलं.
  • 02:32 PM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : विद्यापीठात वाद टाळण्यासाठी प्रशासनाची नियमावली!
    विद्यापीठातील वाद टाळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांसाठी आता नियमावली तयार करण्यात आली आहे. विद्यापिठाने विद्यार्थी संघटानासाठी ही नियमावली तयार केली. विद्यापीठात कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी विद्यार्थी संघटनांना आता परवानगी घेणे बंधनकारक ठरणार आहे.
  • 01:50 PM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पुणे दौरा
    मावळ तालुक्यातील इंदोरी कुंडमळा गावात माजी आमदार कै. दिगंबर भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण आणि स्मारक लोकार्पण कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येणार आहेत.
  • 01:50 PM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : जुन्या काळात निवडणुकीला पैसे लागत नव्हते- रावसाहेब दानवे
    'जुन्या काळात निवडणुकीला पैसे लागत नव्हते. 1986 साली निवडणूक लढवण्यासाठी घरच्यांचा विरोध असायचा, ते असल्या फालतू नादाला नका लागू असे म्हणायचे.' असे विधान रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
  • 12:22 PM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : आम्हाला कठीण निकष लावले तर सगळ्यांनाच...- मनोज जरांगे पाटील
    मागासवर्गिय आयोगाने मागासपणा सिद्ध करण्यासाठी निकष निश्चित केले आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक निकषांवर भारांक निश्चित करण्यात येत आहे. सामाजिक 40, शैक्षणिक 32, आर्थिकसाठी 28 टक्के भारांक निश्चित करण्यात आले आहे. 'फक्त मराठ्यांवर अन्याय नको, आम्हाला कठीण निकष लावले तर सगळ्यांनाच लावावे लागतील.' अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
  • 12:01 PM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : सरकारने गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही- मनोज जरांगे पाटील
    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे 20 जानेवारीला मुंबईला जाणार आहेत. 'यावेळी किड्या मुंग्यासारखे मराठे घराबाहेर पडतील. सरकारने गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही.' असं मनोज जरांगे म्हणाले.
  • 11:57 AM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : वेगळे मराठा आरक्षण घेणे म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात जाण्यासारखे- मनोज जरांगे पाटील
    'मुंबईतील आंदोलनाची सविस्तर माहिती उद्या देणार आहे. आंदोलनाबद्दल सर्व माहिती सांगितली जाईल तसंच आंदोलनाचा मार्गही सांगितला जाईल. तसंच मराठा आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. वेगळे मराठा आरक्षण घेणे म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात जाण्यासारखे आहे. ' असं जरांगे पाटील म्हणाले.
  • 10:28 AM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : देशातल्या कोणत्याही साहसी लढ्यात भाजप नव्हतं- संजय राऊत
    हा देश 2014 नंतर निर्माण झाल्याचं भाजप म्हणतं. पण देशातल्या कोणत्याही साहसी लढ्यात भाजप नव्हतं. भाजपचा जन्मच 2014 चा आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
  • 10:28 AM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा नाही तर आस्थेचा विषय- संजय राऊत
    'भाजप हे इतिहासातील कोणत्याही संघर्षात किंवा लढ्यात नव्हतं. त्यांना काय माहित की, शिवसेनेचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं काय योगदान होतं? दुसऱ्यांच्या इतिहासाबद्दल भाजपला पोटदुखी आहे. बाबरी मस्जिद पाडण्याचं कृत्य शिवसेनेचं, असं भाजप म्हणायचं. राम मंदिर हा आमच्यासाठी राजकारणाचा नाही आस्थेचा विषय आहे.' असं संजय राऊत म्हणाले.
  • 10:23 AM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंनी घेतला संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा
    उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. बैठकीत संभाजीनगरमधील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. उमेदवार दानवे हवेत की खैरे ? अशी विचारणा उद्धव यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली,
  • 09:44 AM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरूच!
    कांद्याचे दर ११०० ते १२०० रूपयांपर्यंत घसरले आहेत. खुल्या बाजारात कांद्याचे दर १५ रूपये किलोवर पोहोचले आहेत. गुजरातसह राजस्थानचा कांदा देखील बाजारात दाखल झाला आहे.
  • 09:29 AM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : अमरावतीत शरद पवार आणि नितीन गडकरी आज मंचावर येणार एकत्र!
    अमरावतीत पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त असलेल्या कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी आज एकाच मंचावर येणार आहेत. दोन्ही नेते मंचावर एकत्र दिसतील.
  • 08:49 AM • 27 Dec 2023
    Marathi News Live Update : अजित पवारांविरोधात भाजप आणि शिंदेगटाचा आक्षेप!
    अजित पवारांविरोधात भाजप आणि शिंदे गटाचे पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनीच आक्षेप घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे कोणतेही इतिवृत्त नसताना ८०० कोटीची काम मंजूर करण्यात आली आहेत. ती काम रद्द करा सदस्यंनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना निवेदन दिलं आहे. ८०० कोटीची काम रद्द करा अन्यथा न्यायालयात जाणार थेट असा इशारा देण्यात आला आहे.
follow whatsapp