Maharshtra Breaking News Live : संसदेत गोंधळ घालणारे तरुण महुआ मोईत्रा यांच्या संपर्कातील, नवनीत राणांचा आरोप
रोहिणी ठोंबरे
13 Dec 2023 (अपडेटेड: 13 Dec 2023, 04:33 PM)
Maharashtra Assembly Winter Session : राज्यात मराठा आरक्षण मुद्दा ज्वलंत बनला आहे. मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलेला असून, हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण मुद्द्याचे पडसाद उमटले. विधानसभा नियम २९३ अन्वये विधानसभेत विविध सामाजिक आरक्षणांबाबत चर्चेचा प्रस्ताव मंगळवारी (12 डिसेंबर) मांडण्यात आला. यावर आजही (13 डिसेंबर) चर्चा होणार आहे. या चर्चेच्या अंती सरकार काय भूमिका मांडणार, हेही महत्त्वाचं असून, त्यातून आरक्षण कधीपर्यंत मिळणार, याबद्दल चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाबरोबरच राज्यात इतरही मुद्दे चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू असून, वचर्स्व असलेल्या मतदारसंघात उमेदवारी निवडीसाठी चाचपण्याही सुरू आहेत. दुसरीकडे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या कुरघोड्या चव्हाट्यावर येत आहेत, तर महाविकास आघाडीतील विसंवादाचीही चर्चा होत आहे. या सगळ्या बातम्या आणि इतर अपडेट्स वाचा एकाच ठिकाणी….
ADVERTISEMENT
Maharshtra Breaking News Live : 'सारथीला जे दिले ते महाज्योतीला द्या'; छगन भुजबळ स्पष्टच म्हणाले!
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 10:03 PM • 13 Dec 2023Marathi News Live Update : मराठा आरक्षणासाठी बार्शी ते दिल्ली सायकलवर संघर्ष यात्रा, पंतप्रधान-राष्ट्रपतींकडे आरक्षणाची करणार मागणीमराठा आरक्षण मागणीसाठी बार्शीतील तरुणाने बार्शी ते दिल्ली सायकल यात्रा सुरु केली आहे. दिल्ली येथे पोहचून तो पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे मराठा आरक्षणाची मागणी करणार आहे. महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढू लागला आहे. मनोज जरांगे पाटलांनी दिलेली मुदत संपत आलेली आहे. राज्यभरातील मराठा बांधव आक्रमक होत चालले आहेत. त्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून बंडू लोकरेने बार्शी ते दिल्ली सायकलवरुन संघर्ष यात्रेस सुरुवात केली आहे.
- 08:58 PM • 13 Dec 2023Marathi News Live Update : संसदेत गोंधळ घालणारे तरुण महुआ मोईत्रा यांच्या संपर्कातील, नवनीत राणांचा आरोपअमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेत आज घडलेल्या घटनेचा संबंध निलंबित करण्यात आलेल्या पश्चिम बंगालचे खासदार महुआ मोईत्रा यांच्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. संसदेबाबत असा वागणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कडक शिक्षा द्यावी अशीही मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.
- 08:09 PM • 13 Dec 2023Marathi News Live Update :आमदार मंजुळा गावितांच्या पतीविरोधात गुन्हा, पोलीस निरीक्षकाला दिली बदलीची धमकीशिवसेनेचेचे साक्री मतदार संघाचे आमदार मंजुळा गावित यांचे पती डॉ. तुळशीराम गावित यांच्यावर साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाकाबंदी असतानाही वाहन तपासणीदरम्यान पोलीस निरीक्षकाला फोनवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगून बदली करण्याची त्यांनी त्यांना धमकी दिली होती. त्या प्रकरणी त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी साक्री बंदचे आयोजन केले असून पोलिसांविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
- 07:34 PM • 13 Dec 2023Marathi News Live Update : संसदेतील गोंधळाप्रकरणी अमोल शिंदेच्या घरी एटीएस, सीआयडी दाखलसंसदेतील गोंधळाप्रकरणी ताब्यात घेतलेला तरुण हा लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील झरी इसगावमधील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचे नाव अमोल धनराज शिंदे असून त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यानंतर तो लष्कर आणि पोलीस भरतीची तयारी करत होता. अमोल शिंदेचे आई-वडील मोलमजुरी करून घर चालवतात. त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण 6 सदस्य असून त्यामध्ये दोन भाऊ आणि एक बहीण आहे.
- 07:11 PM • 13 Dec 2023Marathi News Live Update : निवडणूक आयोगाला आणि भाजपला मुंबई उच्च न्यायालयाची चपराकलोकसभेची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्याने आयोग आणि निवडणूक टाळणाऱ्या भाजपला सणसणीत चपराक बसल्याची प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे 29 मार्च 2023 रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. लगेचच पोटनिवडणूक घेणे अपेक्षित होते. परंतु, कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपचा दारुण पराभव केला, त्याची धास्ती घेऊन सत्ताधारी भाजपने अनेक क्लृप्त्या लढवत लोकसभेची पोटनिवडणूक टाळली. अखेर न्यायालयानेच चपराक दिल्याची प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी दिली आहे.
- 05:20 PM • 13 Dec 2023Marathi News Live Update : दीपक केसरकर यांच्या संतापजनक वक्तव्यानंतर ठाण्यात त्यांचा पुतळा जाळून निषेधशिवसेना (शिंदे गट) नेते मंत्री दीपक केसरकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला. 'बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठलेही तत्त्व पाळले नाही. बाळासाहेब मनमानी करत होते. बाळासाहेब यांनी निवडणूक आयोगाप्रमाणे निवडणुका घेतल्या नाही.' हे वक्तव्य दीपक केसरकर यांनी उलट तपासणीमध्ये केले होते. आता या सर्व प्रकारानंतर ठाकरे गट चांगलाच पेटला असून केसरकरांचा पुतळा जाळून निषेध केला जात आहे.
- 05:05 PM • 13 Dec 2023Marathi News Live Update : सारथीला जे दिले ते महाज्योतीला द्या- छगन भुजबळ'राज्यात अशांततेच वातावरण कोणी तयार केले. आम्हाला सर्वांना शिव्या देण्यात आल्या. आरक्षणावरुन मला टार्गेट करण्यात आले. मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही. ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्या. सारथीला जे दिले ते महाज्योतीला द्या.' अधिवेशनात भुजबळ स्पष्टच बोलले.
- 04:45 PM • 13 Dec 2023Marathi News Live Update : राज्यात शिक्षकांच्या 67 हजार जागा रिक्त, 1 लाख 10 हजार विद्यार्थी नोकरीपासून वंचितराज्यात शिक्षकांच्या 67 हजार जागा रिक्त असतानासुद्धा राज्य सरकार शिक्षक पदभरतीची जाहिरात काढत नाही. त्यामुळे राज्यातील जवळपास 1 लाख 10 हजार डीएड- बीएड झालेले विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहिले आहेत. शिक्षक पदाची भरती केली जात नसल्यामुळे बेकारीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
- 04:22 PM • 13 Dec 2023Marathi News Live Update : वंचितासाठी योजना राबवताना भेदभाव नको, मंत्री भुजबळांची मागणीमंत्री छगन भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना सरकारी नोकरीत ओबीसी आरक्षण 27 टक्के देण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांनी ज्या प्रकारे सारथी योजनेसाठी मदत दिली जाते त्याच प्रकारची मदत महाज्योतीला देण्याचीही मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, सरकारकडून वंचितांसाठी ज्या प्रकारे योजना राबवल्या जातात त्यामध्ये भेदभाव नको अशीही मागणी त्यांनी केली आहे.
- 03:22 PM • 13 Dec 2023Maharashtra News : सोलापुरात मराठा बांधवांचा ट्रॅक्टर मोर्चा!सोलापुरातील बार्शी तालुक्यात वैराग पांचक्रोशीतील 500 पेक्षा अधिक ट्रॅक्टर घेऊन मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी वैरागमधील साखळी उपोषणाला पाठींबा आणि वैराग ते मुंबई ट्रॅक्टर मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षण मिळत नाही तोवर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
- 03:17 PM • 13 Dec 2023ज्येष्ठ नागरिकांचा रेल्वेत आरक्षण कोटा पुन्हा सुरू करावा- खासदार सुप्रिया सुळे'रेल्वेतील ज्येष्ठ नागरिकांचा आरक्षण कोटा पुन्हा सुरू करावा. ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत पुन्हा सुरू करावी. महिलांना मिळणारी सवलत पुन्हा सुरू करावी. कोरोना काळानंतर रेल्वेच्या अनेक सवलती बंद झाल्या आहेत.' याबाबत खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत आवाहन केले आहे.
- 01:36 PM • 13 Dec 2023Loksabha Security: लोकसभेत धक्कादायक प्रकार, कामकाजादरम्यान 2 अज्ञातांची घुसखोरी!लोकसभेच्या (Parliament) सुरक्षेत मोठी चूक झाली असून संसदेत दोन अज्ञात व्यक्ती शिरल्याने खळबळ उडाली आहे. 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाल्याच्या घटनेला आज बावीस वर्ष पूर्ण झाली आहेत अशात ही घटना घडलीये. प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी उड्या घेतल्याने कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. यावेळी संपूर्ण गदारोळ माजला आहे.
- 12:56 PM • 13 Dec 2023Maharashtra News : धनुष्यबाण आमचा म्हणणारे कमळाबाईचे गुलाम -संजय राऊतआमचे सगळे उमेदवार हे धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणुक लढतील असं शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट म्हणाले. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊतांनी गुलाम म्हणत उत्तर दिले. ते म्हणाले, "धनुष्यबाण आमचा म्हणणारे कमळाबाईचे गुलाम होत आहेत."
- 11:39 AM • 13 Dec 2023Marathi News Live Update : शिंदे गटातील सर्व आमदार-खासदार राम मंदिराच्या उद्घाटनाला राहणार हजर?नवीन वर्षात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिरचे उद्घाटन होणार आहे. या क्षणाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहे. अशावेळी मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि खासदारही उपस्थित राहणार आहेत. तसंच, मतदारसंघातून कार्यकर्त्यांना घेऊन जाण्याचंही नियोजन सुरू आहे.
- 10:58 AM • 13 Dec 2023Marathi News Live Update : मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण कसं देणार?- अशोक चव्हाणमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, 'मराठा आरक्षणाबाबत 24 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा शब्द राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. पण ते आरक्षण नेमकं कसं देणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. जरांगे यांची मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्याची मागणी आहे. तर, राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची भूमिका घेतली आहे, याकडे चव्हाण यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. केंद्र सरकारने आर्थिक मागास घटकांना 50 टक्क्यांच्या पलिकडचे 10 टक्के आरक्षण दिले. घटनादुरुस्ती करून त्याला संरक्षणही दिले. तीच भूमिका मराठा आरक्षणाबाबत का घेतली जात नाही?' असा प्रश्न चव्हाण यांनी सरकारला केला.
- 10:00 AM • 13 Dec 2023Marathi News Live Update : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधनमराठी चित्रपटसृष्टी अग्रणी असलेले ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे मंगळवारी (12 डिसेंबर) मध्यरात्री निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेली काही वर्षे त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.
- 09:53 AM • 13 Dec 2023Marathi News Live Update : मलिकांबाबत फडणवीसांचा गैरसमज झाला; अजित पवारांनी त्या पत्रावर मांडली भूमिकाराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे जामिनावर बाहेर आल्यानंतर प्रथमच विधिमंडळ अधिवेशनाला हजर राहिले. मलिक हे सत्ताधारी बाकावर बसल्याने चांगलाच गोंधळ झाला. भाजपने देशद्रोहाचे आरोप केलेले मलिक कसे चालतात? असा सवाल केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिले होते. मलिकांना सोबत घेण्यास अजित पवारांना विरोध केला होता. त्या पत्रावर अजित पवार म्हणाले, "मलिकांबाबत फडणवीसांचा गैरसमज झाला आणि त्यांनी पत्र पाठवलं. मलिक यांना जेलमध्ये जावं लागल्याने सत्तेत त्यांना न घेण्याची भाजपची भूमिका आहे", असे अजित पवार पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये बोलले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT