लाइव्ह
Sharad Pawar : ‘शेतकरी आत्महत्या ही छोटी गोष्ट…’, शरद पवार सरकारवर भडकले
मुंबई तक
30 Dec 2023 (अपडेटेड: 31 Dec 2023, 02:46 AM)
Marathi News Live Update : “संजय राऊत एक क्षेत्रीय पक्षाचे मोठे राष्ट्रीय नेते आहेत. पण शिवसेनामध्ये जे काही नेते आज वाचलेले आहेत त्यामध्ये ते एक आहेत, ज्यांना सर्वात जास्त माहीत आहे की संजय निरुपम कोण आहे. पण आता जर ते विचारतात की कोण आहे? तर त्यांच्या स्मरणशक्तीत काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे”, असं प्रत्युत्तर संजय निरुपम यांनी राऊतांना दिलं आहे.
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 08:19 PM • 30 Dec 2023Sharad Pawar : शेतकरी आत्महत्या ही छोटी गोष्ट... शरद पवार सरकारवर भडकलेmumbaitak
- 05:59 PM • 30 Dec 2023Marathi News Live Update : अयोध्याच काय जगातील...राम मंदिर निमंत्रणावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळ आहे. पाणी प्रश्न आहे, पाणी कपात झाली आहे, म्हणून सरकारने घर फोडणे, पक्ष फोडणे बंद करून अडचणी दूर कराव्यात. ट्रिपल सरकार असंवेदनशील आहे. सरकार काय करतंय ते बघा. शेतकरी प्रश्न सोडवले जावे हे महत्वाचे आहे. अयोध्या राम मंदिरचे आमंत्रण तर येऊ दे. मी जगातल्या कुठल्याही मंदिरात जाईन असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
- 03:18 PM • 30 Dec 2023Marathi News Live Update : केंद्र सरकार अयोध्याच्या विकासासाठी कटिबद्ध- नरेंद्र मोदी'केंद्र सरकार अयोध्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. राम मंदिरामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसंच 15 हजार कोटीच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांना मंजूरी दिल्याने अयोध्येचा विकास होईल.' असंही ते म्हणाले.
- 01:47 PM • 30 Dec 2023Marathi News Live Update : अयोध्या विमानतळाचे काही वेळातच होणार लोकार्पणपंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाल्यानंतर येथील वातावरण अगदी जल्लोषमय झाले आहे. पुष्पवृष्टीसह त्यांचं दणक्यात स्वागत करण्यात आलं. त्यांच्या हस्ते थोड्याच वेळात आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही उद्धाटन करण्यात येईल. विमानचं टर्मिनल 500 चौरस मिटर परिसरात पसरलेलं आहे. दरवर्षी 10 दहा लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी हे विमानतळ सुसज्ज आहे.
- 01:25 PM • 30 Dec 2023Marathi News Live Update : ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू- संजय राऊतसंजोग वाघेरे यांचा ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळा जे भावूक आहेत ते निष्ठेने पक्षासोबत आहेत असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तर, 'ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. आमच्या पक्षावर लोकांचा विश्वास असल्यानं मोठ्या प्रमाणात लोकं पक्ष प्रवेश करत आहेत.' असं संजय राऊत म्हणाले.
- 12:18 PM • 30 Dec 2023Marathi News Live Update : PM मोदींच्या हस्ते अयोध्या रेल्वे स्थानकाचं उद्धाटन!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवत अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन केलं. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. योगी सरकारमधील अनेक केंद्रीय मंत्री आणि मंत्रीही उपस्थित होते.
- 12:05 PM • 30 Dec 2023Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचले, 16 किलोमीटर रोड शो सुरूपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 16 किलोमीटर रोड शो सुरू आहे. या रोड शोसाठी जोरदार तयारी करण्यात आली. ब्लॅक कमांडो, पी एस सी आणि स्थानिक पोलीस दल तैनात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम, पुनर्विकसित अयोध्या धाम रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करणार आहेत. त्याचप्रमाणे नवीन अमृत भारत ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.
- 11:20 AM • 30 Dec 2023Marathi News Live Update : अयोध्येत अमृत भारतसह वंदे भारतची भेटपंतप्रधान मोदी शनिवारी अयोध्या नगरीतून देशभरातील नागरिकांसाठी दळणवळणाच्या जलद सुविधेचे उद्धघाटन करतील. 2 अमृत भारत आणि 6 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. अयोध्या-दरभंगा या दरम्यान एक अमृत भारत तर अयोध्या ते आनंद विवाह टर्मिनल या दरम्यान वंदे भारत ट्रेनची सुरुवात होणार आहे.
- 11:20 AM • 30 Dec 2023Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी रामनगरीत दाखलपंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्या एअरपोर्टवर दाखल झाले आहेत. ते थोड्याच वेळात अयोध्या धाम जंक्शनवर पोहचतील. या रेल्वे स्टेशनचे ते उद्धघाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी रामनगरी फुलांनी सजली आहे.
- 10:17 AM • 30 Dec 2023Marathi News Live Update : मविआत जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत- संजय राऊत"मविआत जागावाटपावरून काहीच धुसफूस नाही. ४८ जागांचं वाटप मेरिटनुसारच होईल. आमच्यात यावरून कोणतेच मतभेद नाहीत. जयंत पाटील आणि आव्हाडांनी मातोश्रीवर येऊन चर्चा केली. २३ जागांच्या दाव्यावर कुणीही आक्षेप घेण्याचा प्रश्न नाही. NCP कोणत्या जागांवर लढण्यास इच्छुक आहे हे चर्चेत स्पष्ट झालं. वंचित मविआसोबत हवी अशी शरद पवारांची स्पष्ट भूमिका आहे. जिंकेल त्याची जागा हे फक्त मविआचं नाही तर इंडियाचं सूत्र आहे. मविआचं जागावाटपाचं आदर्श फॉर्म्युला आम्ही समोर आणू. ४० जागा जिंकेल इतकी मविआत ताकद आहे. रामालाच आम्ही उमेदवारी देतो इतकीच घोषणा भाजपकडून होणं बाकी आहे. " असं म्हणत संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलं.
- 09:52 AM • 30 Dec 2023Marathi News Live Update : वंदे भारत रेल्वेच्या उद्धाटन पत्रिकेत अखेर जलील यांचंही नाव!खासदार इम्तियाज जलील यांच्या नाराजीनंतर रेल्वे प्रशासनाकडून पत्रिकेत बदल करण्यात आला आहे. पत्रिकेत जलील यांच्यासह सर्व मंत्री आणि आमदारांच्या नावाचा समावेश करण्यात आला. माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने जलील यांची माफीही मागितल्याचे समजते.
- 09:31 AM • 30 Dec 2023Marathi News Live Update : PM मोदींच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली!पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी आयोध्या नगरी सजली आहे. अयोध्येतील रस्त्याच्या दुतर्फा फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळतेय. अनेक ठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी कमानी तयार करण्यात आल्या आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल होणार आहेत.
- 08:42 AM • 30 Dec 2023Marathi News Live Update : मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून धावणार!मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस आजपासून प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होईल. बुधवार वगळता आठवड्यातू ६ वेळा ही एक्स्प्रेस धावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार. मध्य रेल्वेवर ही सहावी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार. CSMT स्थानकातून दुपारी १ वाजून १० मिनिटांनी ही एक्स्प्रेस सुटेल. तर, रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी एक्सप्रेस जालना स्थानकावर पोहोचणार.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT