लाइव्ह

Maharshtra Breaking News Live : उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण

मुंबई तक

20 Jan 2024 (अपडेटेड: 20 Jan 2024, 05:10 PM)

Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील हे आज (20 जानेवारी) सकाळी 9 वाजता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत करोडोच्या संख्येने मराठा समाज असेल, असा दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. अंतरवालीमध्ये मराठा समाज जमा व्हायला सुरुवात झाली आहे. जालन्याच्या अंतरवली सराटीतून त्यांचा लाँगमार्च मुंबईच्या दिशेने निघणार आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी पूर्ण तयारी केली आहे.

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 06:22 PM • 20 Jan 2024
    Marathi News Live Update : अयोध्येतील राम मंदिरासाठी दान केल्यास वाचणार कर?
    अयोध्येत प्रभू श्रीरामाचं भव्यदिव्य मंदिराचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या मंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला ऑनलाईन दान केल्यास कराची बचत होऊ शकते.
  • 06:18 PM • 20 Jan 2024
    उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण
    उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. राम मंदिर प्रतिनिधीच्या न्यासाने स्पीड पोस्टने उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण पाठवल्याचे माहिती हाती आली आहे. दरम्यान याआधी राम मंदिर प्रतिनिधीच्या न्यासांना उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली होती. भेट नाकारल्यामुळे आता उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टने राम मंदिर सोहळ्याच निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्याना आता उद्धव ठाकरे या राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
  • 03:14 PM • 20 Jan 2024
    फेब्रुवारी अधिवेशनात मराठा आरक्षणाची घोषणा होणार – संजय शिरसाट
    'मराठा आंदोलनकर्त्यांनी इतर लोक त्यांच्या आंदोलनाचा फायदा घेणार नाहीत, याची काळजी घ्यावी. मराठ्यांना फेब्रुवारी महिन्यातील अधिवेशनात आरक्षण मिळणार हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याबाबत चिंता करु नये', असे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
  • 12:36 PM • 20 Jan 2024
    सुधाकर बडगुजर यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
    ठाकरे गटाचे नाशिकचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका गुन्ह्यात बडगुजर यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. आपल्या पदाचा गैरवापर करत नाशिक मनपाची आर्थिक फसवणूक केल्याचा बडगुजर यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरवातीला या प्रकरणात सुधाकर बडगुजर यांना अंतरिम जामीन मिळाला होता. 22 आणि 23 तारखेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बडगुजर प्रकरणी न्यायालयात होणारी सुनावणी महत्त्वाची आहे.
  • 12:36 PM • 20 Jan 2024
    प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याचा विचार पक्का - शरद पवार
    'वंचित बहुजन आघाडीचे नेते नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. त्यांना इंडिया आघाडीत घेण्याचा विचार पक्का आहे. 48 जागांपैकी 35 जागांवर एकमत आहे. बाकीच्याबाबत चर्चा सुरू असल्याचं'; शरद पवार म्हणाले.
  • 12:36 PM • 20 Jan 2024
    कायदा सुव्यवस्था बाधित राहण्यासाठी आंतरवाली सराटीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त
    मनोज जरांगे पाटलांचा मुंबई दौरा शांततेत पार पडावा, यादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून ठिकठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ही करडी नजर या पायी पद यात्रेवर राहणार आहे.
  • 10:25 AM • 20 Jan 2024
    Marathi News Live Update : मोदींनी नरसय्या आडम यांचं कौतुक करायला हवं होतं- शरद पवार
    राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यामध्ये ते म्हणाले, 'मोदी आडम यांच्याविषयी बोलले नाही ही चांगली गोष्ट नाही. मोदींनी नरसय्या आडम यांना प्रोत्साहित करायला हवं होतं. तसंच ते बेरोजगारी, महागाईविषयी बोलले असते तर बरं झालं असतं. मूळ प्रश्नाकडून दूर नेण्याचं काम मोदींनी केलं. सोलापूर औद्योगिक नगरी, याठिकाणी नवीन काहीतरी उभं करण्याची गरज आहे. अनेकांना ईडीची नोटीस येऊन गेली, देशमुख, राऊतांना आत टाकलं. सत्तेचा पुरेपुर गैरवापर केला जातोय. भाजपच्या विचारांशी सहमत नसणाऱ्यांना भीती दाखवली जात आहे. ईडीचा विरोधकांविरोधात हत्यार म्हणून वापर केला जात आहे. ईडीद्वारे दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम सुरू.'
  • 09:38 AM • 20 Jan 2024
    मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी मराठा बांधवांची प्रतिक्रिया काय?
    मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटी ते मुंबई ही पदयात्रा आजपासून सुरु होत आहे. बीडमधून हजारो मराठा बांधव आंतरवलीकडे रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हजारो मराठे पदयात्रेसाठी निघाले आहेत. 'आरक्षण घेऊनच आम्ही परतू', असा विश्वास मराठा बांधवांनी यावेळी व्यक्त केला आहे.
  • 09:35 AM • 20 Jan 2024
    Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील उपोषणाला कुठून करणार सुरूवात?
    आरक्षण आंदोलनाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. 'अंतरवली सराटी या ठिकाणापासून मी आमरण उपोषण करणार आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शब्दाचा सन्मान केला होता.' असं ते म्हणाले.
  • 09:35 AM • 20 Jan 2024
    Marathi News Live Update : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून प्रशिक्षण
    मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी आजपासून अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सर्वेक्षणासाठी गोखले इन्स्टिट्यूटला सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम देण्यात आले होते. आज गोखले इन्स्टिट्यूटचे मास्टर ट्रेनर्स अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देतील. पुढे पर्यवेक्षक म्हणून अधिकारी काम पाहतील. उद्या आणि परवा प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना म्हणजेच प्रगणक यांना अधिकारी प्रशिक्षण देतील.
follow whatsapp