औरंगाबाद : युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची सिल्लोडमधील बहुचर्चित जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे. ज्या आंबेडकर चौक मैदानावर सभा नियोजित होती तिथे आता केवळ छोटेखानी सत्कार आणि लिहाखेडी भागात शिवसंवाद यात्रा असा त्यांचा नवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, सभा रद्द झाल्याचे समजताच आदित्य ठाकरे यांच्या ‘रणछोडदास’ अशी टीका होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांच्या सिल्लोडमधील जाहीर सभेच्या चर्चेने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आधी ४० आमदारांवर टीका, मग ५० खोक्यांचा आरोप यामुळे शिवसेनेतील शिंदे-ठाकरे गट आमने-सामने आले होते. अशाच छोटा पप्पू म्हणतं सत्तार यांनी आदित्य ठाकरेंची हेटाळणी केली. तसंच मतदारसंघात येवून सभा घेऊन दाखवा हे आव्हान सत्तार यांनी दिलं होतं.
येत्या ७ नोव्हेंबरला सिल्लोड आणि पैठणमध्ये शिवसंवाद यात्रा धडकणार आहे. यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी सत्तार यांचं आव्हान स्वीकारत सिल्लोडमध्ये सभा लावली. आदित्य ठाकरे यांची सिल्लोडमध्ये सभा होणार, शिवसंवाद यात्रा काढणार असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाहीर केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून सत्तार यांनी ७ नोव्हेंबरलाच खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा सिल्लोडमध्ये ठेवली.
मात्र त्याच महावीर चौकातीस सभेसाठी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत आदित्य ठाकरे यांना दिलेली परवानगी नाकारण्यात आली. सभेला ते मैदान नाकारण्यात आल्यानंतर पर्याय म्हणून आंबेडकर चौकातील मोकळ्या मैदानात सभेला परवानगी देण्यात आली. पण रात्रीतून सुत्रे हलली आणि सभा रद्द होऊन आता सिल्लोडमध्ये फक्त सत्कार आणि लिहाखेडी भागात शिवसंवाद यात्रा असा नवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
आदित्य ठाकरे विरद्ध अब्दुल सत्तारांमध्ये वादाची ठिणगी कशी पडली?
चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं. पहिल्यांदाच ठाकरेंच्या गादीला आणि मातोश्रीला थेट आव्हान मिळालं. त्यामुळे पहिल्यांदाच ठाकरेंना बंडानंतर थेट रस्त्यावरून उतरून चार हात करावे लागत आहेत. मातोश्रीवरून उद्धव ठाकरेंनी नव्यानं संघटनात्मक जुळवाजुळव सुरू केली.
तर आदित्य ठाकरेंनी बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून दौरे सुरू केलेत.आदित्य ठाकरेंनी औरंगाबादचाही दौरा केला, पण ठाकरेंनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या सिल्लोड मतदारसंघात जाणं टाळलं. तेव्हा सत्तारांनी माझ्या मतदारसंघात सभा घेऊन दाखवा म्हणत ठाकरेंना डिवचलं होतं. आता दोनेक महिन्यांनी ठाकरेंचा पुन्हा औरंगाबाद दौरा ठरलाय आणि यावेळी ते थेट सत्तारांच्या बालेकि
ADVERTISEMENT