लाइव्ह

Maharshtra Breaking News Live :केंद्राच्या पद्म पुरस्कारांची घोषणा, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडेंना पद्म पुरस्कार जाहीर

मुंबई तक

25 Jan 2024 (अपडेटेड: 26 Jan 2024, 03:42 AM)

Marathi News Live Update : मराठा आरक्षण आंदोलनाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबईच्या दिशेने प्रवासाचा आज सहावा दिवस आहे. काल त्यांच्या वाहनांचा ताफा पुण्यापर्यंत पोहोचला होता. तिथे मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. उद्या म्हणजे 26 जानेवारीला मनोज जरांगे पाटील आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल होतील.

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:08 PM • 25 Jan 2024
    केंद्राच्या पद्म पुरस्कारांची घोषणा, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडेंना पद्म पुरस्कार जाहीर
    केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी 34 जणांना सरकारकडून पद्मश्री देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पार्वती बरुआ, जागेश्वर यादव, चार्मी मुर्मू, सोमन्ना, सर्वेश्वर, संगथम यांच्यासह अनेकांच्या नावाचा समावेश आहे.
  • 09:23 PM • 25 Jan 2024
    अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करावं-दिलीप वळसे-पाटील
    अजित पवार यांनी राज्याचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करावे त्यानंतर त्यांच्या कामातील बदल सगळ्या महाराष्ट्राला जाणवेल असं मत आमदार दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. जुन्नरमधील झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अजित पवारांच्या कामाची त्यांनी यादीच वाचून दाखवली. यावेळी त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या भाववाढीविषयी अजित पवारांनी काय भूमिका मांडली हेही त्यांनी यावेळी सांगितले.
  • 08:49 PM • 25 Jan 2024
    लोकसभेच्या जागां वाटपाबाबत मविआमध्ये सकारात्मक चर्चा- संजय राऊत
    लोकसभा जागा वाटपांबाबत कोणालाही चिंता करण्याची गरज नाही. कारण जागा वाटपाबाबत सुरक्षित चर्चा झाली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीसोबतही आमचा सुसंवाद सुरू असून महाविकास आघाडीच्या 30 तारखेच्या बैठकीला तेही उपस्थित राहणार असून त्यांना अधिकृत आमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी सांगितली.
  • 05:57 PM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : गजानन मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे यांचा राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश
    गजानन मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, त्या स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, पार्थ पवार आणि त्यांची ही भेट झाली आहे. 'गजानन मारणे यांची निर्दोष सुटका झाली आहे त्यामुळे एखाद्या गुंडाला भेटले असं म्हणणं चुकीचे आहे. विरोधक जाणून बुजून अशा चुकीच्या बातम्या पसरवत आहेत,' असा आरोप अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी केला.
  • 04:14 PM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : मनोज जरांगेंच्या नोटिशीविरोधात आयोजक विरेंद्र पवारांची न्यायालयात धाव
    मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदान आणि शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. याची रितसर नोटीस पोलिसांनी जरांगेंना दिली. पण आता या नोटिशीविरोधात जरांगेंच्या आझाद मैदानातील आयोजक विरेंदर पवार यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
  • 03:06 PM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ, मनोज जरांगे आपल्या मतावर ठाम!
    मनोर जरांगे पाटील यांची शिष्टमंडळासोबतची झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. जरांगे पाटील हे मुंबईत येण्यावर ठाम आहेत. तसंच, आझाद मैदानाची क्षमता ५००० आंदोलकांची आहे त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांची परवानगी नाकारत नोटीसही बजावली आहे.
  • 02:20 PM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा- हसन मुश्रीफ
    मनोज जरांगे यांची आरक्षण यात्रा सध्या लोणावळा या ठिकाणी पोहोचली आहे. यावेळी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपल्यासोबत आलेल्या समाजाला शिस्त न मोडण्याचे आवाहन केले. यावेळी 'मराठा समाजासाठी सरकारने अनेक पाउलं उचलली आहेत. कुणबी नोंदी दिवसरात्र काम करून शोधून काढल्या आहेत. 8 दिवसांत सर्व्हेक्षण करून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा', असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.
  • 02:16 PM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : मुंबई पोलिसांची मनोज जरांगेंना बजावली कोणती नोटीस?
    मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना नोटीस बजावली आहे. आझाद मैदानाची क्षमता ५००० आंदोलकांची आहे. त्यापेक्षा अधिक आंदोलक मुंबईत येऊ शकत नाहीत, असं या नोटीशीत सांगण्यात आलं आहे.
  • 02:05 PM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : इंडिया आघाडी ही आघाडी नाहीच- देवेंद्र फडणवीस
    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "इंडिया आघाडी ही आघाडी नाहीच. इथे प्रत्येक जण वेगळा लढतोय. "
  • 01:05 PM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : नागपूरातील अंगणवाडी सेविकांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन
    नागपूरातील अंगणवाडी सेविकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाद्वारे अंगणवाडी सेविकांनी राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी गेल्या 52 दिवसांपासून अंगणवाडी सेविकांचं नागपूरात आंदोलन सुरु आहे. 26 हजार रूपये वेतन लागू करा. तसंच ग्रॅच्युअटी , पेन्शन लागू करा या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.
  • 12:16 PM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची आज सुनावणी
    राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज विधान भवनात सुनावनी होणार आहे. काल शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अमोल कोल्हे यांची साक्ष नोंदवण्यात आली. आज अजित पवार गटाचे सुनील तटकरे व मंत्री अनिल पाटील यांची उलटसाक्ष नोंदवली जाणार आहे.
  • 12:14 PM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : लोणावळ्यात सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंशी करणार चर्चा!
    मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी लोणावळ्यात सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे. एका बंद खोलीमध्ये ही चर्चा होणार आहे. सरकारच्या या शिष्टमंडळामध्ये जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील दरे गावात असून जरांगे पाटील यांच्या संपूर्ण आंदोलनाबाबत माहिती घेत आहेत. गरज पडल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जरांगे पाटील यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधू शकतात.
  • 12:12 PM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार- मनोज जरांगे
    मनोज जरांगेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत जरांगे म्हणाले, सरकारच शिष्टमंडळ आलं आहे. पण आधी मराठा आंदोलकांशी चर्चा करणार मग सरकारच्या शिष्टमंडळाशी बोलणार असल्याचे जरांगे पाटलांनी सांगितले आहे. आमच्या समजाचा त्यात हित असलं आणि आमच्या मागण्या मान्य केल्या असल्या तर ठीक नाहीतर चलो मुंबई, असे देखील जरांगे यांनी सांगितले आहे. आम्हाला आरक्षण हवंय कुठेही दिले तरी चालेल, पुण्यात जरी मिळालं तरी घेणार, वाशीत जरी मिळालं तर घेणार आणि मुंबईत जरी मिळालं तरी घेणार असल्याचे जरांगेंनी सांगितले आहे.
  • 11:25 AM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : संदीप राऊत यांना ईडीची नोटीस
    शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीची नोटीस आली आहे. खिचडी घोटाळा प्रकरणी तपासासाठी संदीप राऊत यांना 30 जानेवारी रोजी ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. खिचडी घोटाळ्यात ५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 30 जानेवारीला सकाळी दहा वाजता संदीप राऊत ईडी कार्यालयात हजर राहतील.
  • 10:26 AM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्याचा मुंबईकडे जाण्याचा मार्ग पोलिसांनी बदलला
    मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जात असताना नवीन मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. एक्स्प्रेस महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे. मराठा आंदोलक एक्स्प्रेस हायवेवर चढू नये म्हणून हा बंदोबस्त लावला आहे. मनोज जरांगे यांचा आज वाशीमध्ये मुक्काम असणार आहे.
  • 10:16 AM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : जे घाबरट होते, ते तुमच्या कळपात- संजय राऊत
    संदीप राऊत यांना दिलेली नोटीस हास्यास्पद असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. अजित पवार हे तर सरकारच्या मांडीवर आहे. जे घाबरट होते, तुमच्या कळपात शिरले अशी टीका राऊत यांनी ईडीच्या कारवाईवरुन केली.
  • 09:24 AM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशनात तोडगा काढू - मुख्यमंत्री शिंदे
    मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. मराठा आंदोलनाचं भगवं वादळ मुंबईच्या दिशेने सरकू लागल्याने राज्य सरकार सावध झाले आहे. ‘मराठा आरक्षणावर विशेष अधिवेशनामध्ये तोडगा काढू, आरक्षणातील त्रुटी दूर करण्याचे काम राज्य मागासवर्ग आयोग करेल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
  • 09:18 AM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमोल कोल्हेच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात!
    उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमोल कोल्हेच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात पोहोचले आहेत. शरद पवार यांच्यानंतर शिरूर लोकसभेतील जुन्नर मतदारसंघात अजित पवार दाखल झाले आहेत. येथे ते जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
  • 09:18 AM • 25 Jan 2024
    Marathi News Live Update : पुण्यातील काँग्रेसच्या बैठकीत पुन्हा एकदा धुसफूस
    लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे काम शिस्तीत करा. पक्षाच्या विरोधात जे काम करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. या शब्दात काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांची शाळा घेतली.
follow whatsapp