लाइव्ह

Marathi News Live : ‘विश्वगुरु नरेंद्र मोदींनी जरी चूक केली तरी चौकशी…’, सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान

मुंबई तक

09 Jan 2024 (अपडेटेड: 10 Jan 2024, 02:17 AM)

Marathi News Live : आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल बुधवारी येणार आहे. तत्पुर्वी राजकिय घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली दौऱ्यावर जाणार आहेत.यासह राज्यभरातील सर्व महत्वाच्या बातम्यांसाठी मुंबई तक लाईव्ह अपडेट्स नक्की वाचा.

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 06:09 PM • 09 Jan 2024
    विश्वगुरु नरेंद्र मोदींनी जरी चूक केली तरी चौकशी... सुधीर मुनगंटीवारांचं मोठं विधान
    mumbaitak
  • 02:18 PM • 09 Jan 2024
    जुलमी राजवटीचा अंत..., ठाकरेंची महायुती सरकारवर टीका
    mumbaitak
  • 02:18 PM • 09 Jan 2024
    उद्धव ठाकरे गट शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाआधी सुप्रीम कोर्टात, काय परिणाम होणार?
  • 12:55 PM • 09 Jan 2024
    विधानसभा अध्यक्षांच्या निकालात आम्हालाच न्याय मिळेल : देवेंद्र फडणवीस
    आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय अध्यक्ष घेतील. आमचे शिवसेनेच अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी निकालाआधीच व्यक्त केला.
  • 12:47 PM • 09 Jan 2024
    बिल्किस बानो प्रकरणात पवारांची महायुती सरकारला मोठी विनंती, म्हणाले...
    mumbaitak
  • 11:54 AM • 09 Jan 2024
    बीडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का
    बीड मधील ठाकरे गटाचे मात्तब्बर नेते माजी जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप आज हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल होईन शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यासाठी ते मोठं शक्तिप्रदर्शन देखील करणार आहेत. बीड मधून ते पाचशे गाड्यांच्या ताफ्यांच्या रॅलीसह मुंबईत दाखल होणार आहे. चाळीस वर्षापासून निष्ठांवत शिवसैनिक असलेल्या अनिल जगताप यांनी सुषमा अंधारे यांच्या अन्यायाला कंटाळून हा निर्णय़ घेतल्याचे बोलले जात आहे.
  • 11:47 AM • 09 Jan 2024
    रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीचे छापे; मुख्यमंत्री म्हणाले, ईडी महाराष्ट्र सरकारच्या...
    mumbaitak
  • 10:38 AM • 09 Jan 2024
    जरांगे पाटलांनी दादाच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढला
    मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. तसा अर्थ काढू नका, कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे सांगितले आहे. त्या दृष्टीने सर्व कामही सुरू आहे. त्यासाठी बैठक देखील झाली, या बैठकीला मनोज जरांगे पाटील हे देखील ऑनलाईन उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला असा वेगळा अर्थ काढू नका. सगळ्यांनी संयमाने घ्यावं असे बनसोडे म्हणाले आहेत.
  • 10:32 AM • 09 Jan 2024
    आमदार अपात्रता निकालाआधी ठाकरेंच्या आमदाराच्या घरी ईडी
    सगळ्याचं लक्ष शिवसेना आमदार प्रकरणाच्या निकालाकडे असतानाच एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांच्या गटात असलेल्या आमदाराच्या घरी ईडीने छापेमारी केली. माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या मुंबईतील घरी ईडीकडून झाडाझडती घेण्यात आली. मुंबई महापालिकेच्या जागेवर पंचतारांकित हॉटेल निर्माण केल्याच्या प्रकरणात ईडीने वायकरांवर गुन्हा दाखल केलेला आहे. याच प्रकरणात ही छापेमारी करण्यात आली आहे. जोगेश्वरीतील निवासस्थान, मातोश्री क्लबसह मुंबईतील ७ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
  • 10:21 AM • 09 Jan 2024
    सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे.दोडामार्ग तालुक्यात तर जोरदार अतिवृष्टी झाली आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यात अवकाळी पावसाला सूरूवात झाली आहे. आंबा आणि काजू पिकावर त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे. यावर्षी आंबा आणी काजू पिकाचा मोहोर चांगला असून या पावसामुळे आंबा मोहोर झाडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • 09:46 AM • 09 Jan 2024
    मध्य रेल्वेवर दोन लोकलची टक्कर टळली
    मध्य रेल्वेमार्गावर मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोन लोकलची टक्कर टळली आहे. मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे पुढे लोकल ट्रेन उभी असतानाही मागून आलेल्या गाडीला ताशी सुमारे 50-60 किलोमीटरच्या वेगाने पुढे जाण्यासाठी दोन पिवळे सिग्नल दाखवल्याची गंभीर घटना विठ्ठलवाडी-उल्हासनगर दरम्यान शनिवारी घडली. त्यामुळे दोन लोकलची टक्कर होणार होती. मात्र मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे सदर टक्कर टळली आहे. या घटनेमुळे आता लोकल प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
  • 08:53 AM • 09 Jan 2024
    मराठा आरक्षणावर सर्वात मोठी बातमी
    मराठा आरक्षणावर सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाची लवकरच मुंबईत बैठक पार पडणाक आहे. ही बैठकीचे आयोजन येत्या 11 जानेवारीला दुपारी 3 वाजता करण्यात आले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाच सर्वेक्षण सुरू करण्यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
  • 08:43 AM • 09 Jan 2024
    ठाकरे-शिंदेंची धाकधुक वाढली
    आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल बुधवारी येणार आहे. यामुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या आमदारांचे भवितव्य उद्या ठरणार आहे. या निकालापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शासकिय निवासस्थानी भेट घेतल्याने अनेकांनी त्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे आता आमदार अपात्रतेचा निकाल शुिंदे गटाच्या बाजूने लागले अशी चर्चा सुरु झाली आहे.
follow whatsapp