लाइव्ह

Maharshtra Breaking News Live: नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना थेट जाहीर पत्र

रोहिणी ठोंबरे

07 Dec 2023 (अपडेटेड: 08 Dec 2023, 03:30 AM)

Maharashtra Assembly Winter Session 2023 Latest updates : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून (7 डिसेंबर) सुरू होत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा, राज्यातील काही भागात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, ओबीसी आरक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुका याबद्दल प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता. अधिवेशनातील सर्व ताजे अपडेटस् आणि राज्याच्या विविध भागातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एकाच ठिकाणी…

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 09:44 PM • 07 Dec 2023
    Marathi News Live updates : सराईत गुन्हेगार सोलापूर पोलिसांच्या ताब्यातून पळाला, स्वच्छतागृहातून झाला पसार
    सराईत गुन्हेगार आनंद उर्फ आनंद्या राजकुमार काळे हा पोलिसाच्या हातून बार्शी न्यायलयातून पळाला आहे. त्याला बार्शी न्यायालयात जिल्हा सत्र न्यायाधीश चव्हाण यांच्यासमोर हजर केले होते. न्यायालयातून जेलला परत घेवून जात असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चव्हाण यांना लघुशंका करण्यासाठी त्याला न्यायालयातील स्वच्छता गृहात घेऊन जाण्यात आले होते. त्यावेळी त्याने स्वच्छतागृहातील खिडकीतून उडी मारून त्याने पळ काढला. या प्रकरणी आनंद्या काळे विरोधात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला आहे.
  • 07:09 PM • 07 Dec 2023
    Marathi News Live updates : मलिकांच्या सहभागावरून राजकारण तापले, देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना पत्र
    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने नागपुरात गेले आहेत. त्यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत हजेरी लावत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या बाकावर बसले होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत अजित पवार यांना पत्र लिहून सत्ता येते आणि जाते पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा असल्याचे सांगत त्यांच्यावर आरोप असल्याने त्यांना महायुतीत भाग करणे योग्य होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे.
  • 06:26 PM • 07 Dec 2023
    Marathi News Live updates : मराठा बांधवाप्रमाणेच महिलांनीही एकत्र यावं, जरांगे पाटील यांचं आवाहन
    हिंगोलीतील कऱ्हाळे दिग्रसमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची सभा लाखोंच्या उपस्थित पार पडली. आजही जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका करत आरक्षणासाठी एकजूट राहण्याचे आवाहने केले. यावेळी त्यांनी मराठा बांधव ज्या प्रकारे एकत्र आले त्याचप्रमाणे आता महिलांनीही आरक्षणासाठी एकत्र यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.
  • 05:53 PM • 07 Dec 2023
    Marathi News Live updates : आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना खाली खेचणार, धनगर समाजाचा इशारा
    ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला तर 160 आमदारांना याचा फटका बसणार आहे. सत्ताधाऱ्यांना 2024 च्या निवडणुकीत खुर्ची वरून खाली खेचण्याचा इशारा धनगर समाजाचे नेते आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्ह्यातील जतमध्ये ओबीसी बांधवांनी जत तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सगळ्यात आधी जत विधानसभा मतदारसंघात ओबीसी बांधव मोठा धक्का देतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
  • 04:45 PM • 07 Dec 2023
    Sushma Andhare: सरडासुद्धा आत्महत्या करेल; देवेंद्र फडणवीसांवर अंधारेंची टीका!
    शिवसेनेच्या (UBT) उपनेत्या सुषमा अंधारेंनी नवाब मलिकांवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात सामावून घेणारे देवेंद्र फडणवीस नवाब मलिक यांच्या मंत्री पदाबद्दल असे कसे विचारू शकतात, असा सवाल सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला.'पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते, असा प्रश्न विचारतात? @Dev_Fadnavis भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!' असं म्हणत सुषमा अंधारेंनी टीका केली.
  • 01:58 PM • 07 Dec 2023
    Revanth Reddy Oath Ceremony: तेलंगणाच्या मुख्यमंत्रिपदी रेवंथ रेड्डींचा शपथविधी पडला पार
    विधानसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर काँग्रेस अध्यक्ष रेवंथ रेड्डींनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यासह 11 मंत्री शपथ घेतील. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यावेळी उपस्थित होते. या शपथविधीच्या निमित्तानं इंडिया आघाडी शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. रेड्डींनी या शपथविधी सोहळ्याला अनेक इंडिया आघाडीच्या नेत्यांना आमंत्रित केलंय.
  • 12:02 PM • 07 Dec 2023
    Disha Salian Suicide: आदित्य ठाकरेंची चौकशी होणार?
    शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढू शकतात. दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचा तपास शिंदे सरकार एसआयटीमार्फत करणार असल्याचं महटलं जात आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी केली आहे. 'दिशा सालियन प्रकरणाची चौकशी झाल्यावर दूध का दूध, पानी का पानी होईल,' असे वक्तव्यही भरत गोगावलेंनी केलं आहे.
  • 11:01 AM • 07 Dec 2023
    Maharashtra Winter Session 2023: विरोधकांचे पायऱ्यांवर आंदोलन
    राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांचे नेते शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मागणीवरून आक्रमक झाल्याचे दिसले. विरोधी बाकावरील आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी केली.
  • 10:23 AM • 07 Dec 2023
    Marathi News Live updates : मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचं महाराष्ट्रातील खासदारांना पत्र
    संसदेचे हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे मोदी सरकारचे लक्ष वेधून संभाजीराजे छत्रपतींनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून संभाजीराजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदारांना महत्त्वाचं आवाहन केले आहे. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.
  • 10:18 AM • 07 Dec 2023
    Nawab Malik : जामिनानंतर मलिकांचं पहिलं अधिवेशन, कुणाला देणार पाठिंबा?
    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात पोहोचले. जामीन मिळाल्यानंतर मलिकांचं हे पहिलंच अधिवेशन आहे. मलिक तुरुंगात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. नवाब मलिक कुणाच्यासोबत आहेत, हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. पण, हिवाळी अधिवेशनात ते कोणत्या बाकावर बसतात यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मलिक शरद पवार गटाला धक्का देणार की अजित पवार, याबद्दल चित्र अधिवेशनात स्पष्ट होईल.
follow whatsapp